10 December 2018

News Flash

गुंतवणूक कट्टा.. : थेंबे-थेंबे तळे साचे!

आनंदाचा अनुभव प्रत्यक्ष गुंतवणूकगिरीतूनच येईल.

गुंतवणूक ही अंगी भिनवले जाणारे दीर्घावधीचा दृष्टिकोन असलेले आणि नियोजनबद्ध शिस्तीचे वळण.. हे सांगायला-ऐकायला सोपे अनुसरायला मात्र कठीणच! म्युच्युअल फंड आणि शेअरमध्ये नेमके उद्दिष्ट राखून पैसे गुंतवायचे आणि ते यथावकाश वाढलेले पाहणे या सारखा दुसरा आनंद नाही. या आनंदाचा अनुभव प्रत्यक्ष गुंतवणूकगिरीतूनच येईल. या गुंतवणूकगिरीची भूमिका प्रत्यक्ष कशी निभावता येईल त्याचा साद्यंत मासला पेश करणारे पाक्षिक सदर पुढील वर्षभर, प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी.. गुंतवणूक ही अंगी भिनवले जाणारे दीर्घावधीचा दृष्टिकोन असलेले आणि नियोजनबद्ध शिस्तीचे वळण.. हे सांगायला-ऐकायला सोपे अनुसरायला मात्र कठीणच! म्युच्युअल फंड आणि शेअरमध्ये नेमके उद्दिष्ट राखून पैसे गुंतवायचे आणि ते यथावकाश वाढलेले पाहणे या सारखा दुसरा आनंद नाही. या आनंदाचा अनुभव प्रत्यक्ष गुंतवणूकगिरीतूनच येईल. या गुंतवणूकगिरीची भूमिका प्रत्यक्ष कशी निभावता येईल त्याचा साद्यंत मासला पेश करणारे पाक्षिक सदर पुढील वर्षभर, प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी..

नवीन वर्ष म्हणजे नव्याने सुरुवात, नव्या संधी, नवी उमेद आणि नवीन धोरणे! आजवर खूप काही ऐकलं, बरंच काही वाचलं. तरीसुद्धा थोडी हुरहुर, थोडी उत्कंठा आणि थोडी काळजी वाटते. म्युच्युअल फंड आणि शेअरमध्ये पैसे गुंतवायचे की नाही – हा प्रश्न काही सुटत नाही!!!

चला तर मग, आजपासून सुरू होऊ दे. या वर्षी आपण एक प्रयोग करूया. प्रत्येक महिन्यात ५,००० रुपये गुंतवूया आणि बघूया वर्षांखेरीस आपली गुंतवणूक कशी तयार होते. त्यासाठी तयार केले आहेत खालील पाच प्रकारचे पोर्टफोलिओ:

पुढील वर्षभर, प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी आपण या पोर्टफोलिओंचा आढावा घेत राहणार आहोत. शिवाय अध्येमध्ये जर थोडे पैसे महिन्याअखेरीला शिल्लक राहिले किंवा काही कारणास्तव मिळाले, तर तेसुद्धा आपण गुंतवू.

पण त्याआधी या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष असू द्या:

  • हे पोर्टफोलिओ प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. कृपया कोणतीही गुंतवणूक करताना स्वत:ची जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्याची किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.
  • या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाही.
  • वरील नमूद केलेले परतावे हे मागील १० वर्षांच्या आढाव्यानुसार आहेत. यापुढे असे परतावे मिळतील याची कोणतीही शाश्वती नाही.
  • सर्व म्युच्युअल फंड हे रेग्युलर ग्रोथ प्लान आहेत.
  • यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.
  • म्युच्युअल फंडाचे एक्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर – यांचा विचार या सदरामध्ये केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.

नवीन वर्षांच्या शुभेच्छा!

पाच प्रातिनिधिक पोर्टफोलियो मासिक गुंतवणूक ५,००० रुपये

(लेखिका सनदी लेखाकार आणि लोकांच्या वित्तीय स्वास्थ्यविषयक तज्ज्ञ आणि स्वतंत्र सल्लागार म्हणून कार्यरत)  

trupti_vrane@yahoo.com

First Published on January 1, 2018 12:31 am

Web Title: investment guidance long term approach on investment