30 September 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : संरक्षण खर्चातील वाढीचा लाभ जरूरच!

सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील स्फोटके बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे.

येत्या पाच वर्षांत संरक्षण क्षेत्रावरील खर्च वाढवणार असल्याने या कंपनीने आपली उत्पादन क्षमता दुप्पट करायचा निर्णय घेतला आहे. येत्या चार वर्षांत कंपनीला सरकारकडून सुमारे ५००६०० कोटी रुपयांची कामे मिळणे अपेक्षित आहे. जवळपास ४० देशांत आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या कंपनीचे जागतिक बाजारातही चांगले नाव आहे.

सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील स्फोटके बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. भारतातील १० राज्यांत २५ प्रकल्प असलेल्या या कंपनीचे परदेशातही तीन प्रकल्प आहेत. जगभरातील ४० देशांत तिचे विपणन आणि वितरण जाळे पसरले आहे. भारतातील एकूण उत्पादनाच्या ३० टक्के हिस्सा असलेल्या सोलर इंडस्ट्रीजचा निर्यातीत ५७ टक्के हिस्सा आहे. स्फोटकांचा मुख्य ग्राहक खनिज कंपन्या असल्याने तिच्या ग्राहकांच्या मांदियाळीत सर्व प्रमुख खनिज कंपन्या आहेत. कंपनीचा मुख्य ग्राहक कोल इंडिया असून तिच्या एकूण उत्पन्नापैकी २६ टक्के वाटा कोल इंडियाचा आहे. गेली काही वर्षे खनिज कंपन्यांचे दिवस तितकेसे बरे नसले तरी आता परिस्थिती सुधारत असून सध्या या क्षेत्राची वाढ वार्षिक १२ टक्क्यांपर्यंत वधारली आहे. सध्याचा बाजार कल पाहता येत्या काही वर्षांत ती १८-२० टक्क्यांपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे.

याखेरीज सरकारने संरक्षण क्षेत्राला ‘मेक इन इंडिया’ अभियानात प्राधान्य दिले आहे हे लक्षात घेता सोलर इंडस्ट्रीजसारख्या मोजक्या कंपन्यांना यांचा फायदा होईल. संरक्षण मंत्रालय येत्या पाच वर्षांत या क्षेत्रातील खर्च वाढवणार असल्याने कंपनीने त्याला अनुसरून आपली उत्पादन क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या चार वर्षांत कंपनीला सरकारकडून सुमारे ५००-६०० कोटी रुपयांच्या ऑर्डर्सची अपेक्षा आहे. जवळपास ४० देशांत आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या सोलर इंडस्ट्रीजचे जागतिक बाजारातही चांगले नाव आहे. कंपनीचा दक्षिण आफ्रिकेतील प्रकल्प पुढील सहा महिन्यांत कार्यान्वित होत असून त्याचे सकारात्मक परिणाम पुढील आर्थिक वर्षांपासून दिसू लागतील.

जून २०१६ अखेर समाप्त पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने ३१६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३५.४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो २० टक्के जास्त आहे. भरणा झालेल्या भागभांडवलापैकी केवळ ४ टक्के हिस्सा सामान्य जनतेकडे असलेल्या आणि केवळ ०.४ बीटा असलेल्या सोलर इंडस्ट्रीजचा शेअर थोडा महाग वाटत असला तरीही दोन वर्षांत तो तुम्हाला ५० टक्क्यांच्या घरात परतावा देऊ शकेल.

arth4-new1

stocksandwealth@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 1:02 am

Web Title: costs growth defense sector
Next Stories
1 कर समाधान : गुंतवणूक सवलत फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठीच!
2 वित्त भान : स्वभावाला औषध.. आहे, हो!
3 अर्थ नियोजन : निवृत्ती नियोजन – भाग पहिला
Just Now!
X