20 September 2018

News Flash

‘स्मार्टफोन’वरी कॅलेंडर असावे..

भिंतीवरच्या कॅलेंडरला घरात एक अढळस्थानच लाभलंय जणू!

आज ३१ डिसेंबर. चालू वर्षांचा शेवटचा दिवस. तसं पाहायला गेलं तर नवीन वर्षांचं आगमन म्हणजे सालाचा आकडा बदलणं. पण एक वर्ष सरतं तेव्हा अनेक गोष्टी वर्तमानातून भूतकाळात आठवणींच्या कप्प्यात सरकतात.(हे सदरही तुमच्या आठवणीत राहील याची खात्री आहे) कॅलेंडरकडे लक्ष जातं तेव्हा हा बदल अधिक ठसठशीतपणे जाणवतो. मग नवीन वर्षांत येणाऱ्या सणांच्या तारखा, सुट्टय़ांचे दिवस, शुभमुहूर्त हे सगळं पाहण्याची उत्सुकता भागवली जाते. थोडक्यात सांगायचं तर नवीन वर्षांतला सर्वात पहिला बदल हा भिंतीवरच्या कॅलेंडरचा असतो. काळ कितीही बदलला तरी अनेकांच्या घरातल्या भिंतीवरच्या कॅलेंडरची जागा मात्र पक्की असते. प्रत्येक वर्षांच्या पहिल्या तारखेला त्या खिळ्यावरचं कॅलेंडर बदलतं पण ती जागा कायम राहाते. भिंतीवरच्या कॅलेंडरला घरात एक अढळस्थानच लाभलंय जणू!

HOT DEALS
  • Honor 7X 64 GB Blue
    ₹ 15375 MRP ₹ 16999 -10%
  • Apple iPhone 6 32 GB Space Grey
    ₹ 24890 MRP ₹ 30780 -19%
    ₹3750 Cashback

कॅलेंडरचं हे असणं आता केवळ भिंतीपुरतं उरलेलं नाही. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये कॅलेंडर असतं. पण ते केवळ तारीख आणि वार दर्शवण्यापुरतंच. त्यामुळेच प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवर कॅलेंडरचे एकाहून एक असे अ‍ॅप आता पाहायला मिळत आहेत. अशा अ‍ॅपबाबत सांगायचं म्हटलं तर घराघरांतल्या भिंतींवर राज्य करणाऱ्या ‘कालनिर्णय’चा उल्लेख टाळून कसं चालेल? भिंतींवर डौलाने फडफडणारं ‘कालनिर्णय’चं कॅलेंडर अ‍ॅपच्या दुनियेतही आपली किमया करत आहे. ‘कालनिर्णय २०१७’ (KALNIRNAY 2017) या अ‍ॅपच्या रूपात भिंतीवरचं कॅलेंडरच आपल्या स्मार्टफोनमध्ये सामावतं. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत उपलब्ध असलेल्या कालनिर्णयच्या अ‍ॅपमध्ये आपल्याला नियमित कॅलेंडरमध्ये मिळू शकणारी सर्व माहिती उपलब्ध आहे. त्यामध्ये मासिक भविष्य, पंचांग विवाहाचे मुहूर्त, सण-उत्सव, महत्त्वाच्या व्यक्तींशी संबंधित तारखा या सर्वाची माहिती या फोनवरील ‘कालनिर्णय’मध्येही दर्शवण्यात येते. मात्र या अ‍ॅपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तारखेनुसार त्यात स्वत:च्या नोंदी करू शकता. एरवी दूधवाला, पेपरवाला किंवा घरकामगार यांच्याबाबतच्या नोंदी आपण कॅलेंडरवर लिहून करत असतो. पण या अ‍ॅपमुळे तुम्हाला या नोंदी स्मार्टफोनवर करता येतात व त्यासाठी ‘रिमाइंडर’ लावून ठेवता येतो. शिवाय महिन्यातील सर्व नोंदी तुम्ही वर्गवारी करून एकत्रितपणे पाहूदेखील शकता. यातील आणखी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे तुमच्या ‘लोकेशन’नुसार तुम्हाला सूर्योदय, सूर्यास्त यांच्या वेळा समजतात. थोडक्यात भिंतीवरच्या ‘कालनिर्णय’चा अधिक सुधारित अवतार असलेलं  हे अ‍ॅप आहे.

अशाच प्रकारचं आणखी एक अ‍ॅप म्हणजे ‘मराठी कॅलेंडर २०१७’(Marathi Calendar 2017). या अ‍ॅपमध्येही ‘कालनिर्णय’च्या अ‍ॅपसारख्याच सुविधा पाहायला मिळतील. अनेक वापरकर्त्यांनी डिझाइन आणि अंतर्गत रचना यांच्याबाबतीत या अ‍ॅपला अधिक पसंती दिल्याचं दिसून येतं. या दोन अ‍ॅपसारखे अनेक अ‍ॅप तुम्हाला प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर पाहायला व डाउनलोड करायला मिळतील. बहुतेक सर्व अ‍ॅपमध्ये समान सुविधा असतात. याशिवाय ‘पंचांग’ दर्शवणारे स्वतंत्र अ‍ॅपही तुम्हाला डाउनलोड करता येतील.

asif.bagwan@expressindia.com

(सदर समाप्त)

First Published on December 31, 2016 1:10 am

Web Title: marathi calendar app on android