उजनी (Ujani-Dam) हे भीमा नदीवरील मोठे धरण आहे. या धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाला यशवंत सागर असेही म्हटले जाते. मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १५१७ गिगालिटर्स इतकी आहे. भीमा नदी ही महाराष्ट्र (७५ टक्के) आणि कर्नाटक (२५ टक्के) अशा दोन राज्यांतून वाहते. पश्चिम घाटातील भीमाशंकर टेकड्यांमधून उगम पावणाऱ्या या नदीच्या कुंडली, घोड, भामा, इंद्रायणी अशा काही उपनद्या आहेत. पुण्यामधून वाहत येणाऱ्या नद्यांच्या प्रवाहामुळे हे धरण नेहमी भरलेले असते.
याच्या बांधकामाची सुरुवात १९६९ मध्ये झाली होती, तर १९८० मध्ये ते बांधून पूर्ण झाले. या धरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होतो. अशा या भव्य धरणाभोवती गेल्या काही वर्षांपासून वाळू उपसून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. या विभागामध्ये वाळू माफियांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.Read More
Foreign Fish Removal Campaign in Ujani: उजनी धरणातील परदेशी ‘सकरमाउथ कॅटफिश’ माशांच्या वाढत्या धोक्यामुळे स्थानिक जैवविविधता व मच्छिमारांचे उत्पन्न धोक्यात…
पुणे आणि परिसरातील घाटमाथ्यांवर गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सोलापूरची वरदायनी असलेल्या उजनी धरणामध्ये गुरुवारी सायंकाळपर्यंत ३८.२३ टक्के पाणीसाठा…
नव्या धोरणानुसार संबंधित पाटबंधारे विकास महामंडळांना ही कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या प्रक्रियेतून मिळणारा महसूल संबंधित सिंचन प्रकल्पांच्या…
गुंतवणुकीसाठी सुटसुटीत प्रक्रिया आणि उद्योगस्नेही धोरणांमुळेच जागतिक दर्जाचे उद्योग समूह महाराष्ट्राला पसंती देत असून राज्य औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करत आहे.
उजनी धरणाच्या जलाशयावर यंदा रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांनी पाठ फिरवली आहे. पाण्याची पातळी अनुकूल असूनही प्रदूषणाने ढासळलेली पाण्याची गुणवत्ता आणि विस्कळीत…
देखण्या चित्रबलाक पक्ष्यांनी येथे विणीच्या हंगामासाठी मोठी लगबग सुरू केली असून, तलावातील पाण्याने वेढलेल्या काटेरी बाभळीच्या झाडांवर त्यांनी घरटी बांधण्यास…
Pallid Harrier : जागतिक स्तरावर संकरग्रस्त ठरत असलेला शबल ससाणा इंदापूर तालुक्यातील भिगवण–कडबनवाडी गवताळ वनक्षेत्रात आढळून आल्याने पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साह…