गुरुवारी बोरिवलीत पैसा गुंतवायचा तर   कुठे याचे ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ दिशादर्शन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निश्चलनीकरणानंतर दीड महिना उलटत आला तरी, चलनकल्लोळ आणि परिणामी भीती व असुरक्षिततेचे वातावरण कायम आहे. भांडवली बाजारात निर्देशांकात निरंतर सुरू असलेली घसरण  हेच स्पष्ट करते. या पाश्र्वभूमीवर गुंतवणूक करण्याचे साहस करणे शहाणपणाचे ठरेल आणि पैसा गुंतवायचा तर कुठे असा सामान्यजनांपुढे प्रश्न असणे स्वाभाविक आहे. हे हेरूनच ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’ हा तज्ज्ञ सल्ल्याचा उपक्रम योजण्यात येत आहे.

गुरुवारी, २९ डिसेंबर रोजी सायं. ६ वा. सेंट अ‍ॅन्स स्कूल, सावरकर उद्यानाजवळ, लोकमान्य टिळक मार्ग, बोरिवली (प.) येथे योजण्यात आला आहे. ‘बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत या गुंतवणूकदार मार्गदर्शन कार्यक्रमात नोटाबंदीनंतरची गुंतवणुकीची रूपरेषा तज्ज्ञांकडून समजावून दिली जाणार आहे.

गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय असलेल्या म्युच्युअल फंडासंबंधी गुंतवणूक धोरण कसे असावे, याबाबत अर्थसल्लागार निखिल नाईक मार्गदर्शन करतील. फंडांचे प्रकार,  जोखीम आणि परतावा या निकषांवर फंडांची निवड यावर ते प्रकाश टाकतील.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत्या जबाबदाऱ्यांसह उत्पन्न, खर्च यांचा मेळ राखत  आर्थिक नियोजनाची घडी बसवली जाणे क्रमप्राप्तच आहे. म्हणूनच सनदी लेखाकार तृप्ती राणे या जीवनांत आर्थिक नियोजनाचे महत्त्व सांगतील.

तज्ज्ञ वक्त्यांना गुंतवणूकविषयक प्रश्न विचारण्याची उपस्थितांना संधी मिळेल.

कधी?

गुरुवार, २९ डिसेंबर २०१६

सायंकाळी ६ वाजता

कुठे?

सेंट अ‍ॅन्स स्कूल, सावरकर उद्यानाजवळ, लोकमान्य टिळक मार्ग, बोरिवली (प.), मुंबई</p>

तज्ज्ञ मार्गदर्शक :

* अर्थनियोजनाचा श्रीगणेशा :  तृप्ती राणे

* म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे  फायदे : निखिल नाईक

प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money investment tips in loksatta arthsalla
First published on: 26-12-2016 at 01:01 IST