scorecardresearch

कसोटी क्रिकेट News

कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या सदस्य देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघांदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक प्रकार आहे. यामध्ये एका सामन्यात प्रत्येक संघाला दोन असे चार डाव असतात. कसोटी सामना हा पाच दिवसांपर्यंत चालतो. पूर्वी कसोटी सामन्यांना वेळेचे मर्यादा नव्हती. मुळात क्रिकेटचा उदय झाल्यानंतर १८६१-६२ मध्ये टेस्ट मॅच किंवा कसोटी सामना हा शब्द वापरायला सुरुवात झाली. पण या शब्दाचा आणि कसोटी सामन्याचा तसे पाहता फारसा संबंध नव्हता. १८७७ पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांना कसोटी सामन्यांचा दर्जा देण्यात आला.


असा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला सामना हा १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंट (एमसीजी) येथे खेळण्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ब्रिटिश व्यावसायिकांचा संघ) यांच्यात खेळला गेला. पुढे १८९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांना प्रथम कसोटी सामने असे म्हटले गेले. पुढे कसोटी क्रिकेट हा शब्द प्रचलित झाला. सध्या जगभरातील १२ देश आयसीसीचे पूर्ण सदस्य असून कसोटी क्रिकेट खेळत आहेत. १९३२ मध्ये भारताने कसोटी सामने खेळायला सुरुवात केली. आधी हे सामने फक्त दिवसा खेळले जात असत. २०१२ मध्ये आयसीसीने डे-नाइट कसोटी सामन्यांना परवानगी दिला. त्यानंतर ३ वर्षांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडलेड ओव्हल येथे पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळला गेला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाप्रमाणे कसोटी क्रिकेटची सुद्धा लीग असावी असा प्रस्ताव २००९ पासून आयसीसीकडे केला जात होता.


एकूण दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटच्या लीग स्पर्धेचे म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले. २०१९-२१ या वर्षातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते न्यूझीलंडचा कसोटी संघ ठरला. तसेच २०२१-२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. दोन्ही वर्षांमध्ये उपविजेतेपद हे भारताकडे होते.


Read More
pratika rawal vaishnavi sharma kranti gaud picked for india vs Australia women test sports news
प्रतिका प्रथमच कसोटी संघात, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी वैष्णवी, क्रांतीचाही समावेश

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च महिन्यात होणाऱ्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यासाठी भारतीय महिला संघात फलंदाज प्रतिका रावल, डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्मा, वेगवान…

India Womens Team Test Squad Announced for Australia Tour Pratika Rawal Amanjot kur Vaishanvi sharma
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीसाठी भारताचा महिला संघ जाहीर, ‘या’ ३ खेळाडूंना पहिल्यांदाच मिळाली संधी; तर कर्णधार…

India Womens Test Squad: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वुमन्स प्रीमियर लीगनंतर संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार…

sarfaraz khan double century in ranji trophy
Ranji Trophy: सर्फराज, लाडची दमदार शतके, हैदराबादविरुद्ध पहिल्या दिवशी मुंबईच्या ४ बाद ३३२ धावा

कसोटी संघात पुनरागमनासाठी उत्सुक असलेला सर्फराज खान (१६४ चेंडूंत नाबाद १४२) आणि कर्णधार सिद्धेश लाड (१७९ चेंडूंत १०४) यांच्या दमदार…

Shubman Gill Wants Test Regulars to play Ranji Trophy firm on 2027 ODI world cup plans
शुबमन गिलचा कसोटी व २०२७च्या वर्ल्डकपसाठी मास्टरप्लॅन! खेळाडूंनाही पाळाव्या लागणार ‘या’ अटी

Shubman Gill: कर्णधार शुबमन गिलचा २०२७ च्या वर्ल्डकपसाठी एक खास प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनबाबत त्याने बीसीसीआयला देखील माहिती…

Yuvraj Singh Reveals Cancer Treatment Experience Doctor said Only had 3 6 months to live Watch video
“तू फक्त ६ महिने जगू शकतोस”, युवराज सिंगने सांगितला कॅन्सरचा अंगावर काटा आणणारा अनुभव; म्हणाला, “माझं फुफ्फुस आणि हृदय…”

Yuvraj Singh on Cancer Treatment: भारताच्या अष्टपैलू युवराज सिंगने कॅन्सरशी लढा देताना मृत्यूला जवळून पाहिलं होतं आणि त्याच्याकडे फक्त जगण्यासाठी…

Robin Uthappa Statement on Rohit sharma virat kohli test Retirement Said Not A Natural Exit video
रोहित-विराटला कसोटीतून निवृत्ती घ्यायला भाग पाडलं? भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, म्हणाला, “त्यांचा निवृत्तीचा निर्णय…”

Rohit-Virat Test Retirement: रोहित शर्मा व विराट कोहलीने २०२५ मध्ये अचानक कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या या निवृत्तीबाबत माजी खेळाडूने…

Australia vs England Test news in marathi
‘दोनदिवसीय’ मेलबर्न कसोटी माझ्यासाठीही धक्कादायक! ‘एमसीजी’चे खेळपट्टी देखरेखकार मॅथ्यू पेज यांची प्रतिक्रिया

सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानेही पूर्णपणे गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर टीका केली होती.

'Two-day Test' – Ashes poses new challenge for Test cricket
विश्लेषण : कसोटी क्रिकेटचे अस्तित्वच धोक्यात? ‘दोन दिवसां’च्या ॲशेस कसोटीमुळे कोणते प्रश्न उपस्थित? प्रीमियम स्टोरी

पाच दिवस सामना चालेल अशी खेळपट्टी बनविण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया हस्तक्षेप विचार करू शकते.

ashes series fourth test begins australia vs england match at Melbourne
पुन्हा ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व? ॲशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून

प्रतिष्ठेच्या ॲशेस कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्याला आज, शुक्रवारपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) सुरुवात होणार आहे.

Most wickets in test 2025 for Indian Bowler Mohammed Siraj Jasprit Bumrah Ravindra Jadeja
Year Ender: २०२५ मध्ये सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज कोण? बुमराहला मागे टाकत ‘हा’ खेळाडू पहिल्या स्थानी

Most Test Wickets in 2025: कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा कोणता गोलंदाज २०२५ मध्ये सर्वात यशस्वी ठरला आणि कोणत्या गोलंदाजाच्या नावे सर्वाधिक…

pat cummins rested for 4th ashes test mcg
पॅट कमिन्स चौथ्या कसोटीबाहेर; मर्फीला संधि

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) सुरू होणाऱ्या चौथ्या अॅशेस कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या