पारतंत्र्यामध्ये असताना बंगाली बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगालमध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही मोठ्या संख्येमध्ये होते. तेव्हा त्यांच्यामध्ये असलेली एकता नष्ट करण्यासाठी ब्रिटीशांनी हिंदू बहुसंख्याक असलेला पश्चिम बंगाल आणि मुस्लीम बहुसंख्याक असलेला पूर्व बंगाल असे बंगालचे विभाजन केले. त्यानंतर पूर्व बंगाल पाकिस्तानमध्ये गेला आणि पश्चिम बंगाल भारतामध्ये विलीन झाले. सत्तरच्या दशकामध्ये बांग्लादेश उदयास आला. पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशच्या सीमेशी संलग्न आहे. कोलकाता हे या राज्याची राजधानी आणि प्रमुख शहरांपैकी एक आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. या राज्यामधून कलेशी संबंधित अनेक जाणकार कलाकार आले आहेत. क्रिकेटपेक्षा फुटबॉलचे वेड असणारं हे एकमेव राज्य आहे. आधीच्या काळामध्ये येथे कॉंग्रेसची सत्ता होती. ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. त्या सध्या या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. बांग्लादेशामधून होणारे अनधिकृत स्थलांतर ही येथील प्रमुख समस्या आहे. Read More
World Bengal Business Conference : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीला बंगालचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले. यापूर्वी बॉलिवूडचा सुपरस्टार…
पश्चिम बंगालमधील कृष्णानगरच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे संसदेतील भविष्य निश्चित झालेले आहे. त्यांना हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये…
तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या आंदोलनाने प्रकल्पासाठी जबरदस्तीने शेतजमीन ताब्यात घेतल्याचा आरोप केल्यानंतर, टाटा मोटर्सने २००८ मध्ये…
पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यामुळे, गेल्या दीड वर्षांत गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अटक…
ज्योतीप्रिया मलिक २०१६-२०२१ या काळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. मात्र, रेशनिंग घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांच्याकडे वनमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.