ट्रेंडिंग टूडे News
ट्रेंडिंग टूडे (Trending Today) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत वापरल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण माध्यमाची अपडेटेड माहिती असणे आवश्यक असते.
ट्रेंडिंग टूडे (Trending Today) या पेजवर ही व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टीची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर वाटू शकतात. तर काही बातम्या सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर असू शकतात. सोशल मीडियावर अनेकदा एखादी व्यक्ती किंवा घटना व्हायरल झाली की त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागू शकतो.
लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर दरदिवशी सोशल मीडियासह खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना बातमीच्या स्वरुपात वाचायला मिळतील. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांच्या देखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग टूडे हे नावाप्रमाणे आजच्या दिवसातील ट्रेंड्सचे अपडेट्स वाचकांपर्यत पोहोचावेत यासाठी तयार करण्यात आले आहे.
Read More