23 January 2018

News Flash

एसडब्लूपी करताना काय काळजी घ्यावी?

नियमित आणि ठराविक उत्पन्न मिळवण्यासाठी एसडब्लूपी हा खरच उत्तम पर्याय आहे

लोकसत्ता टीम | Updated: July 31, 2017 1:06 AM

सिस्टिमॅटिक विथड्रावल प्लॅन

मागील सोमवारी २४ जुलैच्या अर्थ वृत्तांतमध्ये एसडब्ल्यूपी म्हणजे सिस्टिमॅटिक विथड्रावल प्लॅनबद्दल सविस्तर माहिती देणारा लेख प्रसिद्ध झाला. लेखासोबत दिलेले उदाहरण वाचल्यावर गुंतवणूकदारामध्ये काही गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणून सध्याचा हा लेख.

लेखासोबत दिलेल्या उदाहरणात २०,००,०००/— च्या गुंतवणुकीवर दर महिन्याला ५०,०००/— सिस्टिमॅटिक विथड्रावल प्लॅनद्वारे काढायचे ठरवले तर काय होईल हे आपण बघूया. यासाठी आपण असे चार अग्रगण्य (३स्र्) म्युच्युअल फंड घेतले आहेत की जे ६५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त समभाग गुंतवणूक करतात आणि त्यामुळे एका वर्षांनंतर सुरू केलेली सिस्टिमॅटिक विथड्रावल प्लॅनद्वारे मिळणारी रक्कम करमुक्त असते.

सोबतच्या तक्त्यावरून असे लक्षात येते की, जर एखाद्या गुंतवणूकदराने २०,००,००० रुपये जरी अग्रगण्य फंडात गुंतवले आणि दरमहा ५०,००० रुपये नियमित उत्पन्नासाठी काढले तर त्याचे पैसे ४ ते ५ वर्षांत संपून जातील. (इथे आपण पैसे एक वर्षांनी काढायला सुरुवात केली आहे हे लक्ष्यात घ्या. जर लगेच सुरुवात केली असती तर अजून कमी वर्षे पैसे पुरले असते.) त्यामुळे एसडब्लूपीद्वारे किती पैसे काढायचे हे ठरवण्यासाठी आपल्याला किती वर्षे दरमहा पैसे मिळणे अपेक्षित आहे यावर ते अवलंबून राहील. जर तुम्ही जास्त रक्कम काढली तर पैसे  कमी दिवस पुरतील आणि कमी रक्कम काढली तर जास्त दिवस पुरतील. अर्थात आपली गरज आणि मुदत यांचा ताळमेळ घालणे आवश्यक आहे आणि त्यासाठी गुंतवणूक सल्लागाराकडून योग्य ते मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

नियमित आणि ठराविक उत्पन्न मिळवण्यासाठी एसडब्लूपी हा खरच उत्तम पर्याय आहे; पण जर आपण योग्य काळजी घेतली तरच नाही तर असे होईल की आपण जास्त दिवस जगू. पण पैसे संपल्यामुळे आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहाण्याची आवश्यकता भासेल. जर योग्य मार्गदर्शन घेऊन आणि आयुर्मान (life expectancy) लक्षात घेऊ न जर किती पैसे काढणे योग्य आहे हे ठरवले तर नक्कीच आपण हे टाळू शकतो.

cashevade.swati@gmail.com

लेखिका गुंतवणूक सल्लागार आहेत.

First Published on July 31, 2017 1:06 am

Web Title: article about to remove confusion about systematic withdrawal plan
  1. No Comments.