13 July 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : दीडशे अंशांतील निफ्टीचे दमसांस!

सिप्ला ही हृदयरोग, मधुमेह, हिवताप व शरीरातील बहुतांश व्याधींवर औषधे बनविणारी कंपनी आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

जिम्नॅस्टिकमधील एअरोबिक्स (दमसांस) खेळ प्रकारात खेळाडू हातात िरग घेऊन जी शिस्तबद्ध-लयबद्ध हालचाल करून सर्वाना भारावून टाकतात तशीच काहीशी निफ्टीची १५० अंशांच्या टप्प्यातील (बॅण्डमधील) गेल्या आठवडय़ातील लयबद्ध हालचाल होती. त्यात निफ्टीचा तोल जाण्याची पुरेपूर शक्यता होती ती म्हणजे.. अमेरिकेने पुन्हा नव्याने चिनी वस्तूंवर अतिरिक्त वाढीव कर लावणारी सूची जारी केली. त्यामुळे आशियाई, युरोपीय, अमेरिकी भांडवली बाजार कोसळत होते. तसे असताना निफ्टीने मात्र ११,०००ची मोहक गिरकी घेऊन सर्वाना सुखद धक्का दिला. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव –

*  सेन्सेक्स  : ३६,५४१.६३
*  निफ्टी     :       ११,०१८.९०

चालू वर्षांतील २३ मार्चच्या सेन्सेक्स-निफ्टीच्या अनुक्रमे ३२,४८३/ ९,९५०  नीचांकापासून तेजीचे एकच लक्ष्य ३७,६०० / ११,२५० ते ११,३५० डोळ्यासमोर ठेवून त्याची प्रतिक्षा ही ‘जीवलगा कधी येशील तू’ याप्रमाणे वाट पाहिली आणि आता ते उद्दिष्ट हे हाकेच्या अंतरावर आहे. या आठवडय़ातील तेजीच्या मार्गातील ३६,७०० / ११,०८० हे छोटासे अडथळे असतील. एखाद्या संक्षिप्त घसरणीत निर्देशांक ३५,८०० ते ३६,००० / १०,८०० ते १०,९५० पर्यंत खाली येऊन नंतर आपले प्रथम वरचे उद्दिष्ट ३७,२०० / ११,१५० आणि नंतर ३७,६००/ ११,२५० ते ११,३५०चा नवीन उच्चांक दृष्टिपथात येईल.

लक्षणीय समभाग

सिप्ला लिमिटेड

(बीएसई कोड – ५०००८७)

शुक्रवारचा बंद भाव – रु. ६२६.७०

*  सिप्ला ही हृदयरोग, मधुमेह, हिवताप व शरीरातील बहुतांश व्याधींवर औषधे बनविणारी कंपनी आहे. सिप्लाच्या समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ५९० ते ६५० असा आहे. सिप्लाच्या समभागात शाश्वत तेजी ही रु. ६५०च्या स्तरावर सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम उद्दिष्ट हे रु. ६९० ते ७०० आणि द्वितीय उद्दिष्ट हे रु. ७५० ते ८०० असे असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे रु. ८७० असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. ५७५चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

सोन्याचा किंमत-वेध

* गेल्या लेखात नमूद केलेली सोन्याच्या किमतीवरील महत्त्वाची कलनिर्धारण पातळी ही रु. ३०,५०० होती. गेल्या आठवडय़ात सोने रु. ३०,५००च्या वर सातत्याने टिकू न शकल्याने सोने रु. ३०,००० पर्यंत घसरले. नंतर कदाचित सोने २९,७०० पर्यंत घसरू शकते. सोन्यावर शाश्वत तेजी ही रु. ३०,५००च्या वर सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट हे रु. ३०,८०० ते ३१,१०० असेल. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ashishthakur1966@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 5:42 am

Web Title: indian gold market and stock market review
Next Stories
1 प्राप्तिकर विवरणपत्र चुकारहित दाखल करण्यासाठी टिप्स!
2 फंड विश्लेषण : दिसते मजला सुख चित्र नवे!
3 कर-बोध :  विवरणपत्र वेळेत दाखल करा.. अन्यथा विलंब शुल्क भरा!
Just Now!
X