News Flash

बाजाराचा तंत्र कल : शोध.. निर्देशांकाच्या तळाचा!

गेल्या दीड महिन्यात निर्देशांकावर अनुक्रमे सेन्सेक्सवर ३,४५२ आणि निफ्टीवर १,०३० अंशांची घसरण झाली आहे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आताच्या घडीला सेन्सेक्स/ निफ्टी निर्देशांकावर अनुक्रमे ३४,५००/ १०,६०० ही महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ आहे, असे आपण गेल्या काही लेखांपासून म्हणत आलो आहोत. गेल्या आठवडय़ातील लेखातही, निर्देशांकांनी सुधार दाखविल्यास, प्रथम ३३,५००/१०,३०० चा स्तर पार करणे नितांत गरजेचे आहे, असे नमूद केले गेले होते. हा स्तर निर्देशांकाला पार करून या स्तरावर टिकण्यास अपयश येत असल्यामुळे (विशेषत शुक्रवारचा रक्तपात) या आठवडय़ात निर्देशांकाचा संभाव्य नीचांक / तळ काय असेल त्याचा आढावा घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव –

’  सेन्सेक्स :   ३३,१७६.०० 

’  निफ्टी     : १०,१९५.२०

गेल्या दीड महिन्यात निर्देशांकावर अनुक्रमे सेन्सेक्सवर ३,४५२ आणि निफ्टीवर १,०३० अंशांची घसरण झाली आहे. त्यामुळे निर्देशांकावर तळ प्रस्थापित होताना तीव्र स्वरूपाची उलथापालथ, घुसळण (व्होलॅटॅलिटी) अपेक्षित असते. सध्या तीच आपण अनुभवत आहोत आणि या आठवडय़ातदेखील आपण अनुभवणार आहोत. त्यामुळे एखाद्या तीव्र घसरणीत निर्देशांक प्रथम ३२,८०० /१०,१५० आणि  नंतर ३२,५०० /१०,०५० पर्यंत जरी घसरला तरी ही घसरण निर्देशांकाच्या तळाची पायाभरणीची (बॉटम फॉम्रेशन प्रोसेस) प्रक्रिया चालू आहे असे समजावे. या पायाभरणीनंतर तेजीची वरची चाल ही ३४,५००/ १०,६०० असेल आणि ही मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक असेल. निर्देशांकावर शाश्वत तेजी ही ३५,१०० / १०,८०० या पातळीच्या वरच सुरू होईल.

सोन्याचा   

किंमत-वेध

ल्ल  गेल्या आठवडय़ातील पूर्वार्धात सोन्याच्या भावाला ‘महत्त्वाची कल निर्धारण पातळी’ म्हणजे ३०,५०० रुपयांचा स्तर ओलांडण्यास वारंवार अपयश आल्यामुळे शुक्रवारी सोन्याचा भाव ३०,२०० पर्यंत खाली घसरले. येणाऱ्या दिवसात सोन्याच्या भावाने ३०,५०० रुपयांची पातळी यशस्वीरित्या पार न केल्यास सोने रु. ३०,१०० ते रु. ३०,००० पर्यंत खाली घसरू शकते. सोन्यावर शाश्वत तेजी ही रु. ३०,५०० च्या वरच सुरू होईल. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).

लक्षणीय समभाग

नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी लि. (एनसीसी)

(बीएसई कोड – ५००२९४)

शुक्रवारचा बंद भाव – रु. १२२.४५

ल्ल  समभागाचा आजचा बाजार भाव हा २०० (१०४), १०० (१२०) या दिवसाच्या चलत् सरासरीवर बेतलेला आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ११५ ते रु. १३० आहे. रु. १३० च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट हे रु. १४० ते १५० असेल तर द्वितीय उद्दिष्ट हे रु. १७० असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे रु. २०० असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ात विभागून प्रत्येक घसरणीत हा समभाग खरेदी करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. १०० चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

आशीष अरविंद ठाकूर lashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 1:06 am

Web Title: stock market technical analysis for upcoming week
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : काळाच्या पुढे दृष्टी
2 फंड विश्लेषण : जेथे सागरा धरणी मिळते
3 गुंतवणुकीत समतोल राखणे महत्त्वाचे!
Just Now!
X