अभिनेत्री श्रद्धा कपूर ही खलनायक आणि अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी आहे. श्रद्धा कपूरने २०१० पासून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. ती ‘आशिकी २’, ‘हैदर’, ‘एक व्हिलन’, ‘बागी’, ‘स्त्री’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकली. श्रद्धाचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी मुंबईत झाला. अंबिका हिंदुजा दिग्दर्शित ‘तीन पत्ती’ या चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन, बेन किंग्सले आणि आर माधवन यांच्याबरोबर काम केले होते.Read More