03 August 2020

News Flash

बारकोड स्कॅनर

‘बारकोड स्कॅनर’चे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये असणे आवश्यक आहे.

‘बारकोड’ किंवा ‘क्यूआर कोड’ हे शब्द आता सर्वसामान्यांना परिचित झाले आहेत. कोणत्याही मोठय़ा डिपार्टमेंटल स्टोअर अथवा दुकानात किंवा मॉलमध्ये गेल्यावर आपण निवडलेल्या उत्पादनांची किंमत आता ‘बारकोड’मध्येच पाहायला मिळते. उत्पादनांच्या पाकिटावर चिकटवलेला किंवा छापलेला ‘बारकोड’ स्कॅन करून त्याची किंमत आपोआप बिलिंग मशिनमध्ये नोंदवली जाते. त्यामुळे ‘बारकोड’ हा अतिशय महत्त्वाचा सांकेतांक आहे. केवळ शॉपिंगसाठी नव्हे तर दूरध्वनी संपर्क, कॅलेंडर, ईमेल, लोकेशन, वायफाय आदी गोष्टींची माहिती मर्यादित किंवा विशिष्ट  व्यक्तींनाच मिळावी, याकरिता त्या ‘बारकोड’मध्ये पुरवल्या जातात. त्याचप्रमाणे अनेकदा छायाचित्रे किंवा संकेतस्थळांच्या लिंक तसेच तिकिटांची माहिती ‘क्यूआर कोड’च्या रूपात प्रदर्शित करण्यात येते. हा ‘कोड’ स्कॅन केल्यानंतरच संबंधित माहिती उघड होऊ शकते. अशा वेळी ‘बारकोड स्कॅनर’चे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये असणे आवश्यक आहे. अ‍ॅण्ड्रॉइड किंवा अ‍ॅप्पलच्या अ‍ॅप स्टोअरवर ‘क्यूआर’ तसेच ‘बारकोड’ स्कॅन करणारे अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत. त्यातील ‘क्यूआर अ‍ॅण्ड बारकोड स्कॅनर’(QR & Barcode Scanner)  हे अ‍ॅप लाखो लोकांनी वापरलेले आणि पसंती दिलेले अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड व इन्स्टॉल केल्यानंतर कोणत्याही क्यूआर अथवा बारकोडचे स्कॅनिंग करून त्यातील माहिती मिळवणे सोपे होते. हे अ‍ॅप त्यासाठी मोबाइलमधील कॅमेऱ्याचा वापर करते. अ‍ॅप सुरू केल्यानंतर कोणत्याही ‘कोड’कडे मोबाइलचा कॅमेरा रोखून धरल्यास आपोआप तो कोड स्कॅन होतो आणि त्यातील माहितीचा उलगडा होतो. अशा अ‍ॅपच्या मदतीने शॉपिंग करताना आपण वस्तूंच्या किमती आपल्या मोबाइलमध्ये नोंदवून घेत शॉपिंग करता करताच एकूण खरेदीचा खर्च जाणून घेऊ शकता. त्यामुळे ऐन वेळी बजेटपेक्षा जास्त खरेदी झाल्यानंतर बिलिंग काऊंटरवर होणारी तारांबळ टळू शकते. याचप्रमाणे सध्या अनेक संकेतस्थळे विविध डिस्काऊंट कूपन जाहीर करतात. हे डिस्काऊंट कूपन बारकोड किंवा क्यूआर कोड पद्धतीत दर्शवले जातात. त्यामुळे हे कूपनक्रमांक मिळवण्यासाठीही तुम्हाला ‘क्यूआर अ‍ॅण्ड बारकोड स्कॅनर’ या अ‍ॅपचा उपयोग होऊ शकतो.

फळे रसाळ मिळती खाया..

फळांचे सॅलड म्हणजे पर्वणीच. वेगवेगळ्या  चवींच्या फळांच्या फोडी एकत्रित करून त्यावर ‘टॉपिंग’ टाकून किंवा रस, दूध मिसळून खाण्यासारखी मजा कशात नाही. फळांमधून वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्त्वे आणि आरोग्याला समृद्ध करणारे घटक आपल्या शरीराला मिळत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे सॅलडमध्ये शरीराला आवश्यक असलेल्या विविध घटकांचे एकत्रित सेवनच आहे. अलीकडे तर नाश्त्याच्या वेळी अन्य काहीबाही खाण्यापेक्षा फळे किंवा फळांचा ज्यूस घेण्याला जास्त प्राधान्य दिले जाते. परंतु रोज रोज एकाच प्रकारची फळे किंवा त्यांचे सॅलड खाणे हे कंटाळवाणे ठरू शकते. खरं तर ‘फ्रूट सॅलड’च्या नाना तऱ्हेच्या मिश्रणांच्या रेसिपी उपलब्ध आहेत. त्यावर अनेक पुस्तके आणि संकेतस्थळेही आहेत. हीच माहिती आपल्या स्मार्टफोनमध्ये हवी असल्यास ‘फ्रूट सॅलड्स रेसिपीस’ (Fruit Salads Recipes)  हे अ‍ॅप उपयुक्त ठरू शकते. अवघ्या दहा मिनिटांत वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट सॅलडचे प्रकार बनवण्याची माहिती या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. केवळ फळांच्या फोडी एकत्रित करून बनवण्याच्या सॅलडखेरीज त्यात वेगवेगळ्या  प्रकारचे सॉस, मेयोनीज, आइस्क्रीम, रस मिसळून सॅलडची चव अधिक वाढवण्याची पद्धतही यात नमूद करण्यात आली आहे. याखेरीज फळांच्या सॅलडमध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा अन्य जिन्नसे मिसळून तयार करता येणारे सॅलडच्या कृती यामध्ये पुरवण्यात आल्या आहेत.

असिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2016 1:26 am

Web Title: barcode scaner
Next Stories
1 गणितातल्या गमतीजमती
2 व्हिडीओ संवाद
3 स्मार्टफोनवरील हस्तलेखन
Just Now!
X