scorecardresearch

उर्मिला कानेटकर कोठारे

मराठी, हिंदी आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतही महत्त्वपूर्ण योगदान देणारी अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेनं दमदार अभिनयच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मूळची पुण्याची असलेली उर्मिला अभिनेत्री आणि उत्तम कथ्थक नर्तिका देखील आहे. याशिवाय तिने मार्शल आर्टचं शिक्षण देखील घेतलंय. उर्मिलानं २००६ साली शुभ मंगल सावधान या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘मला आई व्हायचंय’, ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘टाइमपास’, ‘बावरे प्रेम हे’, ‘ती सध्या काय करते’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. याशिवाय उर्मिलानं २०१४ साली ‘वेलकम ओबामा’ या तेलुगू चित्रपटात काम केलं आहे. ४ मे १९८६ साली पुण्यात जन्मलेल्या उर्मिला कानिटकरनं २०११ साली प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारेशी लग्न केलं. या दोघांना जीजा नावाची एक मुलगी देखील आहे. Read More
Urmila Kanetkar Kothare
10 Photos
अभिनेत्री उर्मिला कोठारेचा मोहक अंदाज, कॉटन साडीतले फोटो व्हायरल

अभिनेत्री उर्मिला कानेटकरने तिचे कॉटन साडीतले फोटो पोस्ट केले आहेत जे चांगलेच व्हायरल झाले आहेत.

urmila kothare video
Video : “हा अन्याय…”, उर्मिला कोठारे तळपत्या सूर्याखाली करतेय शूटींग, म्हणाली “दिग्दर्शक पंखा लावून…”

“दिग्दर्शक छपराखाली अन् आम्ही तळपत्या सूर्याखाली उन्हाखाली करतोय शूटींग”; उर्मिला कोठारेने शेअर केला व्हिडीओ

संबंधित बातम्या