23 October 2018

News Flash

ट्रम्पोजींची स्वदेशी

आनंदात मिठाचा खडा टाकण्याचे काम ट्रम्प यांनी केले आहे.

US suspends security assistance to Pakistan : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांना वेसण घालण्याचा इशारा देऊन चार महिने उलटले आहेत. याशिवाय, अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय बैठकाही झाल्या. तरीदेखील तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसारख्या संघटनांकडून अफगाणिस्तान परिसरात अशांतता पसरवली जात आहे.

पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांची लष्करी मदत बंद करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे भारतातील ट्रम्प यांच्या बौद्धिकबांधवांना झालेल्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याचे काम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. त्यामुळे त्या निर्णयाबद्दल हसावे की या प्रस्तावाने हळहळावे हे अनेकांना कळेनासे झाले आहे. ट्रम्प सरकारचा हा प्रस्ताव आहे तो ‘एच-वन बी’ या व्हिसा प्रकाराबाबतचा. हा साधारणत तीन ते पाच वर्षे कालावधीसाठीचा व्हिसा. तो घेऊन अनेक परकी व्यक्ती अमेरिकेतील उद्योग-व्यवसायांत काम करीत आहेत. त्यात अर्थातच भारतीय नागरिकांचे प्रमाण मोठे. त्यातही ‘भारतातील व्यवस्थेला कंटाळून, केवळ चांगले कार्य पर्यावरण मिळते म्हणून अमेरिकेत नाइलाजाने जाणाऱ्या’ देशभक्त भारतीयांचे प्रमाण त्यात बरेच मोठे आहे. अशा देशभक्त भारतीयांना अमेरिकेचे नागरिकत्व घेण्याची एक आंतरिक ओढ असते. परंतु ट्रम्प यांनी त्यालाच लगाम घालण्याचे ठरविले आहे. त्याकरिता त्यांनी तेथील कामगार, होमलँड सिक्युरिटी आदी विभागांना या व्हिसापद्धतीत सुधारणा सुचविण्याचे आदेश दिले. त्यातून गेल्या महिन्यात एक प्रस्ताव समोर आला. तो होता एच-वन बी व्हिसाधारकांच्या वैवाहिक जोडीदाराला – म्हणजे एच-फोर डिपेन्डन्ट्सना – तेथे कायदेशीररीत्या काम करण्याबाबतचा. ओबामा प्रशासनाने त्याला परवानगी दिलेली होती. ती काढून घ्यावी अशी सूचना पुढे आली आहे. त्यामुळे एच-वन बी व्हिसाधारकांत मोठीच खळबळ उडाली. तेथील उद्योग आणि व्यावसायिकही काहीसे खंतावले. असे असताना आता आणखी एक प्रस्ताव पुढे आला आहे. एच-वन बी व्हिसाधारकांच्या ग्रीन कार्डचा अर्ज सरकारदरबारी पडून असलेल्या काळात त्यांच्या व्हिसाला अजिबात मुदतवाढ देऊ नये, असा प्रस्ताव होमलँड सिक्युरिटी विभागाने मांडला आहे. या नव्या र्निबधांना अमेरिकी काँग्रेसने मान्यता दिली, की झाले. सर्वच एच-वन बी व्हिसाधारकांना त्याचा फटका बसणार. परंतु त्याचा भारतीयांना मोठा फटका बसणार. याचे कारण या सर्व व्हिसाधारकांत भारतीयांचे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. त्यापैकी असंख्य एच-वन बी व्हिसाधारक काही दशकांपासून ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्वाना घरवापसी अभियान राबवावे लागेल. परंतु यातील सर्व जण ज्या नैतिक आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांनी अमेरिकेत राहून भारतातील स्वदेशी मोहिमेला समर्थन देत असतात, नेमका तोच विचार ट्रम्प यांच्या व्हिसासुधारणा धोरणात आहे. हा विचार आहे ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन.’ – अमेरिकी वस्तूच विकत घ्या, अमेरिकी नागरिकांनाच नोकरी द्या, असा. मुंबईतील मराठी माणूस ज्या प्रमाणे उत्तर प्रदेश वा बिहारातील कामगारांकडे पाहात असतो, तोच दृष्टिकोन येथे आहे. मुंबईत तो मान्य आणि अमेरिकेत अमान्य असे केले तर ते फारच डोळ्यांवर येईल. अडचण आहे ती हीच. आता हे सर्व कुशल कामगार नोकऱ्या गमावून इकडे आले, तर त्यांना येथील राष्ट्रनिर्मितीच्या कामात सहज सामावून घेता येईल. त्यांच्यासाठी आपले सरकार नोकऱ्याही उत्पन्न करील. परंतु अमेरिकेचे मात्र त्यातून नक्कीच नुकसान होईल. पण हेही ‘आले ट्रम्पोजींच्या मना..’ याच धाटणीचे आहे. तरीही त्यांना ते समजावून सांगण्याचे काम मोदी सरकार करीलच. अमेरिकेतील देशभक्त एच-वन बी व्हिसाधारकांपुढे आता तेवढाच आशेचा किरण आहे.

First Published on January 4, 2018 2:57 am

Web Title: pakistan has given us nothing but lies and deceit says donald trump