24 April 2018

News Flash

आले ट्रम्पोजींच्या मना..

अमेरिकेने पाकिस्तानला असे जाहीर दटावून मदत बंद केली तर हेच इस्लामी देश पुढे येऊन उघडपणे पाकिस्तानची तळी उचलतील.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानची मदत बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचे आपण स्वागतच करायला हवे.परंतु..

‘‘आपण कोणाची ठेवत नाही, मनात आले की बोलून टाकतो,’’ ही भाषा आणि बाणा नाक्यावरच्या नायकांना शोभून दिसतो. महासत्तेच्या प्रमुखास निश्चितच नाही. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे मान्य नसावे. पाकिस्तानसंदर्भातील त्यांचे ताजे वक्तव्य हे त्यांचे असे नाक्यावरचे नायकत्व दाखवून देणारे आहे. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीसंदर्भातील कोणतेही संकेत ट्रम्प यांना मान्य नाहीत. किंबहुना सगळेच नियम अमान्य असल्याने शक्यता अशी की एखादवेळेस ते स्वत:च स्वत:ला नाकारण्यासदेखील कमी करणार नाहीत. असो. तूर्त त्यांच्या पाकिस्तानविषयक विधानामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची चर्चा करणे गरेजेचे आहे. कारण पाकिस्तानची मदत थांबवण्याच्या अमेरिकी अध्यक्षांच्या या विधानांमागे विद्यमान सरकारचे प्रयत्न आहेत, अशी ट्रम्प यांच्या बौद्धिकबांधवांना शोभेशी विधाने आपल्याकडे उमटू लागली असून अशा वेळी ट्रम्प यांच्या कृतीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा अंदाज येणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे ट्रम्प यांचे हे विधान पाकिस्तानचा खोटेपणा उघडा पाडण्यापेक्षा आधीच्या डेमॉक्रॅटिक पक्षाचे कथित पाकांधळेपण चव्हाटय़ावर आणण्यासाठी आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाने पाकिस्तानला सतत पाठीशी घातले आणि त्याचा तोटाच अमेरिकेला झाला, असा वास्तवात ट्रम्प यांच्या म्हणण्याचा अर्थ. तोच मुळात खोटा आहे. याआधीही अनेक अमेरिकी सरकारांनी पाकिस्तानची मदत कमी करण्याचा वा थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ट्रम्प आणि त्यांचे पूर्वसुरी यांच्यातील फरक इतकाच की या सगळ्याची जाहीर वाच्यता आधीच्यांनी केली नाही. जे करावयाचे आहे तेच करावयाचे पण आपण हे करीत आहोत हे बोलून तेवढे दाखवायचे नाही, हा मुत्सद्देगिरीतील पहिला नियम. ट्रम्प यांनी तोच मोडला. आणि एकदा का परराष्ट्र संबंधांसारखे गंभीर विषय असे ट्विटरादी समाजमाध्यमांत आले की उभय बाजूंना आपल्या भूमिका अधिक ताठर कराव्या लागतात. तसे करणे अडचणीचेच असते. कारण निर्णय जाहीर झाला की नागरिकांच्या मनात त्या निर्णयाचे दृश्य परिणाम प्रतिमान तयार होते. अशांतून सामुदायिक समाजमनाची म्हणून एक प्रतिक्रिया तयार होते. ती एकदा का तयार झाली की व्यवस्थेस पुढील निर्णय हे त्या प्रतिमेच्या दबावापोटीच घ्यावे लागतात. म्हणून अमेरिकेच्या अनेक माजी अध्यक्षांनी पाकिस्तानविषयक अनेकदा कडक भूमिका स्वीकारली. परराष्ट्रमंत्री असताना हिलरी क्लिंटन यांनादेखील पाकिस्तानविषयी सहानुभूती होती असे नव्हे. १९८५ आणि नंतर लॅरी प्रेस्लर यांनी अमेरिकी प्रतिनिधी सभागृहात मांडलेला ठराव हा पाकिस्तानी मदतीवर नियंत्रण आणणारा होता. या प्रेस्लर नियमामुळे पाकिस्तानची चांगलीच अडचण झाली होती. परंतु म्हणून त्या वेळी कोणा अमेरिकी अध्यक्षाने त्याबाबत जाहीर विधाने केली असे कधी घडले नाही. परंतु इतरांनी शहाणपणाचा भाग म्हणून न केलेली कृत्ये करून दाखवणे असा पणच ट्रम्प यांनी केलेला असल्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी जाहीरपणे इतकी टोकाची भूमिका घेतली. प्रत्येक भारतीयास त्यामुळे आनंद होणे हे साहजिक असले तरी हा आनंद अत्यंत अल्पजीवीच ठरण्याचा धोका अधिक.

याचे कारण यामुळे पाकिस्तानी राज्यकत्रे इस्लामी कट्टरपंथीयांकडे ढकलले जातील. त्यांना तसे करण्याखेरीज दुसरा पर्यायच राहणार नाही. ट्रम्प यांच्या ताज्या विधानांमुळे तेथील सामान्य नागरिकांच्या मनातही अमेरिकेविरोधात भावना तयार होणार असून त्यामुळे अमेरिकेच्या जवळ जाण्याचा कोणताही निर्णय हा लांगूलचालनाच्या भावनेतून पाहिला जाईल. आधीच पाकिस्तानी राजकारणात नेमस्तांची संख्या अत्यल्प. त्यात पुन्हा आयएसआयचे पाक प्रशासनावर, त्यातही विशेषत: लष्करी प्रशासनावर, असलेले नियंत्रण. या घटकांचा कोणत्याही प्रश्नासंदर्भात चर्चा वगरे माध्यमांवर विश्वास नाही. याचे कारण भडक भूमिकांत त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. या संदर्भात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यातील चच्रेस तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कसा सुरुंग लावला त्याचे कारगिल उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहेच. अशा परिस्थितीत मिळेल त्या मार्गानी त्या देशातील मध्यममार्गीना कसे बळ देता येईल हे पाहण्याची गैरेज असताना ट्रम्प यांनी एकाच ट्वीटद्वारे त्या सर्वाना वाऱ्यावरच सोडले. त्या देशातील आणि त्या देशाच्या धार्मिक परिघातील कट्टरपंथीयांना यामुळे पुन्हा जोर चढणार असून त्यातूनच इस्लामी देशांची अशी एक आघाडी तयार होणार हे उघड आहे. गेल्या महिन्यात या अमेरिकी अध्यक्षाने कोणाची पत्रास न बाळगता, विवेकास रजा देऊन जेरुसलेम हे शहर ही इस्रायलची राजधानी म्हणून एकतर्फी घोषणा केली. त्याची गैरेज नव्हती. पुढे तो निर्णयच संयुक्त राष्ट्र आमसभेने धिक्कारून अमेरिकेचे नाक कापले. संयुक्त राष्ट्रे इतक्या उघडपणे अमेरिकेविरोधात गेल्याचे दुसरे मोठे उदाहरण नाही. हे ट्रम्प यांच्यामुळे घडले. त्याचा दुसरा परिणाम असा की इस्लामी देशांची म्हणून एक अप्रत्यक्ष आघाडी झाली. तिचे नेतृत्व अमेरिकाविरोधी टर्कीचे प्रमुख एर्दोगान यांनी केले. आताही असाच धोका संभवतो. अमेरिकेने पाकिस्तानला असे जाहीर दटावून मदत बंद केली तर हेच इस्लामी देश पुढे येऊन उघडपणे पाकिस्तानची तळी उचलतील. हे सगळे टळेल ही अमेरिकेची आशा एकाच घटकावर अवलंबून आहे. सौदी राजपुत्र सलमान. या परिसरातील इस्लामीकरणास सौदीने नेहमीच मदत केलेली आहे. परंतु नवीन सौदी राजपुत्र सलमान हा तूर्त अमेरिकेच्या प्रभावाखाली असून तो असे अमेरिकाविरोधी काही करणार नाही, असे ट्रम्प यांना वाटते. इतिहासात वरवर डोकावले तरी आपला अरेबिया अंदाज किती चुकू शकतो हे ट्रम्प यांना कळेल. परंतु इतिहास, संकेत, परंपरा, मुत्सद्दीपणा वगरेचे त्यांना तीव्र वावडे असल्याने हे काही त्यांना समजून घ्यावयाचेच नाही, असे दिसते.

परंतु आपण तसे करून चालणारे नाही. याचे कारण अमेरिकेने पाकिस्तानचे नाक दाबले तर त्याची पहिली प्रतिक्रिया ही आपल्या विरोधात असणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तान अमेरिकेविरोधात उघडपणे काही करू शकत नाही. ते त्या देशास झेपणारे नाही. अशा वेळी अमेरिकेविरोधात राग व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानला आपणच सापडणार हे उघड आहे. याचा सरळ अर्थ म्हणजे पाकिस्तानच्या आपल्या विरोधातील कारवाया वाढणार. तसे ते वाढवणे हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांसाठी जागतिक पातळीवर सोयीचे आहे. त्या देशातील बलुचिस्तानातील अशांततेस आपली मदत असल्याची कबुली याआधी आपण दिलेलीच आहे. अशा वेळी आपल्या विरोधात रडगाणे गाण्यासाठी पाकिस्तानला या सगळ्याचा उपयोग सहज होणार हे समजून घेणे अवघड नाही. हे काहीही लक्षात न घेता ट्रम्प यांच्या पाकिस्तानविरोधातील आगपाखडीमागे आपली मुत्सद्देगिरी आहे हे आपले विधान निव्वळ हास्यास्पद ठरते. म्हणजे शहाणपणाचा अभाव दर्शवणाऱ्या ट्रम्प यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया त्याच्याच जातकुळीत बसते. पाकिस्तान विरोधात आहे म्हणून आपण आनंदच मानायला हवा हा बालिशपणा त्यातून दिसतो. खरे तर त्या देशात  स्थिर सरकार असणे हे आपल्या हिताचे आहे. ट्रम्प यांच्या जाहीर विधानाने ती शक्यता आता अधिकच धूसर बनते.

म्हणजे पाकिस्तानची मदत बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचे आपण स्वागतच करायला हवे. परंतु ते करताना ही मदत बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी मुत्सद्देगिरी दाखवली असती तर त्याचा अपेक्षित परिणाम झाला असता. परंतु ‘आले ट्रम्पोजींच्या मना..’ या कार्यशैलीने घात केला. काय मिरवायचे हे जसे कळावे लागते तसेच काय मिरवायचे नाही हे देखील कळावे लागते.

First Published on January 3, 2018 1:53 am

Web Title: trump threatens to cut pakistan aid donald trump us pakistan relations
 1. Avadhut Joshi
  Jan 7, 2018 at 9:20 pm
  वाह पराग आपण खूपच मार्मिक आणि खरे लिहिले आहे- असल्या देशविघातक संपाद्कनाबद्दल
  Reply
  1. moses borgavkar
   Jan 5, 2018 at 6:50 pm
   आले ट्रॅम्पोजीच्या मना ... हा विनोदी लेख असावा असे वाटते. किंवा वाचकांना छेडण्यासाठी या लेखाचे प्रयॊजन असावे.
   Reply
   1. P
    Parag
    Jan 3, 2018 at 11:25 pm
    पाकिस्तानविरुद्ध कोणीही काहीही बोलले की लगेच या लोकसत्ता संपादकाचे डोके फिरते. मागे भारताचे प्रवक्ते आणि लष्करी अधिकारी असलेले आणि ऑलिम्पिक ब्रॉन्झ पदक विजेते असलेले (ज्यांच्या पायताणपाशी देखील बसण्याची या संपादकाची लायकी नाही) अशा लष्करी अधिकारी राज्यवर्धन राठोड यांनी म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यावर इतर ठिकाणी करू शकतो असा पाकिस्तानचे नाव न घेता इशारा दिला होता. त्यावर या संपादकाने राज्यवर्धन राठोड यांची पिल्लावळ अशा घाण शब्दात संभावना केली होती. कारण एकच, पाकिस्तानी लष्करशहांनी फेकलेल्या उष्ट्या-खर्कट्यावर जगणारी ही जमात आपली निष्ठा पाकिस्ताशीच ठेवणार. आता अमेरिकेने अशी भूमिका घेताना पुढे काय होईल याचा त्यांना अंदाज असणार. त्यासाठी या बेअकली संपादकांनी कशाला आपले अकलेचे तारे तोडावे? एवढी लायकी असती तर आज हे संपादक अमेरिकेमध्ये उच्चपदस्थ सल्लागार असते. पैशासाठी त्यांना पाकिस्तानची तळी उचलावी लागली नसती. संपादकाला भीती ही आहे कि यामुळे दहशतवादी संपतील आणि आपल्याला मग कोण उष्टे खरकटे खायला देणार? आणि आपण कशावर जगणार?
    Reply
    1. Shriram Bapat
     Jan 3, 2018 at 11:17 pm
     पाकिस्तानची मदत थांबवायची पण ते जाहीर करायचे नाही आणि हे गुप्त राहील असे लेखकाला वाटते. किती भाबडेपणा . ह्याच लेखकाने जेव्हा हार्दिक पटेलने 'मी मर्द आहे. वयाप्रमाणे वागणारच' असे म्हटले तेव्हा त्याचे कौतुक केले होते आपल्या व्यभिचारी लाडक्याचे बेजबाबदार उघड बोल हे प्रशंसनीय पण ट्रम्प यांनी मात्र तोंडात मिठाची गुळणी धरायची अपेक्षा. ट्रम्प म्हणजे पाकिस्तान ने ठेवलेले अंगवस्त्र नाही त्याची मर्जी सांभाळायला. त्यांच्यात तेवढा दम आहे.
     Reply
     1. sjtp1234
      Jan 3, 2018 at 11:16 pm
      Faltu lekh...ugich svatala khup kahitari kalte asa dakhavnuacha fole prayant kela aahe
      Reply
      1. Shrikant Yashavant Mahajan
       Jan 3, 2018 at 10:46 pm
       After givig my comnents in the afternoon, when I recently saw in evenings, that my submited comments are not there. Hence better unsubscribe me, as you seem to be interested only likes to your editorials, like you have blog bechers lokmanas.
       Reply
       1. Shivram Vaidya
        Jan 3, 2018 at 8:19 pm
        ..३..आताही हाफिज सईद सारख्या दहशतवाद्याला पाकिस्तानमध्ये राजकीय पक्ष स्थापन करण्याची आणि तेथील निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करण्याची परवानगी देण्याचे कारस्थान शिजत आहे ही गोष्ट सुद्धा अमेरिकेला ठाऊक नसेल असे म्हणणे भाबडेपणाचे आहे. थोडक्यात काय तर पाकिस्तानी दहशतवादाच्या मुद्यावर अमेरिकेच्या आत्तापर्यंतच्या अध्यक्षांनी, सर्व काही माहिती असुनही, "मी मारल्यासारखे करतो आणि तु रडल्यासारखे कर" हीच नीती अवलंबली होती. आता हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परिणामकारक, सुस्पष्ट, बेडर, पारदर्शक आणि खंबीर परराष्ट्रीय धोरणामुळे ट्रंप प्रशासनाकडून याबाबतीत काही कठोर पावले उचलली गेली तर ती स्वागतार्ह अशीच आहेत. ही पावले म्हणजे नेमकी काय आहेत, त्यात किती तथ्य आहे आणि ती केवळ वरवरची आहेत का तसेच खरोखर परिणामकारक आहेत का हे येणारा काळच सांगेल !
        Reply
        1. Shivram Vaidya
         Jan 3, 2018 at 8:18 pm
         ..२..दहशतवादाच्या व्यवस्थापनासाठी वापरला जातो आहे. पाकिस्तानच्या दहशतवादामुळे त्रस्त असलेल्या देशांमध्ये पाक-व्याप्त काश्मीर , हिंदुस्थान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश ह्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांमध्ये या सर्व देशातील अनेक निरपराध नागरीक बळी पडले आहेत, त्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत, त्यांची मुले-बाळे अनाथ झाली आहेत. कित्येक जण अपंग झाले आहेत. ह्या सर्व गोष्टी आत्तापर्यंतच्या अमेरिकेच्या अध्यक्षांपासून लपून राहिलेल्या होत्या असे तर ट्रंप यांना म्हणायचे नाही ना? जेव्हा ओसामा बिन लादेनच्या अतिरेक्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर वर अतिरेकी हल्ला करून अमेरिकेला "घरचा आहेर" दिला तेव्हापासून अमेरिकेला त्याचे चटके जाणवू लागले. पाकिस्तान हा तर दहशतवादी देश आहे हे सर्व जग ओळखून आहे मात्र त्याला दहशतवादी हल्ले करण्यासाठी अमेरिकेनेच मदत केली आहे हे सुद्धा सर्व जग ओळखून आहे. ही मदत अमेरिकेच्या माजी अध्यक्षांनी "मूर्खपणा"मुळे केलेली नसून, संपूर्ण शुद्धीवर असतांना, सर्व परिस्थिती माहिती असतांना, जाणूनबुजून केली आहे हे ट्रंप यांनी विसरता कामा नये. आताही हाफिज सईद..2
         Reply
         1. Shivram Vaidya
          Jan 3, 2018 at 8:17 pm
          अमेरिकेची स्पष्टोक्ती : अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला दहशतवादाच्या समर्थनाबद्दल कडक इशारा दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी गेल्या तीस वर्षांमध्ये पाकिस्तानला अमेरिकेने गेल्या केलेल्या ३३ अरब डॉलर्सच्या मदतीबदद्ल अमेरिकेच्या माजी अध्यक्षांना "मूर्ख" ठरवले आहे. ह्या इशाऱ्याबद्दल आणि स्पष्टोक्तीबद्दल डोनाल्ड ट्रंप अभिनंदनास पात्र आहेत यात शंका नाही, पण अमेरिकेच्या माजी अध्यक्षांच्या "मूर्खपणा"बद्दल त्यांनी केलेली टिपण्णी संशयास्पद आहे. ती अशासाठी की अमेरिकेचा कोणताही माजी अध्यक्ष एवढा दूधखुळा नव्हता की पाकिस्तानला दिलेल्या मदतीतील किती पैसा पाकिस्तान कोणकोणत्या कारणांसाठी वापरत आहे हे त्यांना ठाऊक नसेल. अमेरिका हा प्रथमपासूनच साम्राज्यवादी देश राहिला आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती आणि विक्री हा अमेरिकेच्या प्रमुख व्यवसायांपैकी एक व्यवसाय होता, आहे आणि राहिलही. अमेरिकेच्या मदतीतील बराचसा हिस्सा पाकिस्तान दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी, त्यांच्या दहशतवादी हल्ल्यांसाठी, त्यांच्या शस्त्रास्त्रसज्जतेसाठी आणि एकूणच ..२..
          Reply
          1. Ramdas Bhamare
           Jan 3, 2018 at 8:12 pm
           उत्तम विश्लेषण !
           Reply
           1. प्रसाद १
            Jan 3, 2018 at 7:18 pm
            ा यातून एक धोका दिसतो , तो म्हणजे आता 'पाकिस्तान चीन रशिया उत्तर कोरिया ' अशी एक सलग आघाडी तयार होईल. हे सर्व देश अमेरिकाविरोध या एकाच विषयावर एकत्र आहेत. - पण हा मुद्दा संपादक विचारात घेतील ? - कारण मोदीविरोध असा एक छुपा मुद्दा असल्यामुळे बाकीचे सर्व किरकोळ विषय ठरतात. - प्रसाद १
            Reply
            1. D
             Davendu Kulkarni
             Jan 3, 2018 at 5:47 pm
             अरे भाऊ, इतकी वर्षे मुस्सद्देगिरी करून झाली ना अमेरिकेची. आधीच्या अध्यक्षांनी पाकिस्तानला जाहीरपणे कधीच काही बोलले नाही, कारण तेंव्हा त्यांना अफगाणिस्तानात मदत हवी होती. आता सर्व गोष्टी (अमेरिकेच्या दृष्टीने) सुरळीत झाल्या आहेत, म्हणून ट्रम्प बोलू लागलाय. हे बोलायला पाहिजेच होते कारण त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. ा वाटत नाही ट्रम्प मनात आले म्हणून बोललोय, हा त्यांच्या राष्ट्रीय विचारप्रवाहाचा धोरणात्मक भाग आहे. दुसरे म्हणजे समजा ते नाहीच बोलले किंवा मदत करत राहिले तर त्याने पाकिस्तान धोरण बदलणार आहे का? चीनची मदत घेणे थांबविणारे आहे का? तुमच्या लाडक्या नेहरूंनी स्वहस्ते करून ठेवलेला काश्मीरचा प्रश्न सुटणार आहे का? कि भारतावरचे अतिरेकी हल्ले थांबणार आहेत? राहिला मुद्दा मुस्लिम देशांची एकी होण्याचा - पण गैर-मुस्लिम देशांबरोबरचे प्रश्नांबाबतीत त्यांची नेहेमीच एकी असते, तुम्ही मदत करा वा नका करू.. पॅलेस्टिनी राजदूताचे इतक्यातले उदाहरण बघा. आता प्रश्न हा निर्माण होतो कि तुम्हाला बदलते आंतरराष्ट्रीय राजकारण समजतेय का? का आपले जुनेच रडगाणे गायचे?
             Reply
             1. Pavan Patil
              Jan 3, 2018 at 5:25 pm
              You  There does not seem to be logical connect in different points mentioned in this article. ओढून ताणून काही मुद्दे जुळवण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला आहे... ट्रम्प वर टीका करायची होती की मोदींवर हे व्यवस्थित न ठरवल्याने लेख लिहिणार्याने कमालीचा बेकार लेख लिहिला आहे.. मी मोदी समर्थक असावा म्हणून हे लिहीत आहे असे समजू नये... पण नेमके काय म्हणायचे आहे ? ट्रम्प च्या विधानाने पाकिस्थानात लोक इस्लामी कट्टर पंथीयांकडे ढकलले जातील हे खूपच बाळबोध वाटते... किंबहुना तेथील लोक तसेच आहेत.पाकिस्तानचे कान उपटले गेले हे आधीच करायला हवे होते.जर अशी मदत थांबणार असेल तर पाकिस्तानच्या भारत विरोधी कारवायांवर नक्कीच परिणाम होईल ... भारतासाठी तो सुखावह होऊ शकेल. यावर कुठलीही चर्चा, विचार लेख लिहिणाऱ्यास वाटले नाही याचे विशेष वाटते. पण लेख लिहिणाऱ्यास आंतरराष्ट्रीय मुसदेगिरी विषयी विशेष ज्ञान आहे असे भासवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.. पण त्याची प्रचिती लेखातील कुठल्याही मुद्द्यावरून येत नाही.. मंडळी टीका करा,ओढून ताणून नको.
              Reply
              1. प्रसाद
               Jan 3, 2018 at 2:27 pm
               नाक्यावरचा बाणा दाखवून ‘वाघ्या’ म्हणा नाहीतर मुत्सद्देगिरी दाखवून ‘वाघोबा’ म्हणा, पाकिस्तान (म्हणजे तेथील लष्कर) त्यांना हवे तेच करते ह्याचा विदारक अनुभव जगाने अनेक दशके घेतला. मग सरळ वाघ्या का म्हणू नये असा विचार तरी चुकीचा कसा म्हणायचा? मदत हा काही कोणाचा अधिकार नसतो. मुत्सद्देगिरीने गेली ६० वर्षे पाकिस्तानच्या वागण्यात काय फरक पडला? तेथील नेमस्तांची अडचण होईल म्हणून जग किती काळ तेथील धटिंगण व्यवस्थेपुढे बाबापुता करत बसणार ह्यालाही मर्यादा आहेतच. मुंबईपासून उरी आणि संसदेपर्यंत इतके हल्ले पाकिस्तानने केले ते तथाकथित ‘मुत्सद्देगिरी’ चालू असतानाच केले ना? तसेच हे सारे पुढे चालू राहणार हे गृहीतच आहे ... अमेरिका त्यांना मदत देते की थांबवते ह्याने त्यात काहीही फरक पडणार नाही. त्याविरोधात आपला बचाव आपल्यालाच करावा लागणार. अरब जगतात भारताला चांगले स्थान आहे आणि जेरुसलेमबाबत अमेरिकेविरुद्ध मतदान करून आपण ते आणखीनच भक्कम केले आहे. मुस्लीमबहुल देश एक होऊन पाकिस्तानच्या मागे (भारताविरोधात) उभे रहातील अशी अजिबात शक्यता नाही. साध्या वेशातील पोलिसाने गणवेश घालून कधीच शिट्टी वाजवू नये का? (१४:२६)
               Reply
               1. U
                Urmila Shah
                Jan 3, 2018 at 1:08 pm
                वं दे मा त र मी हेच तर मोदी अनेक वर्षे सांगत आहेत . भा ज पा झि न्दा बा द
                Reply
                1. U
                 ulhas
                 Jan 3, 2018 at 12:41 pm
                 "जे करावयाचे आहे तेच करावयाचे पण आपण हे करीत आहोत हे बोलून तेवढे दाखवायचे नाही, हा मुत्सद्देगिरीतील पहिला नियम" हा मुद्दा आणि त्यानंतर येणारे विवेचन पटले.
                 Reply
                 1. S
                  sanjay
                  Jan 3, 2018 at 12:26 pm
                  पाकिस्थानला आता चीन लगेच जवळ करणार.ह्याचा दूरदेशी परिणाम काय होणार हे संपादक महाशयांनी जरा खुलवून सांगायला पाहिजे होते.
                  Reply
                  1. C
                   chetan
                   Jan 3, 2018 at 11:52 am
                   काय मूर्ख आहे हे लेखक! अक्कलशून्य लेख!! ह्यांनीच अमेरिकेचे अध्यक्ष वहायला हवे होते.. साध्या नाक्या वर ह्यांचे बोलणे कुणी ऐकत नसेल.. लोकसत्ता मध्ये असेच भरले आहेत.
                   Reply
                   1. प्रसाद
                    Jan 3, 2018 at 11:29 am
                    नाक्यावरचा बाणा दाखवून ‘वाघ्या’ म्हणा नाहीतर मुत्सद्देगिरी दाखवून ‘वाघोबा’ म्हणा, पाकिस्तान (म्हणजे तेथील लष्कर) त्यांना हवे तेच करते ह्याचा विदारक अनुभव जगाने अनेक दशके घेतला. मग सरळ वाघ्या का म्हणू नये असा विचार तरी चुकीचा कसा म्हणायचा? मदत हा काही कोणाचा अधिकार नसतो. मुत्सद्देगिरीने गेली ६० वर्षे पाकिस्तानच्या वागण्यात काय फरक पडला? तेथील नेमस्तांची अडचण होईल म्हणून जग किती काळ तेथील धटिंगण व्यवस्थेपुढे बाबापुता करत बसणार ह्यालाही मर्यादा आहेतच. मुंबईपासून उरी आणि संसदेपर्यंतपर्यंत इतके हल्ले पाकिस्तानने केले ते तथाकथित ‘मुत्सद्देगिरी’ चालू असतानाच केले ना? तसेच हे सारे पुढे चालू राहणार हे गृहीतच आहे ... अमेरिका त्यांना मदत देते की थांबवते ह्याने त्यात काहीही फरक पडणार नाही. त्याविरोधात आपला बचाव आपल्यालाच करावा लागणार. अरब जगतात भारताला चांगले स्थान आहे आणि जेरुसलेमबाबत अमेरिकेविरुद्ध मतदान करून आपण ते आणखीनच भक्कम केले आहे. मुस्लीमबहुल देश एक होऊन पाकिस्तानच्या मागे (भारताविरोधात) उभे रहातील अशी अजिबात शक्यता नाही. साध्या वेशातील पोलिसाने गणवेश घालून कधीच शिट्टी वाजवू नये का?
                    Reply
                    1. V
                     Vivek
                     Jan 3, 2018 at 11:26 am
                     पाकिस्तान बद्दल मोठी समस्या आहे ती त्या देशाच्या लष्कराचा असलेला मोठा प्रभाव आणि कित्तेक वर्ष पासून हेच चालू आहे. राहिला प्रश्न स्तिर सरकारचा तर लष्कर कोणतीही सरकार स्थिर राहू देत नाही सरकार टिकले आणि भारताबरोबर चर्चा करू लागले तर लष्कर त्यात खोड घालून उधळून लावते कित्येक वर्षांपासून आपण हे पहातच आहोत. आणि हा प्रभाव पुढेही कमी होण्याचे लक्षण नाही. आणि अमेरिकाही भारताला यावर काही मदत करत नाही. भारताला यावर एकच उपाय आहे स्वतःची आर्थिक, लषकरी टाकत वेगाने वाढवून अमेरिका चीन यांच्या पंक्तीत जाऊन बसने. स्वतःच स्वतःच्या गुप्तचर यंत्रणा, लष्कर, आर्थिक सामर्थ्यावर पाकला नामोहरम करणे. भारताची आर्थिक ताकद वाढली की बाकी समस्या जपणे सुटतील
                     Reply
                     1. Swanand Lele
                      Jan 3, 2018 at 11:14 am
                      ये रिश्ता क्या कहलाता है?
                      Reply
                      1. Load More Comments