15 October 2019

News Flash

डेट फंडाची विक्री  आणि कर आकारणी!

आपण निवासी भारतीय असल्यामुळे आपल्याला कमाल करमुक्त उत्पन्नाचा फायदासुद्धा घेता येतो.

*  प्रश्न :  मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझे करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. माझ्याकडे डिसेंबर २०१५ मध्ये खरेदी केलेले डेट म्युच्युअल फंडातील युनिट्स आहेत. हे मी ३६ महिन्यांनंतर विकले तर मला महागाई निर्देशांकाचा फायदा घेऊन २० टक्के इतका कर भरावा लागेल आणि हे युनिट्स मी खरेदी केल्या तारखेपासून ३६ महिन्यांपूर्वी विकले तर मला यावर माझ्या उत्पन्नाच्या स्लॅबप्रमाणे ५ टक्के इतका कर भरावा लागतो. मी हे फंड खरेदी केल्या तारखेपासून ३६ महिन्यांच्या आत विकून ५ टक्के स्लॅबचा फायदा घेऊ  शकतो का?

– प्रकाश देशपांडे, नागपूर

उत्तर : आपण डेट फंडातील युनिट्स खरेदी केल्या तारखेपासून ३६ महिन्यांनंतर विकले तर ती संपत्ती दीर्घ मुदतीची संपत्ती होते. त्यामुळे यावर महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येतो. असा फायदा घेऊन गणलेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर आपल्याला २० टक्के इतका कर भरावा लागतो. आपण निवासी भारतीय असल्यामुळे आपल्याला कमाल करमुक्त उत्पन्नाचा फायदासुद्धा घेता येतो. डेट फंडातील युनिट्स खरेदी केल्या तारखेपासून ३६ महिन्यांत विकले तर अल्प मुदतीचा भांडवली नफा होतो आणि त्यावर आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो. आपल्या बाबतीत एकूण करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यामुळे आपल्याला ५ टक्क्यांप्रमाणे कर भरावा लागेल. आपल्या माहितीसाठी डेट फंड अल्प मुदतीत विकला आणि दीर्घ मुदतीत विकला तर कर आकारणी कशी होते हे दर्शविणारा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे असेल. (तक्ता पाहा)

आपण हे युनिट्स डिसेंबर २०१८ पूर्वी विकल्यास आपल्याला कर भरावा लागणार नाही; परंतु डिसेंबर २०१८ नंतर विकल्यास आपल्याला वरीलप्रमाणे कर भरावा लागेल.

First Published on July 16, 2018 1:01 am

Web Title: debt mutual fund and tax assessment