07 July 2020

News Flash

करोनाकाळातील खरेदी घोटाळे

करोना साथीतही भाजपची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील घटनांवरून सरकारी यंत्रणांमधील गैरप्रकार समोर आले आहेत.

संग्रहित छायाचित्र

करोनाच्या संकटाने देशात सर्वत्रच साऱ्या सरकारी यंत्रणा हादरून गेल्या. रोगाशी मुकाबला करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले. डॉक्टर आणि अन्य निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘पीपीई किट्स’ हे सर्वात गरजेचे; तर रुग्णांसाठी व्हेन्टिलेटर महत्त्वाचे. सुरुवातीला पडेल त्या दरात हे सारे खरेदी करावे लागले. कोणतीही आपत्ती आली की, सरकारमध्ये काही जणांसाठी ती जणू पर्वणीच ठरते. सरकार पैशासाठी पुढेमागे बघत नाही आणि त्याचाच काही जण गैरफायदा घेतात. करोना साथीतही भाजपची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील घटनांवरून सरकारी यंत्रणांमधील गैरप्रकार समोर आले आहेत. गुजरातमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेन्टिलेटर उपलब्ध नव्हते. सरकारने राजकोटमधील एका कंपनीने दिलेले व्हेन्टिलेटर रुग्णालयात बसविले. मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या उपस्थितीत या व्हेन्टिलेटरचा वापर सुरू करण्यात आला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे ‘मेक इन इंडिया’ करणाऱ्या कं पनीचे तोंडभरून कौतुक के ले. परंतु हे सारे व्हेन्टिलेटर अयोग्य बनावटीचे असल्याचे निष्पन्न झाले. कारण ९०० पैकी २३० व्हेन्टिलेटरचा वापर अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात करण्यात आला असता सदोष उपकरणामुळेच काही रुग्ण दगावल्याचा आरोप झाला. व्हेन्टिलेटर तयार करणाऱ्या कं पनीचे प्रमुख पराक्रमसिंह जडेजा हे मुख्यमंत्री रुपानी यांच्या मर्जीतील असल्याचा आरोप काँग्रेसने के ला. व्हेन्टिलेटर घोटाळ्याचा आरोप होत असताना, ‘७५ उपकरणे त्याच कंपनीने बदलून दिली’ असे खुलासे आता होत आहेत. दुसरीकडे, भाजपचीच सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशात पीपीई किट्सच्या खरेदीत पाच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्याच्या आरोग्य संचालकांनाच राज्य दक्षता व भ्रष्टाचारविरोधी विभागाने पकडले. आरोग्य संचालक ए. के. गुप्ता आणि विक्रेता यांच्यातील संभाषणाची ४३ सेकं दाची ध्वनिफीत समाज माध्यमांमध्ये समोर आली. हा घोटाळा समोर येताच काँग्रेसने आरोप करणे हे ओघानेच आले, पण भाजपमध्ये मार्गदर्शक मंडळाच्या भूमिके त ढकलल्याने अस्वस्थ असलेले माजी मुख्यमंत्री शांताकु मार यांनी शरमेने मान खाली गेल्याची प्रतिक्रि या व्यक्त के ली. गुप्ता यांच्याशी संभाषण करणारा इसम हा हिमाचल प्रदेश भाजपचे अध्यक्ष राजीव बिंदल यांचा जावई असल्याचे उघड होत असतानाच, बिंदल यांनी ‘नैतिकतेच्या मुद्दय़ावर’ पदाचा राजीनामा दिला. वास्तविक ४३ सेकं दाच्या त्या ध्वनिफितीत बिंदल यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. तथापि, संशयाची सुई भाजप प्रदेशाध्यक्षांच्या दिशेनेच होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेशचेच. त्यांनीच बिंदल यांची जानेवारी महिन्यात प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती के ली होती. ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत असले तरी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या गृह राज्याचे प्रदेशाध्यक्षच वादात अडकल्याने दिल्लीतील नेत्यांनी या प्रदेशाध्यक्षाला घरचा रस्ता दाखविला. भाजप अध्यक्ष नड्डा यांनी नेमलेल्या बिंदल यांची पार्श्वभूमीच वादग्रस्त. २०१२ मध्ये आरोग्यमंत्री असताना जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्याने त्यांना शेवटी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. १९९८ मध्ये नगरपालिके चे नगराध्यक्ष असताना कर्मचाऱ्यांच्या भरतीत गैरप्रकार झाल्याने चौकशी झाली होती. असा हा नमुना पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमण्यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी तरी विचार करणे आवश्यक होते. राजकारणात अलीकडच्या काळात निवडणुका जिंकण्यासाठी पैसा व अन्य साधनसामग्री उभी करण्याची क्षमता असलेल्यांना संधी दिली जाते. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लोकांच्या जिवाशी खेळणे खरे तर चुकीचे. पण त्यातही राज्यकर्ते हात धुऊन घेतात हे हिमाचल प्रदेशच्या घटनेवरून स्पष्ट झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 12:02 am

Web Title: article on corona period shopping scams abn 97
Next Stories
1 शिथिलीकरणाची पहाट
2 हाँगकाँगची ‘कायदेशीर’ कोंडी
3 मजुरांना न्यायही विलंबानेच?
Just Now!
X