20 April 2018

News Flash

ट्रम्प आणि उपवासाचे पदार्थ

ट्रम्प म्हणतात, स्थलांतरितांनी अमेरिकेची वाट लावली.

ट्रम्प म्हणतात, स्थलांतरितांनी अमेरिकेची वाट लावली. सबब आता अमेरिकेत स्थलांतरित नकोत. अमेरिका फक्त अमेरिकनांची. ते जेव्हा असा स्वदेशीचा नारा देत होते त्या वेळी त्यांची वैयक्तिक स्थिती कशी होती?
संस्कृती उत्क्रांत होत असताना त्या प्रवाहात मधले अनेक ओहोळ, झरे मिसळत असतात की तो प्रवाह एखाद्या बंदिस्त नळीतनं वाहतो?
उत्तर या प्रश्नाचं माहीत असलं तरी हा प्रश्न पडायचं काही थांबत नाही. तो आत्ता पडला त्यामागची कारणं दोन. पहिलं म्हणजे एका मित्राचे स्वदेशप्रेमी वडील आणि दुसरं म्हणजे अर्थातच अमेरिकेत अध्यक्षपदी निवडले गेलेले ट्रम्प. पहिले इकडे मुंबईत असतात आणि दुसरे तिकडे अमेरिकेत; पण गंमत म्हणजे दोघांची भाषा एकच आहे. जागतिकीकरणाचा परिणाम म्हणावा का त्याला? क्रूर विनोद ठरेल तसं करणं.
कारण हे वडील अजिबात जागतिकीकरणप्रेमी नाहीत. आपला देश, आपले मजूर, आपली उत्पादनं वगैरेंवर त्यांचा ठाम विश्वास आहे. धर्मप्रेमी आहेत. उपास-तापास करतात; पण सर्व काही स्वदेशी. इथपर्यंत ठीक आहे; पण इतरांनीही तसं करावं असा त्यांचा आग्रह असतो. घरचे कावतात त्यामुळे. तर परवाच्या दिवशी माझा मित्र त्यांना वैतागून म्हणाला, अहो, काय घेऊन बसलाय हे स्वदेशी.. तुम्ही उपवासाला खाता तो बटाटा परदेशातनं आलाय.. मिरची आपल्याकडची नाही – साबुदाणा तर नाहीच नाही..
मित्र रागावलेला होता. त्यामुळे यादी जरा जास्तच लांबली. त्याचा उद्वेग जाणवण्यासारखा होता. त्याच रेटय़ात तो म्हणाला.. त्यांना तरी दोष किती देणार म्हणा.. ते ट्रम्प तरी दुसरं काय करतायत.. घरी हे वडील आणि तिकडे ते ट्रम्प.. दोघेही एकाच माळेचे मणी! या मित्राचा मुलगा आयटी कंपनीत आहे. ट्रम्प यांची एकूण धोरणं लक्षात घेता त्या मुलाचं अमेरिकेत जाणं कंपनीनं लांबवलंय. तेव्हा मित्राच्या उद्वेगामागे असाही अर्थ आहे. असो.
त्याच्या वडिलांचं जाऊ द्या; पण ट्रम्प यांच्यामुळे ही स्वदेशीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीये. अशा वेळी अमेरिकेचं काय काय स्वदेशी आहे हे यानिमित्तानं तपासायला हवं.
अमेरिकेचं राष्ट्रप्रेमी देशगीत आहे ‘गॉड सेव्ह अमेरिका’. त्याचा जनक आयर्विग बर्लिन. तो काही अमेरिकी नव्हता. बेलारूस या देशाचा मूळचा तो. अमेरिकेत स्थलांतरित म्हणून आला. तिथेच राहिला. हे आपल्यासारखंच. म्हणजे ‘सारे जहाँसे अच्छा..’ लिहिणारा इक्बाल हा कवी पाकिस्तानात गेला. तिकडे गेल्यावर हिंदोस्ताला सारे जहाँसे अच्छा असं म्हटल्याबद्दल त्यानं खंत व्यक्त केली. ते आपल्याकडे अनेकांना माहीत नाही. आपण त्याचं ‘सारे जहाँसे..’ प्रेमानं अगदी २६ जानेवारीच्या संचलनातही वाजवत असतो.
तर अमेरिका म्हणजे व्हाइट हाउस. वॉशिंग्टनमधलं ते विख्यात निवासस्थान. जगातल्या एकमेव महासत्तेच्या प्रमुखाचं घर; पण तेसुद्धा स्थलांतरितानं बांधलंय. जेम्स होबन हा त्याचा आरेखनकार. मूळचा तो आर्यलडचा. अमेरिकी म्हणूनच पुढल्या पिढय़ांत तो ओळखला जातो.
वॉशिंग्टननंतरचं अमेरिकेतलं सगळ्यात लोकप्रिय शहर म्हणजे न्यूयॉर्क. पार्क लेन, वॉल स्ट्रीट वगैरेच्या जोडीनं ते शहर ओळखलं जातं ते विख्यात ब्रुकलीन ब्रिजमुळे. रात्री दिव्यांच्या उजेडात काय सुंदर दिसतो हा पूल; पण तोही अमेरिकनानं बांधलेला नाही. जॉन रोबलिंग हा जर्मन विस्थापित त्याचा जन्मदाता. तोही जर्मनीतनं स्थलांतरित म्हणून अमेरिकेत आलेला. पुढे अल्बर्ट आइन्स्टाइन त्याच मार्गानं अमेरिकावासी झाला. तोही मूळचा जर्मन ज्यू. त्या वेळी तरुणपणीच त्यानं जर्मनीचं राष्ट्रीयत्व नाकारलं. का? तर त्या वेळचा जर्मनी फारच राष्ट्रवादी आणि असहिष्णू होता म्हणून.
अमेरिका ओळखली जाते ती जीन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरटासारख्या जाड, पण रंगानं निळ्या, अशा दणकट कापडाच्या बनलेल्या विजारींमुळे. त्यातला लेवाईस नावाचा ब्रँड म्हणजे जीन्सप्रेमींचा अत्यंत आवडता. तो अमेरिकी; पण कर्ता अमेरिकी नाही. जेकब युफीस हा मूळचा रशियातला. आताच्या लाटवियातला. ज्यू. व्यवसायानं शिंपी. वयाच्या २३ व्या वर्षी तो अमेरिकेत आला. आपली शिलाईची दुकानं त्यानं सुरू केली. तो घोडय़ांसाठी पांघरूणं, तंबूची कापडं वगैरे बनवायचा. त्यासाठी कापडाचे तागे घ्यायचा तो लेवाईस स्ट्रॉस या व्यापाऱ्याकडनं. हा स्ट्रॉसदेखील ज्यू, पण जर्मनीतला. एकदा एक महिला त्याला म्हणाली, लाकडाच्या वखारीत काम करणाऱ्या माझ्या नवऱ्यासाठी चांगली दणकट विजार हवीय. तर यानं ती तंबूच्या कापडाची शिवली. ती इतकी अनेकांना आवडली की हा लिवाईसला म्हणाला, मला भांडवल पुरव.. आपण या विजारीचं पेटंट घेऊ या. त्यांनी ते घेतलंही आणि १८७३ साली पहिली जीन्स जन्माला आली. यातली महत्त्वाची बाब म्हणजे हे दोघेही मूळचे अमेरिकी नाहीत. स्थलांतरितच.
अमेरिकेची दुसरी ओळख म्हणजे हॉट डॉग्ज नावाचा एक रद्दी पण पोटभरीचा पदार्थ. लांबुडक्या पावात सॉसेजस चेपायचे आणि त्यावर मस्टर्ड सॉस किंवा मेयोनिज वगैरे घालून गरम गरम खायचं. अमेरिकेतल्या कुठल्याही शहरातल्या पदपथावर हे हॉट डॉग्ज बनवून विकणारे फिरत असतात. आपल्याकडच्या वडापावसारखा हा पदार्थ. मुळात जन्माला आला श्रमिकांसाठी. कमी पैशात जास्तीत जास्त पोटभरीचा प्रकार. पोषणमूल्य वगैरे पाहायचं नाही. तर ही हॉट डॉग ही अमेरिकेची आणखी एक ओळख.
पण या पदार्थाचं मूळ नाव फ्रँकफर्टर. म्हणजे अर्थातच फ्रँकफर्ट या जर्मनीतल्या शहरात जन्माला आलेला हा पदार्थ. तिकडे डुकराच्या मांसाचं सॉसेजेस घालून तो केला जायचा. रस्त्यावरच्या आल्यागेल्यास तो दिला जायचा, मोफत. म्हणजे नवीन राजाचं राज्यारोहण झालंय, राजपुत्र जन्माला आलाय वगैरे प्रसंगांत तो असा बनवून मोफत वाटला जायचा. चार्ल्स फेटमन नावाच्या जर्मन स्थलांतरितानं हा पदार्थ आपल्याबरोबर अमेरिकेत आणला. पुढे तो विकायलाही लागला. ही घटना १८७१ वा आसपासची. म्हणजे तिकडे स्ट्रॉस यांची लेवाईस जीन्स जन्माला आली त्याच्यापाठोपाठ हा फ्रँकफर्टर अमेरिकेत आला. अमेरिकेत आल्यावर तो झाला हॉट डॉग.
इतकंच काय, अमेरिकेचं तो शक्तिमान प्रतीक असलेला सुपरमॅन हादेखील स्थलांतरित आहे. म्हणजे कल्पनेत का असेना त्याचा जन्म अमेरिकेतला नाही. क्रिप्टन या काल्पनिक स्थानी जन्मलेला आणि कन्सास शहरात वाढलेला हा सुपरमॅन जगातल्या कोटय़वधी बालकांच्या मनात हवाहवासा महामानव बनून राहिलाय.
हल्ली आपल्याकडे अमेरिकन फुटबॉल नावाच्या खेळाचं मोठंच फॅड आलंय; पण सत्य हे की, तोदेखील अमेरिकन नाही. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी मोठय़ा प्रमाणावर अमेरिकेत घर करायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर त्यांचा रग्बी नावाचा खेळही अमेरिकेत आला आणि अमेरिकन फुटबॉल अशा नावानं ओळखला जायला लागला. मुद्दा अर्थातच हा की, अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाणारा खेळदेखील अमेरिकन नाही.
गुगल मूळच्या अमेरिकींचं नाही. सर्जी मिखायलोकोविच हा गुगलच्या संस्थापकांतला एक. तो रशियन. अ‍ॅपल शंभर टक्के अमेरिकन नाही. स्टीव्ह जॉब्ज तर चक्क सीरियन निर्वासिताचा मुलगा. आता याच सीरियातल्या नागरिकांवर ट्रम्प यांनी बंदी घातलीये. फेसबुकचंही तेच.
आणि आता ट्रम्प म्हणतात, स्थलांतरितांनी अमेरिकेची वाट लावली. सबब आता अमेरिकेत स्थलांतरित नकोत. अमेरिका फक्त अमेरिकनांची. ते जेव्हा असा स्वदेशीचा नारा देत होते त्या वेळी त्यांची वैयक्तिक स्थिती कशी होती?..
‘ईकेआ (स्वीडिश) चबुतऱ्यावर उभे राहून, सेंट गोबेन (फ्रान्स) कंपनीनं बनवलेल्या बुलेटप्रूफ काचेच्या मागे, सोनी (जपानच्या) ४ के कॅमेऱ्यात बघत, समोरच्या डॉल्बी (जर्मन) ध्वनिक्षेपकासमोर हातवारे करताना आपले रोलॅक्स (स्विस) घडय़ाळ दाखवत डोनाल्ड ट्रम्प यांनी जनतेला आव्हान केलं- अमेरिकी वापरा, अमेरिकींना वापरा आणि स्थलांतरितांना आवरा.. त्या वेळी त्यांच्या शेजारी त्यांची स्लोवेनियन धर्मपत्नी उभी होती.’
तेव्हा ट्रम्प यांचं हे आपल्या उपवासाच्या पदार्थासारखं आहे. ‘आपले’, ‘पवित्र’ म्हणून ते धर्मकार्यात खायचे; पण आपल्याला माहीत नसतं ते आपले नाहीत.

गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
Twitter : @girishkuber

First Published on February 11, 2017 2:56 am

Web Title: girish kuber article on donald trump
 1. kunda Patil
  Feb 11, 2017 at 5:10 am
  i am from kansas usa & what author said in the article is really true.
  Reply
  1. M
   MANDAR
   Feb 11, 2017 at 8:42 am
   ट्रम्प यांना इस्लामी दहशतवादाला रोखायचे आहे तर. पण एक प्रश्न आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या देशांचे दहशतवादाला थेट समर्थन देण्याचे पुरावे आहेत आणि या देशांचे नागरिक यापूर्वी दहशतवादी कृत्यांमध्ये देशांचे नागरिक थेट गुंतले होते, हे ही उघड झाले आहे. पण या दोन देशांतल्या नागरिकांवर ट्रम्प महाशयांनी बंदी का घातली नाही बरे? या देशांतले मुसलमान बहुधा त्यांना कर्तृत्ववान वाटत असावेत.
   Reply
   1. M
    Milind
    Feb 12, 2017 at 7:42 am
    ट्रम्प ह्यांचा निर्णय एका रात्रीत झाला नाही. त्यामागे करणे आहेत. उदाहरण - एक अमेरिकेन मिनीॅपोलिस विमानतळावर आला आणि त्याने टॅक्सी बोलावली. टॅक्सी ड्राइवर सोमाली मुसलमान होता, त्याने नकार दिला कारण ह्याच्या हातात वाईन चे बाटली होती, आणि त्याच्या धर्मात दारू निषिद्ध .. आता त्याला काही हा प्यायला लावत नव्हते, पण अडवणूक.. हाच कित्ता, ओळीतल्या पुढल्या ६ सोमाली टॅक्सी ड्राइव्हरनी गिरवला. तसे पहिले तर हेय सोमाली त्यांच्या देशात भिकेला लागले होते आणि अमेरिकेने त्यांना थारा दिला, वर हेय मुजोर झाले.
    Reply
    1. M
     Milind
     Feb 12, 2017 at 7:38 am
     संपादक महोदयांची गल्लत झालेली दिसते. त्यावेळची तुम्ही उदाहरणे दिली, त्यावेळी अमेरिका नवीन घडत होता, त्यामुळे लोकांची गरज होती. अगदी आता आता पर्यंत कॉम्पुटर करता अमेरिकेने निर्वासितांना ठार दिला. पण घरातल्यांना काम नसेल, तर बाहेरच्यांना पोसायचे हेय कुठल्या व्यवहारात बसते? त्यात पुन्हा मुसलमान निर्वासित. स्वदेशात इतरधर्मियांना त्रास देतात, अमेरिकेत येऊन तिथल्या जीवन प्रवाहात समरस होत नाहीत.. त्यांचे योगदान नगण्यच. उलट गुन्हेगारी प्रवृत्ती, social welfare वर जगणार.. ह्यांना आत घेऊन काय उपयोग ?
     Reply
     1. U
      Ullhas Mokashi
      Feb 11, 2017 at 1:24 pm
      कुबेर साहेब चुकीचे तर्क चुकीच्या ठिकाणी वापरतायत. ट्रम्प यांनी फक्त ९० दिवसांकरता काही ठराविक देशातल्या लोकांवर बंदी घातली आहे सुरक्षा यंत्रणेला मदत होण्याकरता. आता राहिला प्रश्न "अमेरिका फर्स्ट" ह्या घोषणेचा आणि ट्रम्प ह्यांना निवडणुकीत यश का मिळाले ह्याचा; तर जरा "अमेरिका रस्ट बेल्ट" हे इंटरनेटवर शोधा म्हणजे कळेल. हीच परिस्थिती ब्रिटेनची आहे, म्हणून तिथे सुद्धा लोकांनी "ब्रेकझीट"ला पाठिंबा दिला. पाशात्य देशांची आर्थिक परिस्थिती फार गंभीर आहे. आपल्याला वाटते कि तिथे सर्व उत्तम आहे, पण तसे नाही.
      Reply
      1. प्रसाद
       Feb 11, 2017 at 7:28 am
       जगभर मातीच्याच चुली रेल्वेच्या अन् रिझर्व्ड डब्यात घुसण्याचा प्रयत्न सगळेच करतात आणि स्वतः आत गेल्यावर इतरांना मात्र येण्यास मज्जाव करतात. स्थलांतरितांनीच उभी केलेली अमेरिका आता तेच करत आहे. जिथे सगळेच बाहेरून आलेले आहेत तिथे कोण मूळचा आणि कोण परका हे 'बळी तो कान पिळी' याच न्यायाने ठरते. त्याप्रमाणेच शेवटी अमेरिका आणि उर्वरित जग यात कोणाला कोणाची जास्त गरज आहे हाच मुद्दा स्वदेशीच्या वादातही निर्णायक ठरेल. आजवर केलेले जागतिकीकरण अमेरिकेने स्वतःच्या गरजेपोटीच केले होते, ते जगावर उपकार नव्हते.
       Reply
       1. P
        pushkar joshi
        Feb 11, 2017 at 2:23 am
        America is the country of immigrants. Trump's gparents were migrated to US from Europe. His wife also came here from Slovenia. With his statement, he does not belong to US too!!
        Reply
        1. P
         pushkar joshi
         Feb 11, 2017 at 2:37 am
         As per my knowledge the song is "God Bless America" and not "God Save America"....
         Reply
         1. R
          Ranjeet
          Feb 13, 2017 at 9:50 am
          इथे कुबेर व काँग्रेस भक्त इनोदराव कुठे लपले, अहो काही तरी प्रतिकिया द्या,मोदी भक्त कुबेरांना झोडपत आहेत.
          Reply
          1. S
           Sanjayb
           Feb 11, 2017 at 1:02 am
           अहो ट्रंपना युरोपीय देशातून अमेरीकेत येणाऱ्या लोकांकरीता आपूलकीच आहे. ते सरसकट सगळ्याच आश्रयोच्छूकांचा दुस्वास नाही करत! फक्त काही मुस्लीम राष्ट्रातून येणाऱ्या निर्वासीताना मज्जाव करण्याचा त्यांचा बेत आहे.
           Reply
           1. S
            Shriram
            Feb 11, 2017 at 4:17 am
            चौकशी केली असता आम्ही आणत असलेले ाटे आणि साबुदाणे दोन्ही भारतीयच असल्याचे कळले. आणि हा मुद्दा आणखी ताणायचा ठरवले तर ही वादावादी करणारे लेखक आणि आपल्यापैकी किमान ७५ टक्के जे द्रविड किंवा आदिवासी नाही ते सर्व आर्य वंशीय म्हणजे उपरेच. या सर्व आर्ग्युमेंट्सना राज कपूरने फार पूर्वी उत्तर देऊन ठेवले आहे. " मेरा जुता है जापानी, ये पतलून ईंग्लीस्तानी, सरपे लाल टोपी रुसी फिरभी दिल है हिंदुस्थानी." होय ! ा स्वदेशीचा अभिमान आहे आणि मी ट्रम्प यांच्या स्वदेश प्रेमाचा आदर करतो.
            Reply
            1. S
             Sudhir
             Feb 11, 2017 at 1:42 am
             कधीपर्यंत स्वतःला फसवणार? थोडी वाट बघा, NRI चे लोंढे भारतात परततील, मग कराल ट्रंपची वकिली.
             Reply
             1. S
              Sudhir
              Feb 11, 2017 at 1:34 am
              दांभिकांची नस बरोबर पकडली.
              Reply
              1. U
               umesh
               Feb 14, 2017 at 10:11 am
               कुमार केतकर नावाचं एक विकृत वेडा संपादक असताना वैश्विक (हा त्याचाच शब्द) संदर्भ देत भाजपवर दुगाण्या झाडत असे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी घालून ठार करावे लागते अशी प्रतिक्रिया नाव ना घेता दिली होती. तशी वेळ कुबेरांनी स्वतःवर आणू नये. बाकी भाजपवाल्यांनी आता ओम कुबेराय नमः हा कुबेर मंत्र म्हणायचेही सोडून दिले आहे .
               Reply
               1. U
                umesh
                Feb 14, 2017 at 10:03 am
                हा सारा जो प्रपंच केला आहे तो अगदीच तर्कहीन आहे. कारण इतिहासाचे ओझे घेऊन निर्णय होत नसतात. नाही तर मग भारतात फक्त आदिवासीच राहू शकतील. कुबेरांसकट सर्वांना हा देश सोडावा लागेल. ट्रम्प यांचा राष्ट्रप्रमुख म्हणून अधिकार मान्य करायचा नाही हा बालिशपणा झाला. मग हाच न्याय राज ठाकरेंना का नाही? त्यांची हीच भूमिका आहे ना. तिथे त्यांना झोडपून काढता कि कुबेर तुम्ही? ा वाटते कुबेर ट्रम्प आणि मोदी द्वेषाने मानसिक संतुलन घालवून बसले आहेत.
                Reply
                1. Load More Comments