यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ (Yavatmal) हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्यानं कापूस (Cotton) उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. Read More
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून प्रत्येक मंत्रिमंडळात यवतमाळ जिल्ह्यास संधी मिळाली आहे. त्यामुळे नुकत्याच बहुमतात आलेल्या महायुतीच्या होवू घातलेल्या सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील…
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत मतदारसंघातील साडेतीन, चार लाख मतदारांपर्यंत उमेदवाराला पोहचणे मोठे आव्हान असल्याने या काळात उमेदवारांचे संपूर्ण कुटुंबच प्रचारासाठी घराबाहेर…