scorecardresearch

टी २० विश्वचषक Videos

कसोटी आणि एकदिवसीय यांच्यामध्ये खूप जास्त षटकांचा समावेश असतो. २००० सालानंतर खेळाडूंना क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये काहीतरी नवीन हवं होतं. याची कसर टी-२० सामन्यांनी भरुन काढली. यामध्ये फक्त २० षटक असल्यामुळे क्रिकेटपटूंना नव्या पद्धतीने खेळण्याचा अनुभव मिळत होता. इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना टी-२० फॉरमॅटचा उदय झाला. २००४-०५ च्या आसपास टी-२० सामने खेळायला क्रिकेटपटूंनी सुरुवात केली. या फॉरमॅटला मिळणाऱ्या लोकप्रियतेकडे पाहून आयसीसीने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० सामन्यांचे आयोजन करायला सुरुवात केली. पुढे २००७ मध्ये त्यांनी टी-२० विश्वचषकाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पहिली आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली गेली. याच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघाने विजेतेपद मिळवले. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये जगभरातील देश सहभागी होत असतात. आयसीसीच्या इतर कार्यक्रमांनुसार यामध्ये बदल केले जातात. उदा. २०११ मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा असल्याने २०११ च्या जागी २०१० मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गतवर्षी इंग्लंडच्या संघाने २०२२ च्या आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला. Read More
मराठी कथा ×