07 April 2020

News Flash

फंड विश्लेषण : हे ‘आनंदा’चे देणे

नियोजनबद्ध गुंतवणुकीतून दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीसाठी मल्टीकॅप फंड एक चांगला पर्याय आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

आनंद राधाकृष्णन यांच्याशी परिचय झाल्याला वीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तत्कालीन वरिष्ठ सहकारी मिलिंद भुरे यांच्यामुळे आनंद राधाकृष्ण यांच्याशी परिचय झाला. आनंद राधाकृष्णन त्या वेळी सुंदरम न्यूटन (सध्याचा सुंदरम म्युच्युअल फंड) या फंड घराण्यात सुंदरम बॉण्ड सेव्हर (नाव बदलानंतर सुंदरम मीडियम टर्म बॉण्ड फंड) या फंडाचे निधी व्यवस्थापक होते. वर्षांतून एकदा चेन्नईला गेल्यानंतर सुंदरम आणि फ्रँकलिन टेम्पलटनच्या फंड व्यवस्थापकांना भेट होतच असते. या वीस वर्षांत वर्षांतून एखादी भेट आणि नियमित फोन किंवा मेलच्या माध्यमातून संपर्कात खंड पडलेला नाही. दरम्यानच्या काळात २००४ मध्ये आनंद राधाकृष्ण सुंदरम म्युच्युअल फंड सोडून फ्रँकलिन फंड घराण्यात रुजू झाले आणि सध्या ते या फंड घराण्याचे समभाग गुंतवणुकीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. ‘सेबी’च्या आदेशाच्या अंमलबजावणीनंतर अनेक फंडाच्या गुंतवणूक धोरणांत, संदर्भ निर्देशांकात बदल हे अनिवार्य असले तरी फ्रँकलिन इंडिया इक्विटी फंड या फंडाचे नाव वगळता काहीही बदल झालेले नाही. बीएसई ५०० हा संदर्भ निर्देशांकसुद्धा तोच आहे.

सेबीच्या म्युच्युअल फंडाचे सुसूत्रीकरण करण्याच्या आदेशाच्या अंमलबजावणीनंतर मल्टीकॅप फंड प्रकार वगळता अन्य फंड गटातील फंडाच्या समभाग निवडीवर मर्यादा आल्या आहेत. समभाग निवडीचे स्वातंत्र्य केवळ मल्टीकॅप फंडांना आहे. मल्टीकॅप फंड गटातील फ्रँकलिन इंडिया इक्विटी फंड हा सर्वात जुना (२४ वर्षे) आणि सर्वाधिक मालमत्ता (११,४७० कोटी) असलेला फंड आहे. या २४ वर्षांत १ लाखाच्या गुंतवणुकीचे १८ जुलैच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार बाजारमूल्य ५७.४३ लाख असून फंडाने वार्षिक १८.५४ वार्षिक टक्के दराने परतावा दिलेला आहे.

हा फंड मल्टीकॅप फंड गटात मोडतो. एस अ‍ॅण्ड पी बीएसई ५०० निर्देशांकातील समभाग फंडाच्या गुंतवणुकीसाठी निश्चित करण्यात आले आहेत. गुंतवणुकीच्या परिघात ५०० समभाग असले तरी १५० समभागांचा गुंतवणुकीत कधीही समावेश झालेला नाही. एस अ‍ॅण्ड पी बीएसई ५०० निर्देशांकात अंतर्भूत असलेल्या समभागांपैकी गुंतवणुकीचा कधी ना कधी हिस्सा बनलेले ३५० समभाग आहेत. एकूण गुंतवणुकीत सरासरी ७० टक्के लार्ज कॅप आणि ३० टक्के मिड कॅप समभाग राखण्यात आले आहेत. फंडाच्या गुंतवणुकीतील लार्ज कॅप मिड कॅप गुणोत्तर एका विशिष्ट मर्यादेत राखण्यावर निधी व्यवस्थापकांचा कटाक्ष दिसून येतो. गुंतवणुकीसाठी ‘टॉप डाऊन अ‍ॅप्रोच’ वापरला जातो. नजीकच्या एक दोन वर्षांत उमदा भांडवली परतावा देऊ शकतील अशा उद्योग क्षेत्रात संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक तर जवळच्या काळात भांडवली मूल्यात घट होऊ शकेल अशा उद्योग क्षेत्रात संदर्भ निर्देशांकातील त्या उद्योग क्षेत्रातील प्रमाणापेक्षा कमी गुंतवणूक केली आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवा, टेलीकॉम उद्योग, आरोग्य निगा क्षेत्रात निर्देशांकापेक्षा अधिक तर तंत्रज्ञान क्षेत्रात निर्देशांकापेक्षा कमी गुंतवणूक केली आहे. मागील तीस दिवसांत फंडाच्या गुंतवणुकीत कोणताही समभागाचा नव्याने समावेश झालेला नाही तसेच कोणत्याही समभागाला वगळण्यात आलेले नाही. फंडाच्या गुंतवणुकी मागील वर्षभरात ५०ते ५५ समभागांचा समावेश राहिलेला आहे. नियोजनबद्ध गुंतवणुकीतून दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीसाठी मल्टीकॅप फंड एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड सुसूत्रीकरणानंतर ही लवचीकता अन्य फंडांना राहिलेली नाही. या फंडाचे नाव सुसूत्रीकारणानंतर फ्रँकलिन इंडिया प्रायमा प्लसचे नाव फ्रँकलिन इंडिया इक्विटी फंड झालेले असून हा नाम बदल वगळता फंडाचे गुंतवणूक धोरण संदर्भ निर्देशांकसारख्या परताव्यावर परिणाम घडविणाऱ्या गोष्टी बदललेल्या नाहीत. या दूरच्या वित्तीय ध्येयांसाठी या फंडाचा गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्यानुसार समावेश करता येईल

फ्रँकलिन इंडिया इक्विटी फंड       

*  फंड प्रकार   :      मल्टी कॅप इक्विटी फंड

*  फंडाची पहिली एनएव्ही : २९ सप्टेंबर १९९४

*  सध्याची एनएव्ही  (२० जून २०१८ रोजी)

वृद्धी    : ५७२.६७

लाभांश : ३७.७६

*  फंडाचा संदर्भ निर्देशांक : निफ्टी ५०० टोटल रिटर्न इंडेक्स   

*  किमान एसआयपी    :      ५०० रु.

*  किमान गुंतवणूक     :   ५००० रु.

*  पोर्टफोलिओ पी/ई     :      १.९ वर्षे

*  पोर्टफोलिओ बीटा      :     ०.९२

*  प्रमाणित विचलन   :      ०.६६२

*  एग्झिट लोड :      ३६५ दिवसांआधी १ टक्का,                 

                                ३६५ दिवसांनंतर लोड नाही.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2018 1:02 am

Web Title: fund analysis franklin india equity fund
Next Stories
1 वित्त मानस : एसआयपी पद्धतशीर गुंतवणूक योजना
2 माझा  पोर्टफोलियो : निर्यातक्षम उत्पादने आणि किफायतशीर संधी
3 बाजाराचा तंत्र कल : दीडशे अंशांतील निफ्टीचे दमसांस!
Just Now!
X