30 October 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : विद्युतीय ध्यास, उज्ज्वल व्यवसायपथ

जगातील एकमेव कंपनी असून कंपनीची भारतात आठ तर मेक्सिको आणि ब्राझील येथे उत्पादन केंद्रे आहेत.

केईसी इंटरनॅशनल लि.

वर्ष १९७९ मध्ये स्थापन झालेली केईसी इंटरनॅशनल ही आरपीजी समूहाची जागतिक दर्जाची ध्वजाधारी कंपनी असून ती मुख्यत्वे इंजिनीअरिंग, प्रॉक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे ईपीसी व्यवसायात आहे. जगभरातील ६३ देशांत इन्फ्रास्ट्रक्चरची कामे करणारी केईसी इंटरनॅशनल जवळपास सर्वच पायाभूत क्षेत्रांत म्हणजे ऊर्जा वितरण, अक्षय्य ऊर्जा, केबल्स, रेल्वे आणि इतर नागरी सुविधा कामात अग्रेसर आहेत. चार टॉवर टेस्टिंग स्टेशन असलेली ही जगातील एकमेव कंपनी असून कंपनीची भारतात आठ तर मेक्सिको आणि ब्राझील येथे उत्पादन केंद्रे आहेत. कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी निम्म्याहून आधिक उलाढाल परदेशातील असून सध्या कंपनी १८० हून अधिक प्रकल्प राबवीत आहे. ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत कंपनीकडे १४,००० कोटींहून अधिक रुपयांच्या ऑर्डर प्रलंबित आहेत. यात प्रामुख्याने जॉर्डन, इजिप्त, सौदी अरब आणि आखाती देशांच्या मोठय़ा ऑर्डर्स आहेत. येत्या वर्षभरात या ऑर्डर पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच या तिमाहीचे आर्थिक निकालही उत्कृष्ट आहेत. कंपनीने यंदाच्या तिमाहीत १८८३.६६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८.२२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ७४ टक्क्यांनी जास्त आहे. येत्या चार वर्षांत संपूर्ण रेल्वेचे विद्युतीकरण करण्याचा सरकारचा मानस आहे. याचा मोठा फायदा केईसीसारख्या कंपन्यांना होऊ  शकतो. सध्या इन्फ्रास्ट्रक्चर हे गुंतवणुकीसाठी आकर्षक क्षेत्र तर आहेच, परंतु त्याचबरोबर उत्तम आणि अनुभवी प्रवर्तक, मोठे ऑर्डर बुक आणि कामगिरीतील सातत्य यामुळे केईसी मध्यमकालीन आकर्षक गुंतवणूक ठरू शकेल.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2017 2:00 am

Web Title: company profile for kec international ltd
Next Stories
1 गुंतवणूक भान : लोकानुनय टाळणे सरकारला शक्य आहे?
2 कर समाधान : कर निर्धारण तपासणी प्रक्रिया आणि शंका-समाधान
3 फंड विश्लेषण : जरा विसावू  या वळणावर..
Just Now!
X