बागकाम हा तसा प्रत्येकाच्याच आवडीचा विषय असतो. त्यामुळे घर कितीही मोठं वा छोटं असलं तरी उपलब्ध होईल त्या जागेत फुलझाडे, वनस्पती, वेली यांची लागवड केली जाते. अगदी चाळीमधल्या घरातही खिडक्यांच्या गजांना लागलेल्या कुंडय़ा दिसतात. घर आणि अंगण ऐसपैस असेल तर एखादी छोटीशी बागच फुलवली जाते. थोडक्यात, बागकामाच्या हौसेमध्ये जागेची मर्यादा आड येत नाही. असं असलं तरी प्रत्येक जण आपापल्या परीने आपली बाग फुलवण्याचा प्रयत्न करत असतो. दुर्दैवाने असं करताना योग्य ज्ञान वा मार्गदर्शन घेतलं जात नाही. चुकीच्या झाडांची निवड, कुंडय़ांची चुकीची निवड, अपुरी सूर्यप्रकाश व्यवस्था अशा अनेक गोष्टींमुळे बाग बहरत नाही. शिवाय या बगिच्याचं जमेल त्या पद्धतीने कुंडय़ा वा झाडांची भर घालताना एकत्रितपणे ते सुसंगत दिसतील का, याचाही विचार केला जात नाही. बागकामावर अनेक पुस्तके व अन्य साहित्य उपलब्ध आहे. मात्र, यासाठीही स्मार्टफोन उपयुक्त ठरू शकतो. अँड्रॉइडवरील ‘डीवायए गार्डन आयडियाज’ (DYA Garden Ideas) हे अ‍ॅप तुमच्या बागकामाला दिशा आणि सौंदर्य मिळवून देऊ शकते. या अ‍ॅपमध्ये बागेमधील झाडांची रचना कशी करावी, कुंडय़ांची आकर्षक मांडणी, वेगवेगळ्या झाडांची संगती यांसह टाकाऊ वस्तूंचा बागकामात कसा वापर करता येईल, याची माहिती दिली आहे. या सर्व गोष्टी कशा करायच्या याचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शनही या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे.
असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com

This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा