16 February 2019

News Flash

बाजाराचा तंत्र कल : ‘निफ्टी’ने दिली उभारी!

निफ्टीने कोमेजलेल्या गुंतवणूकदारांच्या मनाला उभारी देण्याचे काम केले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे सेन्सेक्सवर ३२,९२३ आणि निफ्टीवर १०,१८० या स्तरावर निर्देशांकांची पायाभरणी (बेस फॉम्रेशन) पूर्ण होऊन मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक आपण अनुभवली. निफ्टीने कोमेजलेल्या गुंतवणूकदारांच्या मनाला उभारी देण्याचे काम केले. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव –

’  सेन्सेक्स :   ३४,१९२.६५  

’  निफ्टी     : १०,४८०.६०

या आठवडय़ात एक संक्षिप्त घसरणीची अपेक्षा आहे. ही घसरण सेन्सेक्सवर ३३,६५० ते ३३,८५० आणि निफ्टीवर १०,३५० ते १०,४०० पर्यंत असेल. या विश्रांतीनंतर पुन्हा तेजीची घोडदौड सुरू होऊन वरचे उद्दिष्ट हे ३४,५०० / १०,५५० ते १०,६०० असेल.  आता आपण निर्देशांकांचे ‘मिशन २०२०’ पहिल्या भागाकडे वळू या.

सेन्सेक्सवर ३६,४४३ आणि निफ्टीवर ११,१७१ असे उच्चांक २९ जानेवारीला दिसले, नंतर घसरण सुरू झाली. २३ मार्च २०१८ ला सेन्सेक्सवर ३२.४८३ आणि निफ्टीवर ९,९५१चा नीचांक मारून मंदीचे आवर्तन संपले आणि आता मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक (रिलीफ रॅली) सुरू आहे. त्याचे वरचे उद्दिष्ट हे सेन्सेक्सवर ३४,४५० ते ३४,९१८ आणि निफ्टीवर १०,५६४ / १०,७०८ असेल. (‘फेबुनासी फॅक्टर’चे उच्चांकापासून नीचांकांचे .५०० ते .६१८ टक्क्यांचा स्तर) तेव्हा ३४,९१८ / १०,७०८ च्या पल्याड स्तरावर निर्देशांक पंधरा दिवस (व्यवहाराचे दिवस) टिकला तरच निर्देशांकासाठी नवीन तेजीचे दालन उघडेल. त्या तेजीच्या दालनातील नवनवीन उच्चांक पुढे शक्य आहेत. तथापि हा स्तर ओलांडण्यास अपयश आल्यास मंदीची खोल दरी काय असेल? त्याचा आढावा ‘मिशन २०२०’ भाग- २ मध्ये घेऊ या.

सोन्याचा   किंमत-वेध

आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमेरिका-चीन व्यापार युद्ध, सीरियावरील रासायनिक शस्त्रहल्ला आणि सर्वात महत्त्वाचे खनिज तेलाचे भाव प्रतििपप ७० डॉलरवर झेपावल्यामुळे सोने झळाळून उठले आणि रु. ३०,८०० ते ३१,१०० ही आपली सर्व वरची उद्दिष्टे ११ एप्रिलला साध्य केली. आताच्या घडीला सोन्याच्या भावावर एक हलकीशी विश्रांती अपेक्षित असून हा स्तर रु. ३१,१०० ते ३०,८०० असा असेल. या स्तरावर सोन्याच्या भावाची विश्रांती पूर्ण होऊन पुन्हा तेजीची घोडदौड सुरू होऊन वरचे इच्छित उद्दिष्ट हे ३१,५०० ते ३१,८०० असे असेल. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).

लक्षणीय समभाग

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५०००४९)

शुक्रवारचा बंद भाव – रु. १४२.५०

ल्ल  समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा १३८ रु. ते १४८ रु. आहे. १४८ रुपयांच्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन अल्पमुदतीचे उद्दिष्ट हे १६० ते १७० रुपये असेल. दीर्घमुदतीचे उद्दिष्ट हे १९० ते २१० रुपये असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला १२० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

आशीष अरविंद ठाकूर lashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on April 16, 2018 5:13 am

Web Title: stock market technical analysis for upcoming week 2