Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

रविंद्र धंगेकर Videos

रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणूक लढवली होती. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक आहेत. २००२ ते २०२२ पर्यंत रवींद्र धंगेकर हे विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महापालिकेमध्ये सलग चार वेळा प्रचंड मतांनी नगरसेवक झाले. रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना पक्षातून सुरू झाला. २००२ ला रवींद्र धंगेकर हे शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मनसेत प्रवेश करत २००७ आणि २०१२ या दोन्ही पुणे पालिका निवडणुकीत विजय मिळवला. २०१७ ला राज ठाकरे यांची साथ सोडत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विजय मिळवला. एवढंच नाही तर रवींद्र धंगेकर यांनी २००९ आणि २०१४ ला मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान, रवींद्र धंगेकर सध्या कसब्याचे विद्यमान आमदार आहेत. तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर रवींद्र धंगेकर आवाज उठवत असल्याने ते चर्चेत असतात.


Read More
Congress MLA Ravindra Dhangekar reaction to the FC Road drug case
Ravindra Dhangekar on Drugs: एफसी रोड अमली पदार्थ प्रकरण, रविंद्र धगेकरांनी दिली प्रतिक्रिया

गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचं सेवन केल्याचा दावा करणारी चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली…

Appreciation of Ravindra Dhangekar by Supriya Sule
Supriya Sule on Ravindra Dhangekar: सुप्रिया सुळेंकडून धंगेकरांचं कौतुक, नेमकं काय म्हणाल्या? प्रीमियम स्टोरी

पुण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा निवडणुकीत पराभव झाला. महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांचं आव्हान धगेंकरांपुढे होतं. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित…

Congress Ravindra Dhangekars reaction to defeat in Pune Lok Sabha elections
Ravindra Dhangekar on Pune Result: पराभवाचं चिंतन करणार, रविंद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया

पुण्यात काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे. भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या…

Muralidhar Mohol won the Lok Sabha election seat from Pune
Murlidhar Mohol on Result: पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांची सरशी, विरोधकांना लगावला टोला

पुण्यातून भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. पुण्यातील लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. कारण मोहोळ यांच्याविरोधात मविआचे आमदार…

ताज्या बातम्या