बार्ली हे धान्य आपल्या आहारात क्वचितच वापरलं जातं. फक्त बार्ली वॉटर मात्र मूत्रमार्गाच्या बिघाडासाठी दिलं जाणारं एक औषध म्हणून परिचित आहे. गव्हाच्या दाण्यापेक्षा थोडे मोठे असे बार्लीचे पांढरट दाणे भिजवून त्यांना मोड आणले की त्यात जे माल्टोज तयार होतं ते अनेक स्वीटनरमध्ये वापरलं जातं. बार्लीमधलं फायबर आतडय़ातून अन्न पुढे सरकायला मदत करतं, त्यातले उपयुक्त बॅक्टिरिआ वाढवतं, त्यामुळे पोटाच्या सर्व विकारांवर विशेषत: अतिसार, पोटदुखी यावर बार्ली उत्तम. याशिवाय बार्लीच्या सेवनाने कोलेस्टेरॉल आणि मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होते, हृदयरोगालाही प्रतिबंध होतो. मोड आणून, शिजवून किंवा पीठ करून बार्लीचा वापर आपल्या अनेक पदार्थात उदाहरणार्थ सॅलड, सूप, भाजी, भात, उसळ यांत करता येईल.

बार्लीची खीर
साहित्य : १ वाटी बार्ली, अर्धी वाटी मुगाची डाळ, लागेल तसं दूध, २ कप नारळाचं दूध, १ चमचा भाजलेली खसखस, अर्धा चमचा जायफळ पूड, १ वाटी गूळ, पाव वाटी काजू, १ मोठा चमचा तूप
कृती : बार्ली भाजून ५-६ तास भिजवावी. मुगाची डाळ कोरडी खमंग भाजून घ्यावी. बार्ली आणि डाळ एकत्र करून कुकरमध्ये मऊ  शिजवावी. तूप गरम करून त्यात काजू परतून घ्यावे. त्यात शिजलेली बार्ली, गूळ घालावा, गूळ विरघळला की नारळाचं दूध, जायफळ घालून एक उकळी द्यावी, दूध घालून खीर हवी तशी पातळ करावी. काजू आणि खसखस घालून खीर खाली उतरावी.
वसुंधरा पर्वते
vgparvate@yahoo.com

siddharth chandekar shares post for chinmay mandlekar
“जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
sharad ponkshe reacts on Swatantra Veer Savarkar movie
शरद पोंक्षेंची रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाले, “खूप लोक…”