20 January 2018

News Flash

अर्थ.. मशागत : आयपीओ : समृद्धीची गुरुकिल्ली

१९९२ पासून कंपन्यांना त्यांच्या आयपीओचे स्वतंत्र मुल्य निर्धारित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अजित प्रभाकर मंजुरे | Updated: July 31, 2017 1:10 AM

व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल उभारण्याकरिता सेबी एखादी नोंदणीकृत कंपनी शेअर बाजारातून दोन प्रकारे भांडवल वृद्धी करू शकते.

व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल उभारण्याकरिता सेबी एखादी नोंदणीकृत कंपनी शेअर बाजारातून दोन प्रकारे भांडवल वृद्धी करू शकते. जसे — दुय्यम रोखे बाजार आणि प्राथमिक समभाग विक्री.

दुय्यम रोखे बाजारात गुंतवणूकदार हा आधी कुणी तरी घेतलेले समभाग विकत घेत असतो किंवा घेतलेले समभाग विकत असतो. या बाजारात एकाच कंपनीच्या घेतल्या / विकल्या जाणाऱ्या समभागांची किंमत थोडय़ा फार फरकाने सतत बदलत असते वा बदलण्याची शक्यता असते. हे व्यवहार शेअर बाजाराच्या अधिकृत मान्यताप्राप्त दलालाच्या माध्यमातूनच करावे असा नियम आहे. परंतु प्राथमिक समभाग विक्रीचे तसे नाही. सेबी नोंदणीकृत कंपनी आपले समभाग थेट गुंतवणूकदारांना / ग्राहकांना विकण्याचे ठरवते (Initial Public Offerings – IPO).

सेबीने मंजुरी दिल्यानंतर, कंपनी प्राथमिक समभाग विक्रीस काढते आणि सरळ लोकांना विक्री करण्यासाठी भावसुद्धा घोषित करते. या प्राथमिक समभागाची दर्शनी किमत १० रुपये प्रती समभाग असते. नवीन पद्धतीत आता कंपनी भाव न ठरवता एक मूल्यकक्षा (कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव झ्र् फंल्लॠी) घोषित करते. कंपनीच्या आयपीओना असलेल्या मागणीवर त्याचे मूल्य ठरते. जो कुणी हे प्राथमिक समभाग घेण्यास उत्सुक असतो तो ते घेऊ  शकतो. मात्र ही खरेदी — विक्री ग्राहक परस्पर करू शकत नाही. प्राथमिक समभाग विक्रीनंतर कंपनी रोखे बाजारावर अधिकृत होते आणि त्यानंतर कंपनीचे शेअर्स पुर्नविक्रीसाठी दुय्यम रोखे बाजारात उपलब्द्ध होतात.

वाचकांच्या प्रतिसादातून आलेली विशेष मागणी लक्षात घेता आजचे सदर मुख्यत: आयपीओवर आधारित आहे. वक्ता म्हणून गेल्यावर अनेक वेळा गुंतवणूकदाराच्या मनातील आयपीओ संदर्भातील प्रश्न समोर येतात. जसे – आयपीओमधील गुंतवणुकीत जोखीम नसते ना? आयपीओ घेण्यासाठी डिमॅट अकाऊंटची गरज असते का? बँकेचे खाते अरइअ स्वरूपाचे असावे का? सेबीचा मंजूरी टॅग गुंतवणुकदारासाठी आयपीओला सुरक्षित बनवतो का?

आजच्या काळात सातत्याने वाढत चाललेली आयपीओची मागणी लक्षात घेता प्रत्येक गुंतावणूकदाराने आयपीओशी संलग्न काही महत्वाचे घटक अभ्यासणे आवश्यक आहे. जसे —

आयपीओ खरेदी करावयाचे असल्यास अर्ज भरणे आवश्यक आहे. हा अर्ज सामान्यत: शेअर ब्रोकर, लिड मॅनेजर, सिंडिकेट सदस्य आणि कलेक्टींग बँककडून उपलब्ध होऊ शकतो. अर्ज, चेक/डिमांड ड्राफ्ट आयपीओ च्या कलेक्टींग बँकेमध्ये (नाव व पत्ते अर्जावर छापलेले असतात) त्यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. अपूर्ण/अयोग्य अर्ज नाकारले जाऊ  शकतात.

आयपीओ खरेदीसाठी डिमॅट अकाऊंट असणे आवश्यक आहे. हे कोणत्याही मान्यताप्राप्त ऊढ कडे असले तरीही चालते.  कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकदारास अर्जासोबत १०० % रक्कम(MARGIN) मार्जिन म्हणून भरावीच लागते.

आयपीओची विक्री पूर्वनियोजित कालावधीत केली जाते आणि त्यानंतर ठराविक दिवशी त्याचे छकरळकठॅ केले जाते.  खरेदी करणाऱ्याचे बँक खाते अरइअ (Application Supported by Blocked Amount) या स्वरूपाचे असणे बंधनकारक आहे.

सध्याच्या नियमानुसार, १ वर्षांहून अधिक काळासाठी केलेल्या आयपीओमधील गुंतवणूक भांडवली लाभासाठी करमुक्त आहे.   प्रस्ताव दस्ताऐवजच्या दिलेल्या घटकांवर आधारित, गुंतवणूकदाराने स्वत: माहितीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे.

सेबी स्वत: कोणत्याही कंपनीशी निरपेक्षपणे जोडलेली असते म्हणून गुंतवणूकदाराने कंपनीच्या व्यवसायाचा सविस्तर अभ्यास करूनच गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.

माहिती उघड करणारे कागदपत्र (डिसक्लोजर्स) / प्रस्ताव लेख (ऑफर डॉक्युमेंटस्) संपूर्ण आयपीओबद्दल माहिती देणारे असतात म्हणून गुंतवणूकदाराने त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणे महत्वाचे ठरते.

१९९२ पासून कंपन्यांना त्यांच्या आयपीओचे स्वतंत्र मुल्य निर्धारित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सेबी आयपीओचे मुल्य ठरवण्यामध्ये कोणतीच भूमिका बजावत नाही. कंपनीने प्रस्ताव पत्रात ठरविलेल्या मुल्याचे सखोल स्पष्टीकरण दिलेले असते. यामध्ये किंमतीच्या गुणात्मक व परिमाणवाचक घटकांची माहिती दिलेली असते याची गुंतवणूकदाराने विशेषत: नोंद घ्यावी.

FIXED PRICE IPO चे दोन प्रकार असतात —

छोटे गुंतवणूकदार — २ लाख रुपयांपर्यंत गुंतवू शकतात.

कंपन्या/ उच्च मालमत्ता असलेले गुंतवणूकदार — गुंतवणूकदार २ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम गुंतवू शकतात.

काही नवीन येणारे : आयपीओमध्ये रेल्वेने सार्वजनिक क्षेत्रातील चार मोठय़ा कंपन्यांच्या (आयआरसीटीसी, आयआरएफसी, रि—टीईएस आणि इरकॉन) आयपीओच्या नोंदणीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. वरील आयपीओ हे फक्त उदाहरणार्थ इथे नमूद केले आहे. असे अनेक विविध कंपनीचे आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आयपीओबद्दल मोजकी माफक माहिती मांडण्याचा प्रयत्न येथे केला आहे. तरीही गुंतवणूकदारासाठी काही संकेतस्थळे आहेत जिथे आयपीओबद्दल योग्य माहिती उपलब्द्ध आहे – www.chitodgadh.com,  www.crisil.com, www.careratings.com

गुंतावणूकदराने कोणत्याही जाहिरातीला बळी न पडता योग्य आर्थिक सल्लागाराची मदत घेत, स्वत: कंपनीच्या कामाचा — आर्थिक विकासाचा आढावा घेत अभ्यासपूर्वक निर्णय घेतल्यास आयपीओ ही आर्थिक यशाची गुरुकिल्ली ठरू शकेल.

अजित प्रभाकर मंजुरे AjitM@cdslindia.com

लेखक सीडीएसएलच्या गुंतवणूक साक्षरता विभागाचे प्रमुख आहेत.

First Published on July 31, 2017 1:10 am

Web Title: articles about initial public offering
  1. No Comments.