ज्या वाचकांनी दिवाळीला काहीच खरेदी केली नाही अशा वाचकांना चुकल्यासारखे वाटण्याचे काहीच गरज नाही. याचे कारण असे की, सध्याची शेअर बाजाराची परिस्थिती पाहता टप्प्याटप्प्याची खरेदीच फायद्याची ठरेल. सरकार शेअर बाजारात चतन्य आणण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. १५ क्षेत्रांत थेट परकीय गुंतवणुकीची दारे आता उघडली आहेतच. अर्थसंकल्पापर्यंत अजून काय काय होतेय ते पाहू या.
वर्ष १९८४ मध्ये स्थापन झालेली आरती ड्रग्स ही आरती समूहातील एक यशस्वी कंपनी होय. गेल्या पाच वर्षांत कंपनीने कामगिरीत सातत्य दाखवून सरासरी २४.१७% वार्षकि वाढ दाखवली आहे. कंपनी अँटीआर्थरायटिस, अँटी फंगल, अँटिबायोटिक, मधुमेह, अँटी डिप्रेसन्ट इ. अनेक प्रकारच्या औषधांसाठी आवश्यक घटकांचे उत्पादन करते. कंपनीची तारापूर आणि सारीगाम येथे उत्पादन केंद्रे असून वरील उत्पादनांखेरीज कंपनी स्टेरॉइड्सचे उत्पादनदेखील करते. जवळपास ८५ देशांत आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या आरती ड्रग्सचे भारतातही सिप्ला, अॅबट, अव्हेन्टीस, मर्क, तेवा, फायझर, बायर, क्लॅरिएन्ट, जेबी केमिकल्स असे नामांकित ग्राहक आहेत. आपल्या संशोधनाद्वारे येत्या दोन वर्षांत कंपनी अजून अनेक नवीन उत्पादने बाजारपेठेत आणेल. यात प्रामुख्याने आधुनिक जीवनशैलीच्या विकारांवर म्हणजे मानसिक तणाव, कोलेस्टेरॉल, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, स्मृतिभ्रंश इ. समस्यांसाठीच्या ड्रग्सचा समावेश आहे. युरोपमधील बाजारपेठ काबीज करण्यासाठी कंपनीने तेथील कंपन्यांना आपल्या नफ्यातील भागीदारी दिली आहे. सप्टेंबरसाठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीची कामगिरी तितकीशी आकर्षक वाटत नसली (२५८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १५.५१ कोटीचा नक्त नफा) तरीही कंपनीने २२.५% अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. येत्या आíथक वर्षांसाठी कंपनी १,२०० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८६ कोटी रुपयांचा नफा कमावेल अशी अपेक्षा आहे. मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी आरती ड्रग्स तुमच्या पोर्टफोलियोत जरूर ठेवा.
stocksandwealth@gmail.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2015 1:04 am