Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

समांथा रुथ प्रभू

समांथा रुथ प्रभू ही सध्याची दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म २८ एप्रिल १९८७ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला होता. तिचे वडील तेलुगू आणि आई मल्याळम भाषिक आहेत. तिला दोन मोठे भाऊ आहेत. समांथा तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा तिन्ही भाषा उत्तमपणे बोलते. चेन्नई शहरामध्ये तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. स्टेला मॅरिस कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेत पदवी मिळवली आहे. पदवीचे शिक्षण सुरु असताना समांथाने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. काही वर्ष मॉडेलिंग केल्यानंतर तिला चित्रपटांमध्ये काम करायची संधी मिळाली. २०१० मध्ये तिचा ‘ये माया चेसवे’ (ye maaya chesave) हा पहिला तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये तिच्यासह नागा चैतन्य अक्किनेनी प्रमुख भूमिकेत होता. याच वर्षी तिने तमिळ सिनेसृष्टीदेखील पदार्पण केले. तिने इगा, रंगस्थलम, सुपर डिलक्स अशा अनेक दर्जदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांप्रमाणे तिचे खासगी आयुष्य देखील नेहमी चर्चेत राहिले. २०१० पासून समांथा आणि नागा चैतन्य एकमेकांना डेट करत होते. सहा-सात वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये गोव्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. यानंतर तिने ‘समांथा अक्किनेनी’ या नावाचा वापर करायला सुरुवात केली. जुलै २०२१ मध्ये तिने सोशल मीडियावरुन ‘अक्किनेनी’ नाव काढून टाकले. यामुळे चाहत्यांना या जोडप्यामध्ये काहीतरी बिनसल्याची शंका आली. पुढे ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. या घटस्फोटामुळे समांथा पुन्हा चर्चेत आली. यावरुन तिच्यावर टीका देखील झाली. दरम्यानच्या काळात ‘पुष्पा’ आणि ‘द फॅमिली मॅन सीझन २’ या दोन कलाकृतींमुळे समांथाच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली. काही महिन्यांपूर्वी तिने सोशल मीडियावर मायोसायटीस हा गंभीर आजार झाला असल्याची माहिती दिली.Read More
samantha ruth prabhu hydrogen peroxide nebulisation
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला अडचणीत आणणारी ‘हायड्रोजन पेरोक्साइड नेब्युलायझेशन’ उपचार पद्धती नेमकी आहे तरी काय?

समांथाने व्हायरल इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड नेब्युलायझेशन या उपचार पद्धतीचा सल्ला दिला होता.

Samantha ruth Prabhu shared one doctor said she should be in prison during her therapies and treatment
“मला तुरुगांत टाकायला…”, समांथा रुथ प्रभुने सांगितला डॉक्टरांनी दिलेला धक्कादायक सल्ला, म्हणाली…

समांथा रुथ प्रभुने याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Samantha Ruth Prabhu in atlees upcoming film with south star allu arjun
ब्रेकनंतर समांथा रुथ प्रभू अ‍ॅटलीच्या चित्रपटातून करणार पुनरागमन; ‘हा’ सुपरस्टार असणार मुख्य भूमिकेत

या चित्रपटाचं चित्रीकरण ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

samantha-ruth-prabhu-oo-antava
“मी थरथर कापत होते…”, समांथा रूथ प्रभूने सांगितला ‘उ अंटवा’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा अनुभव

‘पुष्पा’ चित्रपटात प्रथमच समांथा एका डान्स नंबरच्या माध्यमातून आपल्यासमोर आली. परंतु हा अनुभव समांथासाठी फार चांगला नव्हता

samantha-ruth-prabhu2
“समांथा रूथ प्रभू ही ३ कोटी लोकांना मूर्ख बनवत आहे”, अभिनेत्रीच्या पॉडकास्टवर एका डॉक्टरांची संतप्त प्रतिक्रिया

‘टेक २०’ नावाच्या या पॉडकास्ट शोच्या नव्या एपिसोडमुळे समांथा सध्या चर्चेत आहे

south actress samantha ruth prabhu visit padmavati devi temple for seeking blessings in tirupati
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने तिरुपतीमधील पद्मावती देवीचं दर्शन घेतलं! | Samantha

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने तिरुपतीमधील पद्मावती देवीचं दर्शन घेतलं! | Samantha

Samantha Ruth Prabhu bikini bold photos enjoying vacation Malaysia went viral social media समांथा रुथ प्रभु बिकिनी
समांथा रुथ प्रभूचा मलेशियामधील बिकिनी लूक व्हायरल; चाहते म्हणाले, “नागा चैतन्य…”

समांथाने सध्या अभिनय क्षेत्रापासून विश्रांती घेतली असून, मलेशियामध्ये ती व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

Samantha Photo
10 Photos
‘ऊ अंटावा गर्ल’ समंथाचा बोल्ड अंदाज, हॉट फोटो पाहून चाहते म्हणाले नागाचैतन्या आता…

समंथाने तिचे एकदम खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज दिसून येतो आहे.

samantha ruth prabhu on second marriage
समांथा रुथ प्रभू दुसरं लग्न करणार? चाहत्याने थेट प्रश्न विचारल्यावर अभिनेत्रीने शेअर केली आकडेवारी; म्हणाली…

समांथा रुथ प्रभूने दुसऱ्या लग्नाबाबत केलेलं विधान चर्चेत, वाचा काय म्हणाली अभिनेत्री?

-how-much-south-indian-celebs-charge-for-one-instagram-post
12 Photos
Photo : रश्मिका मंदानापासून अल्लू अर्जूनपर्यंत साऊथचे ‘हे’ कलाकार इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी घेतात ‘एवढी’ फी, आकडा वाचून बसेल धक्का

साऊथचे सुपरस्टार कलाकार सोशल मीडियावरील एका पोस्टसाठी किती फी घेतात माहिती आहे का? आकडा वाचून बसेल धक्का

संबंधित बातम्या