अमेरिकेने छेडलेल्या वैश्विक व्यापारयुद्धामुळे हाँगकाँगचा हँगसेंग बाजार दिवसांतर्गत हजार गुणांनी कोसळत असताना गेल्या आठवडय़ात भारतीय भांडवली बाजार स्थितप्रज्ञ तर होताच, पण सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक आपले ३४,९३७/ १०,५५०चे स्तर राखून होते. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव –

trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!

’  सेन्सेक्स  : ३५,६५७.८६

’  निफ्टी     :      १०,७७२.७०

सध्या निफ्टीच्या आलेखावर १५० अंशांचा आखूड सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) निर्माण झाला आहे. उदा. (१) १०,५५० अधिक १५० अंश म्हणजे १०,७०० (२) १०,७०० अधिक १५० अंश म्हणजे १०,८५० (३) १०,८५० अधिक १५० अंश म्हणजे ११,००० अशी निफ्टीची शिस्तबद्ध हालचाल अपेक्षित असेल. तथापि निर्देशांकांनी ३४,९३७/ १०,५५०चा स्तर कायम  राखल्यास प्रथम वरचे उद्दिष्ट ३६,०००/ १०,९५० ते ११,००० असेल.

लक्षणीय समभाग

सन फार्मा लि.

(बीएसई कोड – ५२४७१५)

शुक्रवारचा बंद भाव – रु. ५५८.१०

सन फार्मा ही कर्करोग, हृदयरोग, श्वसनरोग तसेच शरीरातील बहुतांश व्याधींवर औषधे बनविणारी आणि ती अमेरिकेला औषधे निर्यात करणारी आघाडीची कंपनी आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या गुजरातस्थित हलोल येथील अमेरिकेला निर्यात करणाऱ्या औषध उत्पादन प्रकल्पाला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मंजुरी दिल्यामुळे सन फार्माला नवसंजीवनी मिळाली. सन फार्मा समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ५५० ते ६०० आहे. हा समभाग अल्पावधीत झपाटय़ाने वाढल्याने हा समभाग रु. ५२० ते ५४० दरम्यान प्रत्येक घसरणीत घेण्यासारखा आहे. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्य़ांच्या चार तुकडय़ांत विभागून खरेदीचा विचार करावा. सन फार्माची शाश्वत तेजी ही ६०० रुपयांच्या वर सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे उद्दिष्ट हे ६५० रुपये, नंतरचे प्रथम उद्दिष्ट ६९० ते ७०० रुपये आणि दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे ८०० रुपये असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला ४९० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

सोन्याचा किंमत-वेध

सोन्याच्या भावाने ३०,२५० रुपयांचा स्तर राखत, सोने रु. ३०,५०० वर स्थिरावले. सोन्याच्या बाबतीत ३०,५०० ही ‘महत्त्वाची कल निर्धारण पातळी’ आहे. येणाऱ्या दिवसांत सोने ३०,५०० रुपयांच्या वर सातत्याने टिकल्यास ३०,८५० ते ३१,००० ही वरची उद्दिष्टे असतील. अन्यथा ३०,५००च्या स्तराखाली सोने ३०,२५० ते ३०,००० पर्यंत खाली घसरू शकते.  (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ashishthakur1966@gmail.com