पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भाजपचा निसटता विजय हा पक्षात २०१४ पासून सुरू झालेल्या मोदी-शहानीतीचा किंवा ‘आयात धोरणा’चा विजय आहे. तर राष्ट्रवादीला फटका बसला तो उमेदवार निवडीतील गोंधळ व महाविकास आघाडीतील एकजुटीचा अभावाचा. आपल्या विजयाची खात्री नसेल तर आपल्याच माणसाला उमेदवारी देण्याचा आग्रह न धरता स्वत:च्या जिवावर लक्षणीय मते मिळवणाऱ्या उमेदवाराला पक्षात घेऊन त्याला उमेदवारी द्या व त्यामागे पक्षाची ताकद उभी करा आणि विजय मिळवा ही मोदी-शहा नीती भाजपमध्ये २०१४ पासून सुरू झाली. पश्चिम बंगालात नुकतीच ही नीती अपेशी ठरली असली तरी, लोकसभा २०१४,  महाराष्ट्रातील विधानसभा २०१४, उत्तर प्रदेश २०१७ अशा निवडणुकांत  या रणनीतीने भाजपला विजय मिळवून दिला. पंढरपुरात तोच कित्ता गिरवण्यात आला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके  यांच्या निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने समाधान आवताडे यांची उमदेवारी जाहीर के ली तेव्हाच राष्ट्रवादीला जागा टिकवण्याचे आव्हान असणार हे स्पष्ट झाले होते व तशी उघड चर्चाही सुरू झाली. कारण अवताडे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून लढताना ४० हजारांहून अधिक मते मिळवली;  २०१९ मध्ये अपक्ष म्हणून ५४ हजार मते मिळवली होती. त्या वेळी भाजपचे सुधाकरपंत परिचारक यांनी ७६ हजार मते मिळवली पण ८९ हजार मते मिळवणाऱ्या राष्ट्रवादीच्या भारत भालके यांच्याकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला. म्हणजे आवताडे व भाजप यांच्या मतांची एकत्रित बेरीज १ लाख ३० हजार होत होती. याउलट भालके गटाची ९० हजार. शिवाय अवताडे हे मंगळवेढय़ाचे तर भालके  व परिचारक दोघेही पंढरपूरचे. त्यामुळे पंढरपुरात मतविभाजन तर मंगळवेढय़ात अवताडे वरचढ हे समीकरणही अचूक बसत होते. इतके  तगडे समीकरण असूनही उलट आवताडे यांना १ लाख ९ हजारांवरच समाधान मानावे लागले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे भारत भालके  यांचे पुत्र भगीरथ भालके  यांना मतदारसंघातील सत्तेच्या केंद्रीकरणावरून निर्माण झालेली नाराजी व प्रतिकूल राजकीय समीकरणांनंतरही १ लाखांचा टप्पा ओलांडता आला. भारत भालके  यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भालके  कु टुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेले तेव्हाच विठ्ठल सहकारी साखर कारखाना परिवारातील काहींनी, भालके  कु टुंबात आमदारकी तरी द्या किंवा साखर कारखान्याचे अध्यक्षपद- दोन्ही गोष्टी नको – अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. तसेच भगीरथ यांच्याबद्दल भारत भालके यांच्याप्रमाणे आपुलकी नाही याचे संके तही राष्ट्रवादीला मिळाले होते. अशा परिस्थितीत आधी कारखान्याचे अध्यक्षपद भालके कु टुंबात देण्यात आले. त्यानंतरही भारत भालके  यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन सहानुभूतीच्या मुद्दय़ावर जागा राखण्याचा विचार पुढे आला होता. पण त्या निर्णयात गोंधळ झाला व भगीरथ भालके  यांची उमेदवारी जाहीर झाली. ही जागा सोपी नाही हे लक्षात घेऊन अजित पवार यांनी गल्लीबोळात जाऊन, स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मतांची मोट जुळवण्याचा प्रयत्न केला. कल्याण काळे यांना भाजपमधून राष्ट्रवादीत आणले. या सर्व प्रयत्नांमुळे एक लाख मतांचा टप्पा ओलांडता आला; पण शिवसेना व काँग्रेस व राष्ट्रवादी ही एकजूट म्हणावी तशी दिसली नाही. या उलट मंगळवेढय़ाचे अवताडे पंढरपुरातील परिचारक गटासाठी उपरे ठरून खूप मागे पडू नयेत यासाठी भाजपच्या सर्व नेत्यांची मोट बांधण्याकडे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष दिले. त्यामुळे अटीतटीच्या लढतीत, निसटत्या फरकाने का होईना, पण भाजपला हवे असणारे विजयाचे समाधान महाराष्ट्रातील या पोटनिवडणुकीत  मिळाले!

Hindutva of Congress and BJP on the occasion of Ram Navami
रामनवमीचे औचित्य साधून हिंदुत्व काँग्रेसचे अन् भाजपचे…
Shrirang Barne, Sanjog Waghere,
“बारणे यांचं विधान बालिशपणाचे…” मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरेंची टीका; श्रीरंग बारणे नेमकं काय म्हणाले होते?
narayan rane
शिंदेंची रत्नागिरीत ताकद नाही; राणेंचा दावा
loksatta chavadi maharashtra politics maharashtra political crisis 
चावडी: शुक्राचार्य कोण ?