scorecardresearch

विश्वास नांगरे पाटील

विश्वास नांगरे पाटील (Vishwas Patil) आयपीएस अधिकारी आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या व्याख्यानांमुळे ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. ते सध्या मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आहेत.

२००८ च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म १ जून १९७३ रोजी सांगली जिल्ह्यातील कोकरूड (शिराळा) येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण शिराळा तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि बी. ए.चं शिक्षण कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून घेतलं. त्यांनी इतिहास विषयात सुवर्ण पदक पटकावून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि मग प्रशासकीय सेवेच्या तयारीला लागले. आतापर्यंत त्यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीसदल उपायुक्त, ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई दक्षिण विभाग अप्पर पोलीस आयुक्त, नाशिक पोलीस आयुक्त म्हणून काम केलं आहे.Read More

विश्वास नांगरे पाटील News

Sameer-wankhede-Vishwas Nangare Patil
विश्वास नांगरे पाटलांचा उल्लेख करत समीर वानखेडेंच्या वकिलाचा युक्तिवाद; म्हणाले, “त्यांनी…”

याचिकेवर सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देत तात्पुरतं अटकेपासून संरक्षण दिलं. यानंतर समीर वानखेडेंच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

Joshi Post And Comment
राजकीय घडामोडींचा योगा’योग’ अन् खुर्ची! ऋषिकेश जोशीच्या पोस्टवर विश्वास नांगरे-पाटलांची कमेंट; म्हणाले, “भावा, खुर्ची…”

राज्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या दिवशीच घडत असतानाच याचे पडसाद सोशल नेटवर्किंगवरही दिसत आहेत.

फुले-आंबेडकरही दहशतवादी होते का?

बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध केल्याबद्दल माझ्यावर साहित्यिकांनी घणाघाती टीका केली.

भालचंद्र नेमाडे साहित्यक्षेत्रातील दहशतवादी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आपले टीकास्त्र सोडण्यापूर्वी त्यांनीच कष्टपूर्वक मिळवलेल्या…

राजकारण्यांचे शिवप्रेम हे उसने- विश्वास पाटील

बाबासाहेब पुरंदरे हे केवळ ब्राम्हण समाजातील आहेत म्हणून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध करणे अत्यंत चुकीचे आहे.

संपामुळे झालेली गिरणीकामगारांची होरपळ ‘लस्ट फॉर लालबाग’ कादंबरीमध्ये

‘पानिपत’, ‘झाडाझडती’ आणि ‘महानायक’ या कादंबऱ्यांचे लेखक विश्वास पाटील यांची दीर्घ कालावधीनंतर ही कादंबरी येत आहे.

अलीकडच्या लेखकांना सगळेच ‘चायनीज फूड’सारखे ‘फास्ट’ हवे

शिखर गाठायचे म्हणजे तपस्या आलीच. एक, दोन वष्रे नव्हे, तर वर्षांनुवष्रे ही तपस्या करावी लागते, तेव्हा कुठे माणूस त्या शिखरावर…

साहित्यकृतीशी प्रामाणिक राहिले पाहिजे- विश्वास पाटील

वाचकांच्या नजरेतून केसभरही चूक निसटून जात नसल्याचे भान ठेवत साहित्यिकांनी जबाबदारीने लेखन करून आपल्या साहित्यकृतींशी प्रामाणिक राहिले पाहिजे, असे मत…

संगमनेरकरांना प्रतीक्षा गुलाबबाईंच्या ‘बडी अम्मा’ची

‘कुठवर पाहू वाट सख्या’ या सुप्रसिध्द लावणीच्या गायिका आणि ज्येष्ठ कलावती गुलाबबाई संगमनेरकर लवकरच िहदी चित्रपटातून संगमनेरकरांच्या भेटीला येत आहे.…

संबंधित बातम्या