मुलांची आणखी एक भाषा असते ती चित्रांची. एखाद्या चित्राचा कसा अर्थ मुले लावतात त्यावरून त्याचे भावविश्व वेळेवर समजून घेता येते. कधी या चित्रांतून मी नकोय असा भाव व्यक्त होतो, तर कधी असुरक्षितता, तर कधी लैंगिक शोषणही.. ही चित्रं, त्यातला इशारा वेळीच ओळखायला हवा तरच त्या मुलांना त्यातून बाहेर काढता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांकडे बघायला, त्यांच्याशी बोलायला घरातले, दारातले कुणालाच वेळ नाही व त्याचे होणारे दुष्परिणाम हा विषय सदर लेखमालेत वारंवार येतो आहे. मुले भाषा वापरून जे सांगतात तेही आपण ऐकत नाही तर अबोल भाषा किंवा बोललेल्या प्रत्यक्ष शब्दांच्या आडचे भाव किंवा वाक्यांमधल्या छुप्या जागा बघितल्या जाणे अशक्यच. प्रत्यक्ष शब्द माध्यमांच्या पलीकडे मुलांचीच काय मोठय़ांचीही भाषा असते. देहबोली, स्पर्शबोली, डोळ्यातून बोलणे, कृतीतून बोलणे इत्यादी ही भाषा समजायला संवेदनशील मन व मुलालाच दिलेला असा वेळ मात्र हवा.

मराठीतील सर्व आमचं ऐकताय ना? बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about sensitive images impact on kids
First published on: 24-03-2018 at 01:01 IST