scorecardresearch

व्लादिमिर पुतिन Videos

व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) हे रशियाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. ते पहिल्यांदा ३१ डिसेंबर १९९९ रोजी रशियाचे (Russia) तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यानी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रशियाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २००० मध्ये पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झाले. ते ७ मे २००८ पर्यंत या पदावर होते. मात्र, रशियाच्या राज्यघटनेतील अटीनुसार त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होता आलं नाही. यावेळी त्यांचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव यांनी पुतिन यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं. त्यानंतर पुतिन ८ मे २००८ रोजी रशियाचे पंतप्रधान झाले.

सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यानंतर २०१२ ला पुतिन पुन्हा रशियाचे अध्यक्ष बनले. यानंतर २०१८ आणि २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे पुतिन यांनी रशियाच्या राज्यघटनेत बदल करून २०३६ पर्यंत स्वतः अध्यक्षपदाला मान्यता मिळवली. पुतिन यांनी रशियाची गुप्तचर यंत्रणा केबीजीमध्येही काम केलं आहे.
Read More
The government did not allow him to meet Putin Rahul Gandhi made a alligation
Rahul Gandhi: सरकारनं पुतिन यांना भेटू दिलं नाही, राहुल गांधींचा आरोप; म्हणाले…

Rahul Gandhi: युक्रेनमध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर…

ताज्या बातम्या