15 October 2019

News Flash

गुंतवणूक कट्टा..: सातत्य कायम हवे!

काहीशा उतारानंतर मिड-कॅप समभागांनी तितक्याच वेगाने उसळी मारल्याचे नजीकच्या इतिहासात अनेक उदाहरणे आहेत

(संग्रहित छायाचित्र)

तृप्ती राणे

चालू वर्षांत केंद्रीय अंर्थसंकल्प मांडला गेल्यापासून म्हणजे फेब्रुवारी २०१८ पासून मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांना तीव्र स्वरूपाची उतरती कळा लागली आहे. म्युच्युअल फंडांच्या पोर्टफोलियोत सर्वाधिक भरणा याच समभागांचा असल्याने त्यांची परतावा कामगिरीही या काळात अत्यंत वाईट राहिल्याचे दिसले आहे. याचाच परिपाक म्हणून ‘थेंबे थेंबे तळे साचे’ पोर्टफोलियोची कामगिरीही नरमलेलीच आहे. सेन्सेक्स-निफ्टी सार्वकालिक उच्चांकावर असताना हे असे होणे साहजिकच अधिक घोर लावणारे आहे. तथापि उतार-चढ हे अशा गुंतवणुकीचे स्वाभाविक गुण आहेत. काहीशा उतारानंतर मिड-कॅप समभागांनी तितक्याच वेगाने उसळी मारल्याचे नजीकच्या इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. २००३ मधील तीव्र घसरण आणि त्यानंतरच्या तीन वर्षांतील बहारदार तेजी, पुढे पुन्हा २०१० आणि २०१३ पासून जानेवारी २०१८ पर्यंत अशा दमदार उभारींचा काळ हेच दाखवितो. सामान्य गुंतवणूकदारांसाठी मात्र सातत्य हेच महत्त्वाचे! फळ जरूर मिळेल आणि त्याची सुरुवात झाल्याचे यंदाच्या पोर्टफोलियोवर नजर फिरविल्यास दिसून येईल.

सूचना :

* जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्या किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

* या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युचुअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युचुअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे नाहीये.

* यातील काही म्युचुअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

trupti_vrane@yahoo.com

First Published on July 30, 2018 1:07 am

Web Title: investment tips midcap mutual funds small cap mutual funds