News Flash

गणितातल्या गमतीजमती

गणिताकडे क्लिष्ट आणि धोकादायक विषय म्हणून पाहिले जात असले तरी...

गणित हा तसा अनेकांसाठी कठीण जाणारा विषय. पण तरीही रोजच्या व्यवहारात आपले गणिताशिवाय पानही हलत नाही. मग खरेदी करताना   बजेटचा ताळमेळ घालायचा असो की पगाराच्या पावतीवरील रकमांची आकडेमोड असो, पावलोपावली आपली गणिताशी गाठ पडत असते. गणिताकडे क्लिष्ट आणि धोकादायक विषय म्हणून पाहिले जात असले तरी अंकांची ही सरमिसळ मुळात खूप रंजक असते. केवळ या सरमिसळीची सूत्रे आपल्या लक्षात आली की, कितीही मोठी आकडेमोड आपण सहज मार्गी लावू शकतो. गणितातल्या गमतीजमती आणि युक्त्या सांगणारी अनेक पुस्तके सध्या बाजारात मिळतात. मात्र, आता या पुस्तकांच्या जंजाळात न अडकता केवळ स्मार्टफोनद्वारे तुम्ही या युक्त्या शिकून घेऊ शकता. यासाठी मॅथ्स ट्रिक्स (Math Tricks) हे अ‍ॅप एकदा वापरून पाहा.

अगदी छोटय़ा बेरजेच्या युक्त्यांपासून कठीण समीकरणांपर्यंतच्या अनेक गणितांबाबतच्या टिप्स या अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. मोठमोठय़ा संख्येच्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार क्रिया करताना अगदी काही सेकंदात उत्तर शोधण्याच्या टिप्स या अ‍ॅपमध्ये आहेत. दोन अंकी संख्येचा ११ शी गुणाकार, पाचच्या पटीतील संख्येच्या गुणाकाराची उत्तरे, ११ ते ९९ दरम्यानच्या संख्यांचे वर्ग पटकन शोधण्याची पद्धत, टक्केवारी अशा असंख्य गणितीक्रियांची त्वरित उत्तरे कशी मिळवावीत, याचे मार्गदर्शन या अ‍ॅपमधून करण्यात आले आहे. याशिवाय वापरकर्त्यांचे गणितीज्ञान पारखण्यासाठी यामध्ये काही प्रश्नावल्याही पुरवण्यात आल्या आहेत. हे अ‍ॅप लहान मुलांच्या गणितीकौशल्यात भर पाडण्यासोबतच मोठय़ांनाही दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त ठरू शकते.

‘टॅली’ स्मार्टफोनवर

भारतात सुरुवातीच्या काळात दाखल झालेल्या संगणकीय अकाउंट सॉफ्टवेअरमध्ये ‘टॅली’चा क्रमांक पहिला लागतो. मोठमोठय़ा कंपन्यांपासून छोटय़ा उद्योगांपर्यंतच्या अनेक आस्थापनांच्या व्यवहारांची नोंद आणि एकत्रित हिशोब ठेवण्यासाठी ‘टॅली’चा वापर केला जातो. अलीकडच्या काळात अनेक अद्ययावत अकाउंटिंग सॉफ्टवेअर आले आहेत. पण तरीही ‘टॅली’ची विश्वासार्हता कायम आहे. वापरण्यास सोपी, समजण्यास सुलभ आणि अतिशय उपयुक्त असलेली ही अकाउंट सिस्टीम आता संगणकावरून स्मार्टफोनवर आली आहे. टॅली ऑन मोबाइल (ळं’’८ डल्ल ट्रु’ी) नावाचे हे अ‍ॅप वापरून रोजच्या अकाउंट व्यवहारांच्या नोंदी करण्याची सुविधा यात उपलब्ध आहे. भांडवल, अ‍ॅसेट, डेबिट, क्रेडिट, व्हाउचर अशा सर्व प्रकारच्या नोंदी या अ‍ॅपमध्ये करता येतात. याशिवाय रोजचा खर्च, विक्री, खरेदी यांच्या नोंदीही या अ‍ॅपमधून स्मार्टफोनवरूनच करता येतात. विशेष म्हणजे, या अ‍ॅपवरून ट्रायल बॅलन्स, फायनल रिपोर्ट, ताळेबंद, लेजर असे सर्व प्रकारचे अहवालही तयार करता येतात.

या अ‍ॅपमध्ये बॅकअप आणि रिस्टोअरची सुविधाही असल्याने आपण नोंदवलेला डेटा नाहीसा झाल्यानंतरही परत मिळवता येऊ शकतो. स्मार्टफोनवर हे अ‍ॅप वापरण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, हिशोबांच्या नोंदी थेट एसएमएसद्वारे पक्षकारांना किंवा अन्य सहकाऱ्यांना पाठवता येतात. शिवाय या नोंदी एक्सेल किंवा पीडीएफ करण्याची सुविधाही अ‍ॅपमध्ये आहे.

असिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2016 1:14 am

Web Title: math tricks
Next Stories
1 व्हिडीओ संवाद
2 स्मार्टफोनवरील हस्तलेखन
3 वृत्तश्रवणाचा आनंद
Just Now!
X