scorecardresearch

सूर्यकुमार यादव Videos

Suryakumar Yadav

मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू भिरकावून देण्याची क्षमता असलेला किमयागार. अद्भुत फटकेबाजीसाठी न्यू ३६० या नावाने प्रसिद्ध. टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर षटकारासह सुरुवात. आयसीसी टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत सातत्यपूर्ण प्रदर्शनासह अव्वल स्थान पटकावणारा शिलेदार. सूर्यकुमारच्या नेतृत्वात पहिल्यांदाच भारतीय संघाची वर्ल्डकपवारी. टी२० प्रकारात कर्णधार म्हणून अतिशय खणखणीत कामगिरी. आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी फिनिशर म्हणून स्वत:ला सिद्ध केलं. २०१८ पासून मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाजीतील आधारवड. मुंबई इंडियन्ससाठी केलेल्या दमदार प्रदर्शनाच्या बळावरच भारतीय संघात स्थान पटकावलं. दोन वर्षांपूर्वी टी२० वर्ल्डकपविजेत्या संघाचा अविभाज्य घटक. २०२४ वर्ल्डकपच्या फायनल लढतीत डेव्हिड मिलरचा अद्भुत झेल टिपत भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका. टी२० प्रकारात चार शतकं नावावर असणाऱ्या सूर्यकुमारला आयसीसीने २०२२ आणि २०२३ मध्ये टी२० क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने गौरवलं. अस्सल मुंबईकर सूर्या त्याच्या अनोख्या सुपला फटक्यासाठी प्रचंड लोकप्रिय आहे. तिशीत म्हणजे तुलनेने उशिरा पदार्पणाची संधी मिळूनही सूर्यकुमारने कामगिरीच्या जोरावर या संधीचं सोनं केलं. कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा या वर्ल्डकपविजेत्या भारतीय कर्णधारांच्या मांदियाळीत स्थान पटकावण्यासाठी सूर्यकुमार आतूर आहे.


Read More
Rohit Sharma Suryakumar Yadav Yashasvi Jaiswal and Shivam Dubey were felicitated in Vidhan Bhavan DCM Ajit Pawar appreciated all the players present in his Speech
Ajit Pawar on Suryakumar: अजित पवारांनी आपल्या अंदाजात केलं खेळाडूंचं कौतुक; म्हणाले… प्रीमियम स्टोरी

टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या चार खेळाडूंचा आज विधानभवनात…

Indian cricket team captain Rohit Sharma gave a speech in Marathi in the Legislature
Rohit Sharma on Suryakumar: रोहित शर्माचा विधानभवनात चौकार-षटकार, मुख्यमंत्री खळखळून हसले

आज विधानभवनात भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं मराठीत भाषण केलं.…

Suryakumars Marathi speech in the Legislature We will win another World Cup
Suryakumar Speech in Marathi: “आणखी एक विश्वचषक जिंकू”, सूर्यकुमारचं मराठीत भाषण

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबेचा आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. यावेळी सूर्यकुमारने…

Rohit Sharma Suryakumar Yadav Yashasvi Jaiswal and Shivam Dubey were felicitated in the legislature
Vidhan Bhavan Live: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबेचा विधीमंडळात सत्कार Live

भारतीय संघाने टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर काल (४ जुलै) मुंबईत त्यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर आज विधीमंडळात भारतीय…

The Chief Minister felicitated the players of the Indian team at Varsha Bungalow
Team India Meets CM Shinde: भारतीय संघातील खेळाडू वर्षा निवासस्थानी, मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्याची भेट घेतली.…

ताज्या बातम्या