08 March 2021

News Flash

पारंपरिक फोनबुकला पर्याय

फोनबुकला पर्याय ठरू शकणारे फोनबुक अॅप अँड्रॉइडवर इन्स्टॉल करता येतात.

पारंपरिक फोनबुकला पर्याय
6मोबाइलमधील ‘कॉन्टॅक्ट्स’ अर्थात संपर्क क्रमांकांच्या यादीतून एखादा क्रमांक शोधायचे म्हणजे मोठी कसरत करावी लागते. सध्या मोबाइलमध्ये संपर्क क्रमांकांसोबत व्हॉट्सअॅप आणि ई-मेलवरील क्रमांक आणि पत्तेही मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे फोनबुकवरील क्रमांकांची संख्या जवळपास हजारच्या घरात जाते. इतक्या क्रमांकातून आपल्याला हवा तो क्रमांक शोधण्यासाठी ‘सर्च’मध्ये सावकाश एकेक अक्षर टाइप करून क्रमांक शोधण्याची वाट पाहावी लागते. एकूणच स्मार्टफोन कितीही ‘स्मार्ट’ असला तरी त्याचे फोनबुक मात्र जुन्या पारंपरिक प्रकारचे असते. पण अशा फोनबुकला पर्याय ठरू शकणारे फोनबुक अॅप अँड्रॉइडवर इन्स्टॉल करता येतात. त्यापैकीच ड्रपचे कॉन्टॅक्ट्स अॅण्ड डायलर (Contacts & Dialer by drupe) हे अॅप आहे. कोणत्याही स्क्रीनवरून तुम्ही त्वरीत हव्या त्या क्रमांकावर फोन, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप करू शकता. या अॅपच्या माध्यमातून केवळ एका ‘स्वाइप’ने कोणताही क्रमांक शोधून काढता येतो. यामध्ये ‘स्मार्ट डायलर’ची सुविधा असून त्याद्वारे त्वरित क्रमांक डायलही करता येतो. या अॅपच्या माध्यमातून आपल्या मोबाइलमधील संपर्क क्रमांकांचे अचूक व्यवस्थापनही करता येते. बऱ्याचदा फोन ‘रिस्टोअर’ केल्यानंतर फोनबुकमधील संपर्क क्रमांक ‘डुप्लिकेट’ होतात. असे क्रमांक हटवणे अँड्रॉइडच्या फोनबुकमध्ये फारच कठीण असते. मात्र ‘ड्रप’मधून ते काम सहज करता येते. फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा समाजमाध्यमांशीही हे अॅप समरूप होऊन काम करते. अनेकदा फोनबुकमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होतात. अशा वेळी ‘ड्रप’ हे उपयुक्त अॅप आहे. अशी अनेक अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

ई-मेलची सुसंगत रचना
बहुतांश लोक ईमेल क्लायन्ट म्हणून जीमेलला पसंती देतात. जास्त स्टोअरेज क्षमता आणि हाताळण्यास सहज सोपे असल्याने जीमेलकडेच वापरकर्त्यांचा ओढा असतो. अँड्रॉइड फोनमुळे जीमेलचे महत्त्व आणखी वाढले आहे. मात्र, जीमेलवरील पसारा इतका वाढला आहे की इनबॉक्समध्ये दररोज ईमेलचा पाऊस पडत असतो. यातील अनेक ईमेल जाहिराती किंवा सवलतींच्या ऑफर देणाऱ्या कंपन्यांचे असतात. अशा ईमेलचा भडिमार इतका होतो की हे पाहताना एखादा महत्त्वाचा ईमेल नजरेतून सुटून ‘डिलीट’ होण्याची शक्यता असते. जास्त जाहिराती आणि उत्पन्न यांच्या हव्यासापोटी जीमेलची ही अवस्था करणाऱ्या गुगलनेच यावर पर्याय शोधला आहे. गुगलने ‘इनबॉक्स’ हे अॅप आणले असून या अॅपच्या माध्यमातून आपल्याला येणारे ईमेल सहज आणि जलद हाताळता येतात. वापरण्यास अतिशय सोपे असलेले हे अॅप इंटरनेट डेटाचाही कमी वापर करते. या अॅपचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक वेळी नवीन ईमेल तपासण्यासाठी तो खुला करण्याची गरज भासत नाही. इनबॉक्सच्या स्क्रीनवर मेसेजसोबतच त्यातील मजकूर समजू शकतो. हे अॅप एकाच प्रकारच्या ईमेलचे ‘बंडल’ तयार करते. त्यामुळे विशिष्ट प्रकारातील ईमेल तपासायचे असल्यास तातडीने ते पाहता येतात. हे अॅप जीमेलवर अतिशय उत्तमपणे काम करते.

असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 1:31 am

Web Title: information and use of mobile apps
टॅग : Chaturang,Smartphone
Next Stories
1 आपल्या भाषेत व्यक्त व्हा
2 नवा ‘जीवनगुरू’?
3 अभ्यासाच्या प्रेमात
Just Now!
X