19 September 2018

News Flash

बाजाराचा तंत्र कल : काव्य प्रत्यक्षात, कलाकुसरची प्रतीक्षा!

त्रैमासिक आढावा घेताना भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक कोसळल्याचे दु:ख आपल्या सर्वानाच आहे, हे जाणवते.

त्रैमासिक आढावा घेताना भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक कोसळल्याचे दु:ख आपल्या सर्वानाच आहे, हे जाणवते. पण ऐन तेजीच्या बहरात बाजार कोसळण्याची पूर्वसूचना/सावधानतेचा इशारा १५ जानेवारीपासूनच प्रत्येक लेखात देण्यात आलेला. यासाठी चतुरस्र कवयित्री शांताताई शेळके यांच्या वाक्याचा आधार घेतला होता ते वाक्य म्हणजे, डोक्यात असतं ते काव्य आणि कागदावर असते ती कलाकुसर! त्याप्रमाणे माझ्या डोक्यातील निफ्टीवरील १०,८०० – ११,००० चे टप्पे हळूहळू प्रत्यक्षात आले आहेत. तर कागदावरील कलाकुसर म्हणजे गुंतवणूकदारांचा कागदोपत्री नफा (पेपर ऑन प्रॉफिट) प्रत्यक्षात येण्यासाठी सध्या चालू असलेल्या तेजीत गुंतवणूकदारांनी आपले नफ्यातील समभाग विकून फायदा पदरात पाडून घ्यावा. कारण त्यानंतर बाजारात घातक उतार संभवतात व त्याच अनुषंगाने सुचविलेले ‘लक्षणीय समभाग’ एकदम खरेदी न करता गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत व ही घसरण निर्देशांकावर प्रथम ३३,४८०/१०,२५० व नंतर ३३,५००/१०,०५० पर्यंत असू शकेल. तेव्हा हे लक्षणीय समभाग खरेदी करावेत. त्या अनुषंगाने १५ मार्चला निर्देशांक या स्तरावर आल्यामुळे ही खरेदीची किंमत गृहीत धरली आहे.

सध्या बाजार मंदीच्या गत्रेत असून निर्देशांकावर १०% तर ‘ब’ वर्गातील समभागात ३० ते ४०% हून अधिक घसरण झाली आहे. या महिन्यात सुधाराची दाट शक्यता आहे. तेव्हा वरील समभागांच्या भावांमध्येदेखील चांगली सुधारणा अपेक्षित आहे. आताच्या घडीला समभाग राखून ठेवणेच श्रेयस्कर!

HOT DEALS
  • Honor 9 Lite 64GB Glacier Grey
    ₹ 13975 MRP ₹ 16999 -18%
    ₹2000 Cashback
  • I Kall K3 Golden 4G Android Mobile Smartphone Free accessories
    ₹ 3999 MRP ₹ 5999 -33%

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉसआणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on April 2, 2018 12:35 am

Web Title: share market trend share market sensex