News Flash

सुख-समाधान देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांचा कानमंत्र!

अर्थसल्ला’ मार्गदर्शनाच्या मालिकेत येत्या शनिवारी नवी मुंबईतील गुंतवणूकदारांशी संवाद साधला जाणार आहे.

येत्या शनिवारी वाशीमध्ये गुंतवणूक-जागर
महिन्याकाठी बचत म्हणून गाठीशी उरणाऱ्या पैशाची बँकेत एफडी केलेले चांगले की, पोस्टाच्या योजनांत ते गुंतवावेत? व्याजाचे दर घटले असताना गुंतवणुकीच्या या पारंपरिक पर्यायांना सरस ठरणारे पण सुरक्षित असे मार्ग कोणते? भविष्याविषयक काही स्वप्न, योजना मनात असलेल्या कोणालाही पडणाऱ्या या प्रश्नांच्या अनुषंगाने कष्टाने कमावलेल्या पैशाला चांगल्या गुंतवणुकीचे वळण देणाऱ्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मार्गदर्शनाच्या मालिकेत येत्या शनिवारी नवी मुंबईतील गुंतवणूकदारांशी संवाद साधला जाणार आहे.
‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे हे गुंतवणूक जागर येत्या शनिवारी, ३० जुलै रोजी मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर -६, वाशी येथे सायंकाळी ६ वाजता होत आहे. ‘अर्थ नियोजनातून स्वप्नपूर्ती’ या विषयावर आर्थिक नियोजनकार मिलिंद अंध्रुटकर, तर ‘म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे’ या विषयावर गुंतवणूकविषयकसल्लागार आणि ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभ लेखक वसंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन या निमित्ताने उपस्थितांना होईल.
निश्चित केलेले अर्थलक्ष्य गाठून देणारे योग्य म्युच्युअल फंड, त्यातील जोखमेबरोबरच परताव्याचे प्रमाण, फंडांची निवड करण्याचे निकष व काळजी, करबचतीचे समाधान कसे होईल, याबाबत कुलकर्णी हे विवेचन करतील. तर घर-गाडी बाळगण्याचे स्वप्न चाळीशीपूर्वीच साकारण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यातील बचतीचे महत्त्व विशद करताना, पैशाने पैसा वाढवत नेण्याच्या मार्गाचा अंध्रुटकर आपल्या मार्गदर्शनांतून वेध घेतील. सोप्या भाषेत, सुबोध उदाहरणांसह, तज्ज्ञांकडून या उपक्रमांतून दिले जाणारे मार्गदर्शन उपस्थितांना निश्चितच उपयुक्त ठरेल. शिवाय आपले नेमके प्रश्न त्यांना तज्ज्ञांना विचारण्याची संधीही मिळेल. कार्यक्रमाला प्रवेश खुला व विनामूल्य आहे.

केव्हा, कुठे?
गुरुवार, २८ जुलै २०१६, सायं. ६.०० वा.
स्थळ : बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
: तज्ज्ञ मार्गदर्शक :
मिलिंद अंध्रुटकर आणि वसंत कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 1:01 am

Web Title: loksatta arthsalla initiative will held in vashi on saturday
Next Stories
1 वित्त भान : मशागत रजा
2 कर समाधान : सजाण मुलांचे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात गणले जाऊ नये..
3 गाजराची पुंगी : व्याजदर कपातीची आशा इतक्यात नकोच..
Just Now!
X