scorecardresearch

सोनिया गांधी

सोनिया गांधी

इंडियन नॅशनल काँग्रेस
जन्म तारीख 9 Dec 1946
वय 79 Years
जन्म ठिकाण इटली
सोनिया गांधी यांचे चरित्र

सोनिया गांधी (Sonia Gandhi) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. सध्या त्या राज्यसभेवरील खासदार आहेत. १९९८ साली त्या काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९९९ साली त्या अमेठी येथून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं नेतृत्व केले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. २००४, २००९,२०१४ व २०१९ मध्ये त्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. २०२२ मध्ये त्यांनी हे पद सोडलं आणि मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९८ ते २०१७ या कालावधित त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे.

Read More
सोनिया गांधी यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
दिवंगत राजीव गांधी
मुले
राहुल गांधी, प्रियंका गांधी
नेट वर्थ
₹ ११,८२,६३,९१६
व्यवसाय
राजकीय नेत्या

सोनिया गांधी न्यूज

गाझा युद्धावर केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी.(संग्रहित छायाचित्र)
गाझा प्रश्नावर मोदी सरकारचे मौन राष्ट्रीय हिताच्या विरोधात; सोनिया गांधींची परराष्ट्र धोरणावर टीका

गाझा प्रश्नावर मोदी सरकारच्या मौनावर सोनिया गांधींनी जोरदार टीका केली असून, ही भूमिका देशाची नैतिकता आणि राष्ट्रीय हिताच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टीएमसी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? ममता बॅनर्जी अन् सोनिया गांधींच्या बैठकीबाबत सुप्रिया सुळेंचं भाष्य, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
टीएमसी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? ममता बॅनर्जी अन् सोनिया गांधींच्या बैठकीबाबत सुप्रिया सुळेंचं भाष्य; म्हणाल्या…

सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात झालेल्या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली? याबाबत सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.

ममता बॅनर्जी यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? दिल्लीतील बेठकीत नेमकी काय चर्चा झाली? (छायाचित्र
ममता बॅनर्जी यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? दिल्लीतील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

Congress TMC Merger News : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

"मला काँग्रेसचं अध्यक्ष व्हायचं होतं, पण माझ्या विरोधात षडयंत्र...", अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
‘मला काँग्रेसचं अध्यक्ष व्हायचं होतं, पण माझ्या विरोधात षडयंत्र…’, अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट

अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घडलेल्या घडामोडींवर भाष्य करत नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.

अकोला येथील RSS कार्यालयावरील कथित हल्ला प्रकरणात काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता (संग्रहित छायाचित्र)
सोनिया गांधींविरोधातील वक्तव्यानंतर RSS कार्यालयावर हल्ला; १६ वर्षांनी निकाल; काँग्रेस आमदार, माजी महापौरांबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

तत्कालीन सरसंघचालकांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरून अकोल्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयावर कथित हल्ला प्रकरणाचा तब्बल १६ वर्षांनी निकाल लागला आहे.

कर्नाटकात सत्ता बदलाचे वारे; राजीनामा देऊन सिद्धरामय्या थेट दिल्लीत राहुल गांधींच्या दरबारी!
कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळ स्थापनेवर चर्चा; सिद्धरामय्या यांच्या पक्षश्रेष्ठींबरोबर बैठका!

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी दिल्लीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन नव्या मंत्रिमंडळावर सविस्तर चर्चा केली.

ममता बॅनर्जी: चौकटी मोडणारे नेतृत्व की पुरुषसत्ताक व्यवस्थेतील बंडखोर?
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाकडे कसे बघायचे?

पश्चिम बंगालमध्ये सत्तेचे गणित बदलले आहे, पण त्याहून महत्त्वाचा प्रश्न कायम आहे, एखाद्या महिलेने सत्तेवर पकड मिळवणे हा तिचा नेतृत्वाचा हक्क मानण्याऐवजी, त्याकडे बंडखोरी म्हणून का पाहिले जाते?

मतदारसंघांची प्रस्तावित फेररचना संविधानावर आघात ठरू शकते, असा इशारा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दिला आहे. (संग्रहित छायाचित्र)
प्रस्तावित मतदारसंघ फेररचना धोकादायक सोनिया गांधी यांची टीका; आकड्यांपेक्षा न्याय प्रतिनिधित्व महत्त्वाचे

सोनिया गांधी म्हणाल्या की, विरोधी पक्षांनी या कायद्याची अंमलबजावणी जनगणनेशी जोडण्यास विरोध केला होता. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासूनच हा कायदा लागू करण्याची मागणी केली होती, मात्र सरकारने ती नाकारली.

सोनिया गांधींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राहुल गांधींचा केरळ दौरा रद्द, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Sonia Gandhi : सोनिया गांधींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राहुल गांधींचा केरळ दौरा रद्द

सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांचा केरळ दौरा रद्द केला असल्याची माहिती समोर आली आहे.

सोनिया गांधींची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (फोटो-FE)
Sonia Gandhi : सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात करण्यात आलं दाखल

Sonia Gandhi Admitted in Hospital काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नैतिक वारसा जपू या... संसदेत बोलू या! (संग्रहित छायाचित्र)
नैतिक वारसा जपू या… संसदेत बोलू या!

इराणशी एकीकडे वाटाघाटी सुरू ठेवणार्‍या अमेरिकेने युद्ध जाहीर न करताच त्या देशाच्या सार्वभौमत्वावर घाला घालून तेथील राष्ट्रप्रमुखाची हत्या करणे हे भारताने आजवर जपलेल्या तत्त्वांशी विसंगत आहे. त्यामुळेच भारतीय पंतप्रधानांनी यावर गप्प राहणे हे तत्त्वच्युत अवस्थेचे लक्षण ठरते…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या