‘एनएफओ’ १० ऑगस्टपर्यंत

मुंबई: बाजार निर्देशांकांनी सध्या ऐतिहासिक कळस गाठला आहे, तर दुसरीकडे व्याजदरात देखील वाढ सुरू आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणुकदारांनी रोखे (डेट)  फंडांचा पर्याय निवडणे शहाणपणाचे ठरेल. मध्यम ते दीर्घ मुदतीमध्ये कमी जोखमेसह स्थिर परतावा आणि भांडवली वाढ असे फंड गुंतवणुकीला प्रदान करतात. महिंद्र म्युच्युअल फंडाने याच पाश्र्वभूमीवर ‘महिंद्र क्रेडिट रिस्क’ ही योजना आणली असून, प्रारंभिक गुंतवणुकीसाठी (एनएफओ) ती १० ऑगस्टपर्यंत खुली आहे.

वस्तुत: ज्या गुंतवणूकदारांना समभागांमध्ये जायचे नाही आणि कमी चढ-उतारापुरतीच जोखीम ज्यांना पेलवते, त्यांच्यासाठी रोखेसंलग्न फंड हा एक चांगला पर्याय आहे. महिंद्र म्युच्युअल फंडाची ‘महिंद्र क्रेडिट रिस्क’ योजना ‘डबल ए’ पतधारणा असणारे कॉर्पोरेट रोखे गुंतवणुकीसाठी निवडेल. घसरत्या व्याज दराच्या स्थितीत हे रोखे चांगला परतावा देतात. गुंतवणूकदाराने कमीतकमी हजार रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करू शकेल किंवा ‘एसआयपी’द्वारे देखील गुंतवणूक करता येऊ शकते.

म्युच्युअल फंडाच्या एकूण मालमत्तेमध्ये (एयूएम) रोखेसंलग्न फंडांचा वाटा सर्वाधिक आहे आणि बहुतेक म्युच्युअल फंड घराण्यांच्या या प्रकारच्या योजना आहेत. रोखेसंलग्न फंडाची परतावा कामगिरी थोडके अपवाद वगळता चांगली राहिली आहे. तथापि किमान दोन ते तीन वर्षांसाठी गुंतवणूक करू पाहणाऱ्या गुंतवणुकदारांनी या पर्यायाकडे पाहिले पाहिजे. खरे तर यावेळी मुदत ठेवींसाठी निश्चित उत्पन्न स्रोतांसह कॉर्पोरेट बॉण्ड्सचे व्याजदर वर जात आहेत आणि हा क्रम येत्या काही दिवसांत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, अशा प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक येत्या काळात कमी जोखीम घेऊन चांगली लाभदायी ठरू शकते.

ही योजना मूळात मनी मार्केट संसाधने, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स- रिट्स, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स-इन्व्हिट्स अशा पर्यायांत किमान ६५ टक्के ते कमाल १०० टक्के गुंतवणुकीचे उद्दिष्ट राखणारी आहे. या गुंतवणुकीची तरलता आणि भांडवल सुरक्षिततेसह संतुलित उत्पन्न अशी वैशिष्टय़े आहेत. विश्लेषकांच्या मते, भारताचा आर्थिक वृद्धीपथ भविष्यात नवनवीन क्षितिज गाठत राहील आणि त्या अर्थगतीत सहभागाची संधी देणारा दीर्घ मुदतीचे पर्यायांपैकी ही योजना एक पर्याय आहे.