स्कॉटलंड संघाचं तर यंदाच्या टी-२० विश्वचषकापूर्वी नशीब उजळलं. स्कॉटलंडचा संघ सुरूवातीला टी-२० विश्वचषक पात्रता फेरीतून बाहेर पडला.पण बांगलादेश संघाने भारतात टी-२० विश्वचषक सामने खेळण्यास नकार दिल्याने आयसीसीशी चर्चा केल्यानंतरही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही आणि परिणामी संघ यंदाच्या टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला.त्यामुळे बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड संघाला संधी देण्यात आली.स्कॉटलंड आतापर्यंत ६ वेळा या स्पर्धेत खेळला आहे, त्यापैकी संघाने २२ पैकी फक्त ७ सामने जिंकले आहेत. यंदा संघ रिची बेरिंग्टनच्या नेतृत्त्वाखाली खेळणार आहे.