व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) हे रशियाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. ते पहिल्यांदा ३१ डिसेंबर १९९९ रोजी रशियाचे (Russia) तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यानी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रशियाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २००० मध्ये पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झाले. ते ७ मे २००८ पर्यंत या पदावर होते. मात्र, रशियाच्या राज्यघटनेतील अटीनुसार त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होता आलं नाही. यावेळी त्यांचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव यांनी पुतिन यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं. त्यानंतर पुतिन ८ मे २००८ रोजी रशियाचे पंतप्रधान झाले.
सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यानंतर २०१२ ला पुतिन पुन्हा रशियाचे अध्यक्ष बनले. यानंतर २०१८ आणि २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे पुतिन यांनी रशियाच्या राज्यघटनेत बदल करून २०३६ पर्यंत स्वतः अध्यक्षपदाला मान्यता मिळवली. पुतिन यांनी रशियाची गुप्तचर यंत्रणा केबीजीमध्येही काम केलं आहे. Read More
Vladimir Putin mongolia visit आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (आयसीसी) कथित युद्ध गुन्ह्यांच्या संदर्भात पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
युक्रेन, रशिया आणि अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांशी स्नेहपूर्ण संबंध असलेले मोदी जगातील अत्यंत मोजक्या नेत्यांपैकी एक ठरतात. त्यामुळे त्यांचे म्हणणे हे तिन्ही…
पुतिन यांनी युक्रेनच्या उत्तरेस बेलारूसमध्ये व्यूहात्मत्मक अण्वस्त्रे तैनात केली असून यावर्षीच अणुयुद्धाचा सरावही केला आहे. त्यामुळे पुतिन यांची ही पोकळ…
रशिया-युक्रेनमधील युद्धादरम्यान अशा काही घटना समोर आल्या होत्या ज्यामध्ये भारतीय विद्यार्थी व तरुणांना नोकरीचं, शिक्षणाचं खोटं आश्वासन देऊन रशियाला पाठवण्यात…
आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी रशियाच्या अस्त्रखानमधील हाऊस ऑफ इंडियाचाही उल्लेख केला. अस्त्रखानमधील हाऊस ऑफ इंडिया काय आहे आणि त्याच्याशी गुजरातचा…