सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सध्या भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज (Batsman) आहे. त्याचे संपूर्ण नाव सूर्यकुमार अशोक यादव असे आहे. चाहते त्याला प्रेमाने ‘स्काय’ (SKY) असे म्हणतात. तो मुंबईच्या संघाकडून देशांतर्गत सामने खेळतो. त्याने १४ मार्च २०२१ रोजी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याला भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळायची संधी मिळाली. आतापर्यंत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्याला टी-२० स्पेशालिस्ट असेही म्हटले जाते.
२०१२ मध्ये त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. २०१८ च्या हंगामापासून तो मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे प्रतिनिधीत्व करतो. सूर्यकुमारने ७ जुलै २०१६ रोजी मुंबईत देविशा शेट्टीशी लग्न केले. Read More
Sunil Gavaskar on Suryakumar Yadav: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची आरसीबीविरुद्धची धडाकेबाज खेळी पाहून सुनील गावस्कर आश्चर्यचकित झाले. त्यांनी…
India vs Australia: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला आजपासून सुरुवात झाली असून नागपूर कसोटीत भारताच्या दोन धुरंधरांना पदार्पणाची संधी मिळाली.