06 August 2020

News Flash

माझा  पोर्टफोलियो : निर्यातक्षम उत्पादने आणि किफायतशीर संधी

आज कॉस्टिक सोडय़ाचे उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते.

(संग्रहित छायाचित्र)

राज्य सरकारने स्थापन केलेल्या काही यशस्वी कंपन्यांपैकी एक म्हणजे  गुजरात अल्कलीज अ‍ॅण्ड केमिकल्स लिमिटेड. १९७३ मध्ये म्हणजे ३५ वर्षांपूर्वी गुजरात सरकारने स्थापन केलेली ही कंपनी उत्तम गुणवत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या बळावर चांगलीच यशस्वी ठरली आहे. कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलापैकी आता सरकारी हिस्सा ४६.२८ टक्क्यांवर आला आहे. सुरुवातीच्या काळात वार्षिक ३७,४२५ मेट्रिक टन कॉस्टिक सोडय़ाचे उत्पादन करणाऱ्या गुजरात अल्कलीजने गेल्या २५ वर्षांत आपली वार्षिक उत्पादन क्षमता १० पटीने वाढवून ती ३५८,७६० मेट्रिक टनांवर नेली आहे. आज कॉस्टिक सोडय़ाचे उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. जगभरात आपल्या उत्पादनांची निर्यात करणाऱ्या गुजरात अल्कलीजचे गुजरातमधील वडोदरा आणि दहेज इथे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आहेत. कॉस्टिक सोडा बाजारपेठेत १६ टक्के हिस्सा असणाऱ्या या कंपनीची सोडियम सायनाईड, हायड्रोजन पॅरॉक्साइड, फॉस्फरिक अ‍ॅसिड, पोटॅशियम काबरेनेट इ. इतर उत्पादनेदेखील आहेत. गेल्या आर्थिक वर्षांचे म्हणजे मार्च २०१८ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी तसेच तिमाहीसाठी कंपनीने आतापर्यंतची उत्तम कामगिरी करून दाखवली आहे.

कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत २४५४.५ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. ती आधीच्या वर्षांच्या तुलनेत ३२.१ टक्क्यांनी अधिक आहे, तर नक्त नफ्यात ७४ टक्के वाढ होऊन तो ५३५ कोटी रुपयांवर गेला आहे. मार्च २०१८ साठी संपलेल्या तिमाहीसाठी ६९७.३२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २२१.०६ कोटी रुपयांचा नक्त नफा कंपनीने कमावला आहे. तो तुलनेत १५६ टक्क्यांनी जास्त आहे.

अर्थात, अशीच कामगिरी कंपनी जून २०१८ साठीच्या पहिल्या तिमाहीत करून दाखवेल का हे येथे महत्त्वाचे ठरेल. कारण गेल्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नातील मोठा वाटा म्हणजे सुमारे ६० कोटी रुपये हे इतर उत्पन्न म्हणून आले आहेत. तसेच या क्षेत्रातील इतर कंपन्यांचे प्राइस अर्निग गुणोत्तरदेखील कमीच आहे. परंतु तरीही सध्या आपल्या पुस्तकी मूल्याच्या जवळपास असलेला हा शेअर किफायतशीर असल्याने खरेदीसाठी सुरक्षित आणि आकर्षक वाटतो.

गुजरात अल्कलीज          

(बीएसई कोड – ५३०००१)

मिड कॅप समभाग

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                                                      ४६.२८

परदेशी गुंतवणूकदार                                  ४.०४

बँक/ म्यु. फंड / सरकार                              ५.७५

इतर                                                           ४३.६८

बाजारभाव (रु.)                                          ५१४.४५

उत्पादन/ व्यवसाय                                    रसायने

भरणा झालेले भागभांडवल                  ७३.४४ कोटी रु.

पुस्तकी मूल्य (रु.)                                      ५२०.५

दर्शनी मूल्य (रु.)                                         १०/-

लाभांश (%)                                                 ६५%

प्रति समभाग उत्पन्न (रु.)                          ७२.९

पी/ई गुणोत्तर                                              ७.२

समग्र पी/ई गुणोत्तर                                    ८.४

डेट/इक्विटी गुणोत्तर                                   ०.११

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर                            ५१.३५

रिटर्न ऑन नेटवर्थ (%)                                     ९.८

बीटा                                                                  ०.९

बाजार भांडवल (कोटी रु.)                                 ३,८७१

५२ आठवडय़ातील उच्चांक/ नीचांक (रु.)     ९३२/३८०

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 5:46 am

Web Title: company profile for gujarat alkalies
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : दीडशे अंशांतील निफ्टीचे दमसांस!
2 प्राप्तिकर विवरणपत्र चुकारहित दाखल करण्यासाठी टिप्स!
3 फंड विश्लेषण : दिसते मजला सुख चित्र नवे!
Just Now!
X