22 January 2018

News Flash

नवनैतिकतेची नौटंकी

येनकेनप्रकारेण मिळेल त्या राज्यात सत्ता मिळवणे हे भाजपचे अलिखित ध्येय आहे, हे आता बिहारातही दिसले..

लोकसत्ता टीम | Updated: July 28, 2017 3:56 AM

नितीशकुमार (संग्रहीत छायाचित्र)

येनकेनप्रकारेण मिळेल त्या राज्यात सत्ता मिळवणे हे भाजपचे अलिखित ध्येय आहे, हे आता बिहारातही दिसले..

भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर राजीनामा देणाऱ्या नितीशकुमार यांचे अभिनंदन केल्यानंतर काही तासांत तामिळनाडूतील रामेश्वरम येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्मा जयललिता यांच्या अनुपस्थितीबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांच्या निधनाने तयार झालेली पोकळी जाणवते असे मोदी म्हणाले आणि आपल्यावर त्या आशीर्वादांचा वर्षांव करीत असतील अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. जयललिता यांची चारित्र्यसंपन्नता, नैतिकता आदी गुणांच्या आठवणीने पंतप्रधान मोदी यांचा कंठ दाटून आला किंवा काय, हे कळावयास मार्ग नाही. परंतु त्यांच्या या वक्तव्याने आणि भाजपच्या एकंदरच वर्तनाने तो पक्षदेखील सत्तेसाठी नेसूचे काढून डोक्यास गुंडाळण्यास किती आतुर आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले. वास्तविक या देशात याआधी पक्षांतरे झालीच नाहीत, असे नाही. सत्तेसाठी स्वत:चा पक्षच दुसऱ्या पक्षात विलीन करण्याचे प्रकारही अनेकदा घडले. परंतु संयुक्त जनता दलाचे नितीशकुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या भाजपने जे काही केले त्यास तोड नाही. ‘भारत हा रास्व संघमुक्त झाला पाहिजे,’ ‘मोदी हे वादळ नाही, ही तर हेअरड्रायरची झुळूक’, ‘मोदी हे ‘संप्रदायी’ आहेत,’ अशी तडफदार विधाने करणाऱ्या नितीशकुमार यांनी आपली तडफ अखेर म्यान केली आणि भाजपच्या साथीने नवीन घरोबा सुरू केला. गेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात उभ्या ठाकलेल्या नितीश यांच्यावर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांच्या जनुकांतच दोष असल्याची टीका केली. नितीश नेहमी मित्र म्हणवणाऱ्यांनाच दगा देतात, असे मोदी यांचे म्हणणे. त्यास नितीशकुमार यांनी घणाघाती हल्ल्याने प्रत्युत्तर देत ५० हजार बिहारींच्या जनुकांचे नमुनेच त्या वेळी मोदी यांच्याकडे पाठवू पाहिले.

आज ते स्वत:च मोदी यांच्यासमोर दाखल झाले. त्यांच्या लालू हटाव नाटकाची सुरुवात केंद्रीय गुप्तचर खात्याने लालूपुत्रांवर केलेल्या कारवाईतूनच सुरू झाली. किंबहुना नितीश यांना लालूंशी सहज काडीमोड घेता येऊन भाजपशी पाट लावता यावा या हेतूनेच लालूपुत्रांवर कारवाई सुरू झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लालूंच्या भ्रष्ट उद्योगांविषयी आणि ते व त्यांच्या कुटुंबीयांवर होणाऱ्या कारवायांविषयी सहानुभूती बाळगण्याचे काहीही कारण नाही. या यदुवंशीयाने केवळ बिहारलाच नव्हे तर साऱ्या देशालाच लुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा यादवांच्या या थव्यांना रोखण्याची गरज होती, हे मान्यच. पण मुद्दा लालू आणि भ्रष्टाचार हा नाही. तर तो नितीशकुमार आणि भाजप यांच्या तद्दन भंपकपणाचा आहे. नितीशकुमार यांना भ्रष्टाचाराची इतकी चाड होती तर पहिल्यांदा त्यांनी लालूंशी हातमिळवणीच करायला नको होती. दुसरे असे की त्यांना निधर्मीवादाची इतकी असोशी होती तर त्यांनी मुदलात भाजपशीही हातमिळवणी करायला नको होती. हे दोन्ही उद्योग त्यांनी केले. म्हणजेच नितीशकुमार यांना ना भ्रष्टाचाराची चाड आहे ना धर्मवादी राजकारणाची. राजकारणाचे गुन्हेगारीकरण या सदाबहार बिहारी विषयावरही नितीशकुमार सज्जनतेचा आव आणत बोलतात. परंतु खुद्द त्यांच्याच पक्षाच्या त्यांच्याच नेतृत्वाखालच्या विधिमंडळ गटात तब्बल ४७ आमदारांवर लहानमोठय़ा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. म्हणजे फक्त लालू एकटेच पापी आणि अन्य मात्र संतमहंतांची मांदियाळी असे चित्र नाही. नितीशकुमार तर या सगळ्याला अपवाद अजिबातच नाहीत. मिळेल त्याच्या मदतीने बिहारची गादी सांभाळायला मिळावी इतकीच काय ती त्यांची इच्छा. पण दरम्यानच्या काळात नितीशकुमार हे कोणी मोठे साव आहेत आणि ते पर्यायी नेतृत्व देऊ शकतात असे हाकारे निधर्मीवाद्यांच्या कळपातून घातले गेले. त्याही वेळी आम्ही यामागील फोलपणा दाखवून दिला होता. आताही तोच दाखवून द्यावा लागणार आहे. याचे कारण बिहारची सत्ता मागच्या दाराने बळकावण्याचा भाजपचा प्रयत्न. देशभरात मोदी लाट असतानाही बिहार विधानसभेने भाजपच्या पदरात सत्तेचे दान टाकले नाही. लोकसभा निवडणुकांच्या देदीप्यमान यशाच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांत उलट बिहारी जनतेने भाजपचे नाक कापले. हा सल भाजपला सतत होता. ४० खासदार संसदेवर पाठवणारा बिहार आपल्या हाती असायला हवा ही भाजपची आस होती. ती सरळ मार्गाने पूर्ण होण्याची शक्यता नाही आणि नव्हतीही. त्यात जर नितीशकुमार हे महागठबंधन नामक अजागळ आघाडीचे नेते निवडले गेले असते तर भाजपसमोर २०१९ साली आणखीनच आव्हान निर्माण झाले असते. उत्तर प्रदेशात ८० पैकी ७२ खासदार भाजपचे आहेत. उत्तर प्रदेशाखालोखाल ४८ खासदारांना निवडणारा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु कृषी क्षेत्रावरील संकट आणि शिवसेनेचे आव्हान यामुळे पुढील निवडणुकांत तो कसा वागेल याची शाश्वती नाही. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश आदी बडय़ा राज्यांचीही शाश्वती नाही. अशा वेळी बिहारसारख्या राज्यातील परिस्थिती अनुकूल असणे भाजपसाठी आवश्यक होते. त्यामुळेच केंद्रीय गुप्तचर आदी यंत्रणांचा पद्धतशीर वापर करून आधी लालू आणि नितीश यांच्या घटस्फोटाची रीतसर व्यवस्था केली गेली आणि तो झाल्या झाल्या हाती वरमाला घेऊन टपूनच बसलेल्या भाजपने क्षणाचाही विलंब न लावता नितीशकुमार यांचा सत्तेचा मळवट पुसला जाणार नाही, अशी चोख तडफ दाखवली. व्यावहारिक भाषेत या कृत्यास व्यभिचार असे म्हणतात. काँग्रेस, लालू यांचा राजद, मुलायम सिंग यांचा सपा आदी पक्ष हे इतके दिवस अशा राजकीय व्यभिचाराचा आपला लौकिक राखून होते. पण यापुढे त्यांना या आघाडीवरही भाजपच्या कडव्या आव्हानास तोंड द्यावे लागणार आहे. तेव्हा भ्रष्टाचार विरोध, निधर्मी राजकारण आदी शब्दप्रयोग हे केवळ थोतांड आहेत. मोदी म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या पक्षास भ्रष्टाचाराची इतकीच चाड असती तर व्यापम ते छत्तीसगडी मंत्र्यांच्या पत्नीचा जमीन घोटाळा यातील एका तरी प्रकरणाची तड भाजपने लावली असती. तसेच उत्तरेतील नारायण दत्त तिवारी यांच्यापासून ते दक्षिणेतील एसएम कृष्णा यांच्यापर्यंत एकापेक्षा एक भणंगभरती भाजप करता ना. या दोहोंच्या मधल्या महाराष्ट्रातही भाजपत जे नामांकित गणंग भरले गेले तेदेखील मोदी यांच्या कथित भ्रष्टाचारविरोधी भूमिकेशी सुसंगत नाही. याचा अर्थ इतकाच की येनकेनप्रकारेण मिळेल त्या राज्यात सत्ता मिळवणे हे भाजपचे अलिखित ध्येय आहे. गोवा, मणिपूर आणि आता बिहारात जे काही घडले त्यातून ते उघड दिसते. हे उद्योग करताना २०१९ वर भाजपचा डोळा आहे आणि त्यासाठी हे बेरजेचे राजकारण सुरू आहे. परंतु या संदर्भात एक धोक्याचा इशारा द्यायलाच हवा.

तो म्हणजे राजकारणात दोन अधिक दोन याचे उत्तर चार असतेच असे नाही. ते प्रसंगी तीनदेखील असू शकते. म्हणजेच या सगळ्यांना बरोबर घेत गेल्याने यांच्या कथित शक्तीची आपल्या कथित शक्तीशी बेरीज होऊन आपले संख्याबळ वाढेल असा जर भाजपचा होरा असेल तर ते तसे होईलच असे नाही. याचे कारण असे करणे म्हणजे मतदारांना गृहीत धरणे. ते तसे धरले गेले की काय होते याचे असंख्य दाखले भारतीय राजकारणाच्या इतिहासात पावलोपावली मिळतील. त्यात मोदी आणि शहा यांच्या साहसवादी राजकारणाच्या उदाहरणाची भर पडणारच नाही असे नाही. मतदार म्हणजे भक्त नव्हेत. नैतिकता आणि नवनैतिकतेची नौटंकी यातील फरक त्यांना निश्चितच कळतो.

First Published on July 28, 2017 3:56 am

Web Title: nitish kumar back as bihar cm with nda support
टॅग Nitish Kumar
 1. V
  vikas
  Aug 1, 2017 at 5:30 pm
  तुमचा टेन्शन वाढलं आता कुबेर भाजप्पा सगळ्या देशात झालीय लवकरच तुझ्यासारख्या चोरांना jail ची हवा खायला भेटणार आहे इतकं दिवस काँग्रेस पैसे खाऊ घालत होती आता मोदी देत नाही फालतू अग्रलेख ह्यांचा काँग्रेस ला बिहारमधून हाकल
  Reply
  1. A
   Avadhoot
   Jul 31, 2017 at 6:24 pm
   "आधी लालू आणि नितीश यांच्या घटस्फोटाची रीतसर व्यवस्था केली गेली आणि तो झाल्या झाल्या हाती वरमाला घेऊन टपूनच बसलेल्या भाजपने क्षणाचाही विलंब न लावता नितीशकुमार यांचा सत्तेचा मळवट पुसला जाणार नाही, अशी चोख तडफ दाखवली. व्यावहारिक भाषेत या कृत्यास व्यभिचार असे म्हणतात." - ह्यावरून भाजपला 'शनाया' नाव द्यावे का?
   Reply
   1. V
    vijay
    Jul 30, 2017 at 10:47 pm
    तस्लिमा नसरीन यांच्याकडे वैध व्हिसा असूनसुद्धा त्यांना आज पुरोगामी महाराष्ट्रात एम आई एमच्या दहशतीने पोलिसांनी औरंगाबाद विमानतळावरून मुंबईकडे रवाना केले यावर उद्या संपादक लेख लिहितील अशी अपेक्षा आहे.
    Reply
    1. A
     amodkumar
     Jul 30, 2017 at 12:15 pm
     सांप्रत काळात जी राजकीय संस्कृती माजली आहे त्यास काँग्रेसचं जबाबदार .
     Reply
     1. S
      sam
      Jul 30, 2017 at 12:08 pm
      Do not under estimate powerof common man.
      Reply
      1. S
       Sachin
       Jul 30, 2017 at 8:10 am
       What rubbish instead of taking about how corrupt was lalu अँड his family write just know how to have bjp, worst writer ever seen.
       Reply
       1. S
        sam
        Jul 29, 2017 at 6:41 pm
        Samradayikta aani bhrastachar ya madhe konta changla paryay aahe? BJP sampradayik an Congress bhrastachari asha parish it Jante pudhe changla paryay aahe ka?
        Reply
        1. R
         rajesh
         Jul 29, 2017 at 11:11 am
         नितीश कुमारांचे अभिनंदन, भ्रष्टाचारी काँग्रेस आणि लालू ला सत्तेपासून दूर केल्याबद्दल.
         Reply
         1. R
          Rahul
          Jul 29, 2017 at 10:28 am
          Congresschya bhrastacharacha mala kara aahe pan tarihi Congress kamjor hotana pahun dukh hote karan Congress kamkuvat hone mhanje deshatil ek pramukh Secular shakti kamjor hone.
          Reply
          1. M
           milind
           Jul 29, 2017 at 12:58 am
           कारवाई न करता भ्रष्ट खडसेना बाहेर बसवणे पंकजा मुंडेचे खाते काढून घेणे मध्यप्रदेशातील शिवराज चौहान यांचा खुंखार व्यापमरुपी राक्षस,वैकय्या नायडू,बंगारु लक्ष्मण,स्मृती इराणी. मुंबईतील बारहिल डोंगरावर शेती करणारे आणि दुष्काळ पडला म्हणून आत्महत्या करणारे शेतकरी त्यांची कर्जमाफी. रात्रीच्या अंधारतील पारदर्शक टेंडर, सिंचन घोटाळा 2जी घोटाळा कोलगेट घोटाळा यावर उठवलेलं रान.त्या तमाशाचे पुढे काय झाले माहीत नाही.नोटबंदी त्यातील बळी,सीमेवर दररोज शहीद होणारे जवान.पाकिस्तान चीनच्या धमक्या.परराष्ट्र धोरण.शेतकरी आत्महत्या,कर्जमाफी,मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार गुंडांच्या तावडीतून सुटका करा म्हणणारे त्याच गुंडांच्या बिछान्यात गरम सत्तेची ऊब मिळवत आहेत.हे सगळे मुद्दे विचारात घेता भाजप शुद्ध परमपवित्र आहे भ्रष्ट नाही असे म्हणण्याची हिंमत होत नाही.मुद्दे हजारो आहेत.मात्र विरोधकच मूर्खासारखे अवसान गाळून बसलेत.सर्वच विरोधीपक्ष देशपातळीवर एक झाले नाहीत तर एकूण परिस्थिती पाहता विरोधकांना या आळसाची जबर किंमत 2019लाही चुकवावी लागेल असेच चित्र दिसत आहे.अनुषंगाने सामान्य माणसांच्या हालअपेष्टा आणखी वाढणार
           Reply
           1. A
            A.A.houdhari
            Jul 28, 2017 at 9:49 pm
            आणि नितीशकुमारने तेच केले. पण स्वतः स्वच्छ राहून. बिहारच्या गरीब लोकांच्या भल्या साठी. ा वेळा नाही तरी १०० वेळा तो मुख्यमंत्रि झाला तर काय फरक पडतो? तेजस्वी आणि लालू, तसेच खांग्रेस सारखी घराणे शाही तर केली नाही? किंवा एकाच घराण्या भोवती सत्ता हडपली नाही ?कशाला नितीशला बोल लावता ?
            Reply
            1. S
             sanjay
             Jul 28, 2017 at 8:22 pm
             काँग्रेस ने जे इतकी वर्षे केले तोच डाव त्यांच्यावर उलटलेला आहे त्यात काय खोटे आहे ! राजकारणात सर्व जायज असते ! कमीतकमी भाजप चांगले कामकारात आहे (जे तुमच्यासारखे मोदीविल (कावीळ) झालेल्यांना दिसणार नाही) -परंतु काँग्रेसस ने नुसता भ्रष्टाचार केला ! इंदिरा च्या वेळेस तर असल्या चाली ती बाया कायम करत होती-कोणालाही टिकू दिले नाही इतकेच काय स्वतःच्या पक्षात सुद्धा कोणालाही डोके वर काढू दिले नाही
             Reply
             1. N
              Nilesh
              Jul 28, 2017 at 8:20 pm
              कॉग्रेस च्या सत्ता काळात सुद्धा संपादक चुकीच्या गोष्टींवर असेच परखड लेख लिहीत होते हे उर्मिला , समीर यासारख्यांनी लक्षात घ्यावे .....बाकी लेख उत्तमच .....
              Reply
              1. V
               vishal
               Jul 28, 2017 at 6:56 pm
               उद्या "वंदे मातरम" म्हणणार नाही असा म्हणणाऱ्या लोकांवर एक अग्रलेख येऊ दे.. बघू तुमची निर्भीड पत्रकारिता... भक्तांना एक तरी धक्का द्याच..
               Reply
               1. M
                milind
                Jul 28, 2017 at 5:41 pm
                कारवाई न करता भ्रष्ट खडसेना बाहेर बसवणे पंकजा मुंडेचे खाते काढून घेणे मध्यप्रदेशातील शिवराज चौहान यांचा खुंखार व्यापमरुपी राक्षस,वैकय्या नायडू,बंगारु लक्ष्मण,स्मृती इराणी. मुंबईतील बारहिल डोंगरावर शेती करणारे आणि दुष्काळ पडला म्हणून आत्महत्या करणारे शेतकरी त्यांची कर्जमाफी. रात्रीच्या अंधारतील पारदर्शक टेंडर, सिंचन घोटाळा 2जी घोटाळा कोलगेट घोटाळा यावर उठवलेलं रान.त्या तमाशाचे पुढे काय झाले माहीत नाही.नोटबंदी त्यातील बळी,सीमेवर दररोज शहीद होणारे जवान.पाकिस्तान चीनच्या धमक्या.परराष्ट्र धोरण.शेतकरी आत्महत्या,कर्जमाफी,मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार गुंडांच्या तावडीतून सुटका करा म्हणणारे त्याच गुंडांच्या बिछान्यात गरम सत्तेची ऊब मिळवत आहेत.हे सगळे मुद्दे विचारात घेता भाजप शुद्ध परमपवित्र आहे भ्रष्ट नाही असे म्हणण्याची हिंमत होत नाही.मुद्दे हजारो आहेत.मात्र विरोधकच मूर्खासारखे अवसान गाळून बसलेत.सर्वच विरोधीपक्ष देशपातळीवर एक झाले नाहीत तर एकूण परिस्थिती पाहता विरोधकांना या आळसाची जबर किंमत 2019लाही चुकवावी लागेल असेच चित्र दिसत आहे. अनुषंगाने सामान्य माणसांच्या हालअपेष्टा आणखी वाढणा
                Reply
                1. विनोद
                 Jul 28, 2017 at 3:54 pm
                 प्रात:स्मरणीय असणार्या बंगारू लक्ष्मण या महात्म्याला वंदन करून भ्रष्टाचाराविरूद्ध तमाम भक्तांनी रणशिंग फुंकले आहे. बंगारू लक्ष्मण यांची कृपा सर्वांवर राहाे.
                 Reply
                 1. विनोद
                  Jul 28, 2017 at 3:50 pm
                  मिलींद ची प्रतिक्रीया अत्युत्कृष्ट. नेमक्या शब्दांत सद्यस्थितीचे आणी इतिहासाचे वर्णन केले आहे. भक्तांच्या ढुंगणाला मिरच्या झाेंबतील. समीर देशमुख उर्फ जाेशीबुवा, तापट साहेब, देशपांडे काका , शहाताई इ. च्या प्रतिक्रीया आडनावाला साजेशा म्हणजेच दुर्लक्षीत करव्यात अशा !
                  Reply
                  1. समीर देशमुख
                   Jul 28, 2017 at 2:41 pm
                   विनोद उर्फ प्रवीण मुखेडकर, उगी उगी बाळ! तुझी अवस्था मी समजु शकतो. जास्त त्रास करून घेऊ नकोस, घरात बर्नाॅल पडला असेल तो लाव आणि संपादक महाशयांना पण पाठवून दे. तेवढाच आराम पडेल. बर एवढ वय झालय तरी लहान लेकरासारख वागण नाही शोभत तुला. अरे मी तर विसरलोच की तु तर 46 वर्षांच्या परंतु मॅच्युरिटी न आलेल्या नेत्याचा चाटु आहेस. आता तु तर तुझ्या नेत्यासारखाच वागणार नाही का? आणि हो रिकामचोट व बालिश प्रतिक्रिया देऊन लोकांचे मनोरंजन करत रहा. आता नेहमी नेहमी तुमचे लाडके नेते टीव्ही वर येत नाहीत. त्यामुळे आम्हाला हसवणार कोण? 😂😁😀
                   Reply
                   1. R
                    Rakesh
                    Jul 28, 2017 at 2:22 pm
                    उर्मिला ताई विरोधकांना बैल म्हणतात. त्या ज्या पक्षाला सपोर्ट करतात तो पक्ष गाईला माता मानतो.
                    Reply
                    1. चंद्रशेखर साने
                     Jul 28, 2017 at 2:21 pm
                     मतदार म्हणजे जसे भक्त नाहित तसे नमोरुग्ण पण नाहीत संपादका
                     Reply
                     1. M
                      milind
                      Jul 28, 2017 at 2:17 pm
                      लेख अर्धवट आहे की काय असे वाटले.असो. लालू तयार असते तर भाजप नितीशला कोंडीत पकडून लालूसोबत झोपायला तयार झाले असते.भाजप म्हणजे कोणताही नैतिक प्रामाणिक विचार नसणारा पक्ष. सत्तेसाठी उद्या पाकिस्तानात हिजबुल सोबत शय्यासोबत करावी लागली तर तेही करतील.जयललिता यांचा भ्रष्ट कारभार इकडे महाराष्ट्रात शरद पवार यांचे बोट धरणे,त्यांचे भ्रष्ट नेते पक्षात घेऊन गोमूत्र आदी शिंपडून "पवित्र"करून घेणे अशी अचाट दिव्य या देशात फक्त भाजपच करू शकते. वर आम्हीच कसे परमपवित्र हेही गोबेल्सबाबाच्या नीतीने ठसवतील.पुराणकाळापासून एक वर्गाने समाजमनावर भूल प्रसवून राज्य केलं सत्ता गाजवली ती कशी हे आज भाजपचे उद्योग पाहून स्पष्ट कळते.लोक तेव्हाही भोळे यडबम्बू होते. लोक आजही तसेच आहेत.धर्माची आणि धार्मिक प्रतिकांची नशा ही अशी असते.आपल्या मूल गरजा हक्क अधिकार यापेक्षा या अस्मिता जीवन मरणाचा प्रश्न म्हणून बिंबविल्या आणि स्वीकारल्या जातात.
                      Reply
                      1. Load More Comments