scorecardresearch

ठाणे न्यूज

लोकसत्ताच्या या सदारामध्ये ठाणे (Thane) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वाचता येतील. ठाणे हे शहर फार प्राचीन आहे. मुंबईसारख्या महानगराला हे शहर जोडलेले आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे. ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय ठाणे शहरात आहे. ठाणे शहराचे कामकाज ठाणे महानगरपालिका पाहते, जिची स्थापना १९८२ साली झाली होती. तलावांचे शहर म्हणूनही ठाणे जिल्हा ओळखला जातो. कारण शहरात जवळजवळ ३५ तलाव आढळतात. तसेच या शहरात अनेक हिरव्यागार टेकड्या आणि डोंगर अशी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात, कारण नाटकांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडतात.


ठाणे जिल्ह्याची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. ठाणे जिल्ह्यात आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाचे लोक समूहाने वस्ती करून राहत असतं. भारताची पहिली रेल्वे बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), मुंबई ते ठाणेदरम्यान १८५३ मध्ये धावली होती. ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्टेशन आहे.


ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वाहतूक व्यवस्था पुरवते. ठाणे औद्योगिक दृष्टिकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व प्रकारच्या बातम्या येथे वाचायला मिळतील.


Read More
power play, eknath shinde, shiv sena, thane
ठाण्यात शिंदे सेनेचे महिला एकत्रिकरणातून शक्तिप्रदर्शन, रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव

या मेळाव्याला ठाणे लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील ५० हजाराहून अधिक महिला उपस्थित राहू शकतील, असे नियोजन शिंदेच्या सेनेकडून आखले जात…

boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी येथील टेमघर पाडा भागात वाहनाचे नुकसान केल्याचा आरोप करत एका १० वर्षीय मुलाला घरातून बाहेर आणून त्याला पेरूच्या झाडाला…

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी

मुंबई महानगरातील शहरांच्या तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या अंगाची काहीली होऊ लागली असून त्यापाठोपाठ आता उष्मघाताच्या त्रासामुळे…

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांच्यासह १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी ठाणे येथील…

heat in thane, thane district, heat still continue, murbad register highest temperature, 41 degree celsius,
तापमानात घट पण उकाडा कायम; मुरबाड सर्वाधिक ४१ अंशावर, जिल्ह्यात सरासरी तापमान ३९ अंशावर

गेल्या काही दिवसांपासून उकाडा सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना गुरुवारी काही अंशी दिलासा मिळाला. गुरुवारी सरासरी तापमान बुधवारपेक्षा दोन ते…

Thane Lok Sabha, OBC Bahujan Party candidate,
ठाणे लोकसभेच्या रिंगणात ओबीसी बहुजन पार्टीचा उमदेवार

ओबीसींचा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असल्याची चर्चा असतानाच,…

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन

जांभळीनाका येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री या उत्सवासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

electricity cut, thane city, CM eknath shinde
मुख्यमंत्री शिंदेंच्या शहरात ४० टक्के भागात बत्तीगुल

ठाणे शहरातील नौपाडा, पाचपाखाडी, जुने ठाणे, वागळे इस्टेट परिसराचा काही भाग, कोलशेत येथील काही भागाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

Unveiling of Ram Garjana song by MLA Sanjay Kelkar
लोकसभा निवडणुक काळात भाजपाची राम गर्जना, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण

महायुतीच्या नेत्यांनी मतदार संघात मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून त्यापाठोपाठ आता महायुतीतील भाजपने राम नवमीचे औचित्य साधून राम गर्जना…

nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर

सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत लोकल गाड्यांमधून प्रवास करूया म्हणजे नागरिकांना प्रवासादरम्यान काय हाल सोसावे लागतात हेही समजेल, अशी टीकाही…

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी

गेल्याकाही दिवसांपासून मुंबई, ठाण्यात उन्हाचा पारा वाढत असताना उष्णतेचा फटका नागरिकांसह भटक्या प्राण्यांनाही सहन करावा लागत आहे.

संबंधित बातम्या