अमेरिकी अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार कोण होणार हे ठरवणारी जाहीर चर्चेची पाचवी फेरी संपली. यात बहुसंख्य उमेदवारांना देशाच्या आर्थिक स्थितीचे कोणतेही भान नसल्याचेच प्रकर्षांने जाणवले. मात्र त्यांची युद्धखोर भाषा सर्वाची झोप उडवणारीच ठरली असणार..
अमेरिकी पद्धतीनुसार अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार जनताच ठरवते. म्हणजे पक्षाला वाटले आणि दिली एखाद्याला उमेदवारी ही चन तेथे नाही. ज्याला कोणाला उमेदवार व्हावयाचे असेल त्यास लोकांतून जिंकून यावे लागते. त्यासाठी प्रचार करावा लागतो आणि कोणत्या विषयावर आपली काय भूमिका आहे, ते जाहीर सांगावे लागते. या प्रथेस अनुसरून नोव्हेंबर २०१६ मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकांची मोच्रेबांधणी आता सुरू झाली असून डेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. परंतु रिपब्लिकन पक्षास असा उमेदवार ठरवणे अद्याप शक्य झालेले नाही. त्या उमेदवारी निश्चितीसाठी जाहीर वादांच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत. यात या पक्षाचे संभाव्य उमेदवार एकाच व्यासपीठावर आणले जातात आणि समोर जाणत्या प्रेक्षकवृंदासमोर खंडनमंडन झडते. दूरचित्रवाणी, विविध वृत्तवाहिन्यांवरून याचे जगभर थेट प्रक्षेपण केले जाते. अशा तऱ्हेने सर्व समाजच या चच्रेचा भाग होतो. त्यातून जनमत तयार होण्यास, तयार झालेले असल्यास बदलण्यास वा अधिक घट्ट होण्यास मदत होते. अशा चच्रेची पाचवी फेरी आपल्या वेळेनुसार मंगळवारी मध्यरात्री लासवेगास येथे पार पडली. अमेरिकेत काय होते त्यावर जगाचे आणि परिणामी आपलेही बरेच काही अवलंबून असल्याने अनेकांनी जागून ही चर्चा पाहिली. त्यानंतर सर्वाची झोप उडाली असणार याची आम्हाला खात्री आहे.
याचे कारण या उमेदवारांचा दर्जा आणि चच्रेची पातळी. या चर्चेत एकूण नऊ उमेदवारांनी भाग घेतला. हे सर्व म्हणजे यास झाकावा आणि त्यास काढावा, अशा लायकीचे. त्यात एकमेव महिला. त्यांचे नाव कार्ली फिओना. ह्य़ुलेट अँड पॅकर्ड या कंपनीच्या त्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी. त्या म्हणाल्या अमेरिकेस सध्या धर्यशील नेतृत्वाची गरज आहे आणि मी धर्यशील आहे. त्या धर्यशील का? तर कर्करोगास यशस्वी तोंड देऊन त्यांनी त्यावर मात केली आणि घरात अनेकांचे अकाली मरणही त्यांना सहन करावे लागले. त्यांच्या मते दहशतवाद्यांना संपवून टाकणे हा अमेरिकेस सुरक्षित करण्याचा एकमेव मार्ग. बेन कार्सन हे मज्जारज्जू आणि मेंदूचे विख्यात शल्यक. ते म्हणाले सध्या अमेरिकाच रुग्ण बनली असून तिला माझ्यासारखा शल्यकच वाचवू शकतो. पश्चिम आशियातील नरसंहाराविषयी त्यांनी केलेली विधाने शुद्ध बालिश म्हणता येतील अशी होती. बाकीच्या पाचांपकी एक नामांकित म्हणजे जेब बुश. ते विख्यात बुश घराण्यातील. माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे बंधू. हे देखील फ्लोरिडा राज्याचे गव्र्हनर आहेत. त्यांच्या मते विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेची लाज काढली असून जगात अमेरिकेला काहीही किंमत राहिलेली नाही. बुश यांनी प्राधान्याने हल्ला केला तो आपल्याच पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर. या ट्रम्प यांचे घोडे सध्या आघाडीवर असून ते वाचाळतेच्या मुद्दय़ावर आपल्याकडील गिरिराज सिंह, दोन पाच महंत किंवा गेलाबाजार प्रवीण तोगाडिया यांनादेखील लाजेने मान खाली घालावयास लावतील, अशी परिस्थिती आहे. बुश यांनी त्यांचे वर्णन मुक्त, गोंधळी अध्यक्ष असे केले. परंतु ही सर्व विशेषणे या गृहस्थाचे वर्णन करण्यास कमीच ठरतील. ट्रम्प म्हणाले, सर्व मुसलमान निर्वासितांना अमेरिकेने प्रवेशबंदी करावी. त्यांच्या मते इंटरनेटच्या महाजालाने सध्या या अतिरेक्यांना मोकळे रान मिळालेले आहे. तेव्हा ट्रम्प यांना इंटरनेटवरदेखील नियंत्रण आणावेसे वाटते. त्यासाठी त्यांनी सुचवलेला उपायदेखील भन्नाट म्हणावयास हवा. इंटरनेटच्या जालात शिरून आतमधून इस्लामी दहशतवाद्यांची संपर्क यंत्रणा उद्ध्वस्त करावयास हवी, असे त्यांना वाटते. परंतु इंटरनेटच्या जालात आतमध्ये शिरणे म्हणजे काय, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यांच्या एकंदर आविर्भावावर बुश म्हणाले, ट्रम्प यांना काहीही गांभीर्य नाही आणि ते वाटेल ते बोलतात. त्यावर ट्रम्प यांनी त्यांना जाहीर फटकारले. तुम्ही कितीही डोकेफोड केली तरी जनमताचा तुम्हाला असलेला पािठबा काही वाढताना दिसत नाही, असे ट्रम्प यांनी त्यांना सुनावले. हे ट्रम्प सध्या अमेरिकेत भलतेच लोकप्रिय आहेत. सर्वसाधारणपणे अतिटोकाची, भडकावू भाषा करणारे जनतेत लोकप्रिय होतात. ट्रम्प यांच्या उदाहरणावरून हेच सिद्ध होते. ते व्यवसायाने बिल्डर आहेत. जगातील सगळ्यात मोठय़ा बांधकाम व्यावसायिकांत त्यांची गणना होते. गतसाली ते दुबईत गेले असता त्यांना मुसलमानांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मुसलमान हे चांगलेच असतात असे त्यांचे उत्तर होते. ट्रम्प यांची मोठय़ात मोठी बांधकाम कंत्राटे ही पश्चिम आशियातील इस्लामी देशांत आहेत. त्यामुळे व्यवसायाचा प्रश्न आला की मुसलमानांचे लांगूलचालन करावयाचे आणि राजकीय पोळी मात्र त्यांच्या विरोधात हवा तापवून भाजून घ्यायची असे त्यांचे हे दुहेरी धोरण दिसते. त्याचमुळे मुसलमानांवर बंदी घाला या त्यांच्या विधानाचे दुबई, सौदी आदी पश्चिम आशियाई देशांत तीव्र पडसाद उमटत असून ट्रम्प यांनी आपल्या विधानांबाबत जराही खंत व्यक्त केलेली नाही. मुसलमान आपल्याला मारणार आणि आपण मात्र त्यांना मारायचे नाही, अशा आशयाचे अत्यंत आगलावे विधान त्यांनी या चच्रेत केले. अशा चर्चातून अमेरिकी उमेदवारांचे गाढ अज्ञान उघड होण्याची परंपरा या वेळीदेखील कायम राहिली. अफगाणिस्तान, इराकवर हल्ला करणारे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना पॅलेस्टाइन हे देशाचे नाव आहे की प्रदेशाचे हे माहीत नव्हते आणि ओपेक आणि एपेक यांतील भेद त्यांना समजत नव्हता. तीच परंपरा यावेळीदेखील दिसून आली. या चच्रेतील एक उमेदवार ख्रिस ख्रिस्ती यांनी आपल्या भाषणात जॉर्डनच्या राजे हुसेन यांचा वर्तमानकालीन दाखला दिला. परंतु राजे हुसेन १९९९ सालीच पगंबरवासी झाले असून त्याचा या संभाव्य अध्यक्षास गंधदेखील नव्हता. या सर्वाचे एका मुद्दय़ावर मात्र एकमत होते. तो म्हणजे आयसिस हा अमेरिकेला भेडसावणारा सगळ्यात मोठा धोका आहे आणि विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्या निष्क्रियतेमुळे तो वाढला आहे. आपण अमेरिकेचे अध्यक्ष झालो तर जेथे जेथे आयसिसचे अस्तित्व आहे तेथे हल्ला करून या संघटनेस समूळ नष्ट करण्याची युद्धखोर भाषा या सर्वाकडून केली जात होती. अमेरिका किती धोकादायक अवस्थेत जगत आहे आणि विद्यमान सरकारला जनतेची किंमतच नाही, हा मुद्दादेखील सगळ्यांच्या प्रतिपादनातून आवर्जून पुढे येत होता.
यातील सगळ्यात आश्चर्यकारक भाग म्हणजे एकाच्याही प्रतिपादनातून अमेरिकेसमोरील आíथक आव्हानांचा विषयदेखील आला नाही. सगळ्यांचा भर होता तो आयसिस आणि इस्लामी दहशतवाद यांचा बागुलबुवा पुढे करून जनतेत भीती निर्माण करण्यावर. रिपब्लिकन पक्ष सनातनी मूल्यांसाठी ओळखला जातो. त्याचेही दर्शन या चच्रेतून आणि उमेदवारांच्या वागण्यातून होत होते. वास्तविक अमेरिकेच्या युद्धखोर वृत्तीनेच जगास संकटात टाकले असून त्याची कसलीही जाणीव एकाही उमेदवाराच्या प्रतिपादनातून दिसली नाही. उलट सर्वच जण आपण अधिकाधिक युद्ध करून अमेरिकेस पुन्हा कसे गतवैभव प्राप्त करून देऊ असेच सांगत होते. तेव्हा या अर्धवटरावांची ही चर्चा कोणाही विचारी जनांना घाम फोडणारी होती, हे नि:संशय.

Wardha Lok Sabha, Ramdas Tadas, Amar Kale,
वर्धा : नात्याचा ताण अन निवडणुकीत निघतोय घाम! जावई – सासरा, सासरा – सून, मामा – भाचा असे…
sharad pawar wardha lok sabha election 2024
शरद पवार वर्धेच्या लोकसभा लढतीत एवढे स्वारस्य का दाखवताहेत? जाणून घ्या यामागील कारण…
Bahujan Samaj Party
मायावती लोकसभेसाठी ‘आत्मनिर्भर’; १६ जागांसाठी जाहीर केले उमेदवार
Parbhani, Vitekar
महायुतीकडून परभणीत विटेकर की बोर्डीकर ? भाजपमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात नाराजी